Organizing Annual Exam Summative Evaluation PAT Simultaneously For Class 1st To 9th समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील इयत्ता २ री ते ८ वी करिता संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT ३) आयोजनाबाबत

Organizing Annual Exam Summative Evaluation PAT Simultaneously For Class 1st To 9th

Organizing Annual Exam Summative Evaluation PAT Simultaneously For Class 1st To 9th

Regarding Organizing Annual Examinations Cumulative Assessment Evaluation PAT Tests Simultaneously For Grades 1st To 9th In All Schools In The State

WhatsApp Channel Follow Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

जा.क्र. राशैसंप्रपम/ मूल्यमापन / सं.चा.२ जिल्हा पत्र /२०२५ -२६/
दि. /०३/२०२६

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२) विभागीय विद्याप्राधिकरण (सर्व),
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४) शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य. व योजना) जि.प. (सर्व),
५) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,
६) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),
७) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प. (सर्व),

    विषय : समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील इयत्ता २ री ते ८ वी करिता संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT ३) आयोजनाबाबत....

संदर्भ
: १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.
२. इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा शासन निर्णय दि. ७/१२/२०२३
३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र. क्र.९४/एस.डी.-४ दि. १४ जुलै २०२५.
४. राज्यस्तरीय सनियंत्रण समिती बैठक दि. २७/०२/२०२६
५. मा.आयुक्त यांच्यासमवेत झालेली बैठक दि.०६/०३/२०२६.

उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी – १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले असून त्यापैकी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत व संकलित चाचणी १ यापूर्वी जुलै व ऑक्टोबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या आहेत. तसेच उर्वरित संकलित चाचणी २ (PAT-३) दि. ११,१५ व २२ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

तसेच संदर्भ क्र.३ अन्वये दि. १४/०७/२०२५ च्या शासन निर्णयात असे नमूद करण्यात आले आहे, की “द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन / वार्षिक परीक्षा या सत्र अखेरच घेण्यात याव्यात व त्यांचे वेळापत्रक

आवश्यकतेनुसार संचालक प्राथमिक/माध्यमिक यांनी संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावे.” असे नमूद करण्यात आलेले आहे.
तरी या पार्श्वभूमीवर तसेच संदर्भ क्र. २ ते ५ अन्वये संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT-३) चाचणीचे वेळापत्रक यासोबत देण्यात येत असून इतर विषय व इयत्तांच्या वेळापत्रकाबाबातच्या सूचना संचालक प्राथमिक व माध्यमिक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. सदर पत्रानुसार नियतकालिक मुल्यांकन चाचणीचे वेळापत्रक संलग्न करण्यात येत आहे. संकलित चाचणी -२ ( PAT – ३) अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांसाठी चाचणी होणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

संकलित चाचणी -२ (PAT-३) उद्देश / उपयोग / फायदे :-
१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.
२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल.
३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.
४) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.
५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होईल.

  • नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT-३) कालावधी

अ. क्र. तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणी प्रकार
१. संकलित मूल्यमापन चाचणी, सत्र – २
कालावधी दि. ११, १५ व २२ एप्रिल २०२६

  • संकलित चाचणी २ (PAT-३) चे माध्यम व विषय :
    सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • संकलित चाचणी २ (PAT-३) चे माध्यम व विषय :
    सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. चाचणीचा अभ्यासक्रम :

सदर इयत्तांचा द्वितीय सत्रांत अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल.

  • संकलित चाचणी २ इयत्ता २ री ते ८ वी (PAT३) चे वेळापत्रक

Std 1st To 9th Question Paper PDF With Answer

Organizing Annual Exam Summative Evaluation PAT Simultaneously For Class 1st To 9th
Organizing Annual Exam Summative Evaluation PAT Simultaneously For Class 1st To 9th समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील इयत्ता २ री ते ८ वी करिता संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT ३) आयोजनाबाबत

उपरोक्त वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी २ (PAT-३) घेण्यात यावी.

इयत्ता २ री ते ८ वी करिता संकलित चाचणी-२ (PAT-३) बाबत सर्वसाधारण सूचनाः

१) उपरोक्त वेळापत्रकानुसार इयत्ता २ री ते ८ वी करिता सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षातील संकलित मूल्यमापन चाचणी -२ (PAT-३) चे आयोजन करावे.
२) इयत्ता २ री ते ८ वी साठी भाषा, गणित व तृतीय भाषा यासाठी प्रस्तुत कार्यालयाकडून पुरविण्यात आलेल्या चाचणीपत्रिकांचा वापर करूनच संकलित चाचणी २ घेण्यात यावी. याव्यतिरिक्त इतर विषयांसाठी शाळास्तरावर इयत्तानिहाय व विषयनिहाय चाचणीपत्रिका तयार करून संकलित चाचणी- २ घेण्यात यावी.
३) शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये.
४) तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम) गणित (सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
५) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांची इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी, ७ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-२ होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी.
६) उपरोक्त चाचणीच्या वेळापत्रकानुसार नियतकालिक मूल्यांकन चाचणी – PAT ३ चे आयोजन करावे.
७) राज्यातील मराठी माध्यमातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांसाठी समग्र प्रगती पत्रक (HPC) पथदर्शी प्रकल्प स्वरुपात देण्यात आलेले आहे. तथापि, सद्यस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात यावे.
८) संदर्भ क्र. २ ते ५ नुसार इयत्ता ५ वी व ८ वी वार्षिक परीक्षेबाबतची कार्यवाही संचालक, प्राथमिक / माध्यमिक, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरून करण्यात येईल.

संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :

१. संकलित चाचणी २ (PAT३) ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.
२. संकलित चाचणी – २ (PAT३) करीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.
३. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.
४. संकलित चाचणी २ (PAT३) च्या चाचणी पत्रिका अंदाजित मार्चच्या दुसऱ्या ते चौथ्या आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या UDISE + संख्येनुसार व सेमी/ नॉनसेमी विद्यार्थी संख्या लिंकद्वारे शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येणार आहेत.
५. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. त्या खोलीमध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात. तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.
६. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर पोहचवाव्यात.
७. चाचणी पत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.
a. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयक यांनी इयत्ता २ री ते ८ वी च्या UDISE + (२०२५-२६) च्या विद्यार्थी संख्येनुसार चाचणी पत्रिकांचे गड्ढे पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच गठ्ठयांची संख्या नमूद करून पोहोच द्यावी.
b. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी जिल्हा समन्वयक व गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी तालुका समन्वयक म्हणून पूर्णवेळ नियमित अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करावी.
०. प्रसंगी पर्यायी अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी.
d. प्रत्यक्ष चाचणी पत्रिका वितरीत करण्याकरिता गटशिक्षणाधिकारी/विस्तार अधिकारी / सहा. प्रशासन अधिकारी यांनी उपस्थित राहावे.
७. सदर कामकाजासाठी निष्काळजीपणामुळे चाचणी पत्रिका वितरीत करताना काही समस्या उद्भवल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथ.जि.प. सर्व शिक्षण निरीक्षक, मुंबई / प्रशासन अधिकारी मनपा व नपा/ गटशिक्षणाधिकारी यांची असेल याची नोंद घ्यावी.
f. सदर कामकाजासाठी सहाय्यक म्हणून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अन्य कर्मचारी यांची मदत घेता येईल.
g. संबंधित तालुका समन्वयक यांनी चाचणी पत्रिकांचे गड्ढे प्राप्त करताना Packed असल्याची शहानिशा करावी.
h. चाचणी पत्रिकांचे संच प्राप्त करताना कमी किंवा जास्त याबबत शहानिशा करावी.
i. प्रत्यक्ष वितरण करताना तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. सदर बाबत विषयनिहाय, इयत्तानिहाय गड्ढे वा संख्या नमूद करून प्राप्त झाल्याची दिनांक, नाव व पदासहित स्वाक्षरी घ्यावी. तसेच तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणीपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
j. शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.
८. चाचणीपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
९. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ. माध्य.), प्रशासन अधिकारी मनपा, शिक्षण उपनिरीक्षक, मुंबई सर्व, गटशिक्षणाधिकारी, तालुका समन्वयक व इतर शिक्षण विभागाशी संबंधित घटक यांना स्पष्टपणे सूचित करण्यात येते की, चाचणीपत्रिका ताब्यात घेतल्यापासून YOU TUBE CHANNEL द्वारे अथवा इतर समाजमाध्यमाद्वारे सदर चाचणी पत्रिका चाचणीपूर्वी प्रसारित होणार नाहीत याबाबत योग्य ती दक्षता
घेण्यात यावी. तसेच अशी बाब निदर्शनास आल्यास सबंधित घटकांवर कायदेशीर कारवाईसह प्रशासकीय कारवाई आपल्या स्तरावरून करण्यात यावी.
१०. तसेच यापूर्वीच्या PAT चाचणीवेळी YOU TUBE CHANNEL वर चाचणीपत्रिका चाचणीपूर्वी प्रसारित झाल्याचे आढळून आले असून संबंधित घटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
घेण्यात यावी. तसेच अशी बाब निदर्शनास आल्यास सबंधित घटकांवर कायदेशीर कारवाईसह प्रशासकीय कारवाई आपल्या स्तरावरून करण्यात यावी.
१०. तसेच यापूर्वीच्या PAT चाचणीवेळी YOU TUBE CHANNEL वर चाचणीपत्रिका चाचणीपूर्वी प्रसारित झाल्याचे आढळून आले असून संबंधित घटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
११. तालुका स्तरावर चाचणीपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे पार पडण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.
१२. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची चाचणी आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.
१३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी समन्वयाने अंमलबजावणी करावी.
१४. सन २०२५-२६ च्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या जिल्हानिहाय, तालुकानिहाय, माध्यमनिहाय व इयत्तानिहाय UDISE + (२०२५ २६ चा दि. १२ जानेवारी २०२६ पर्यंतच्या प्राप्त माहिती) मधील संख्या तसेच शिक्षणाधिकारी यांचेकडून दि. २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सेमी / नॉन सेमी (गणित) प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे चाचणीपत्रिका वितरीत करण्यात येणार आहेत. तरी आपल्या स्तरावरून UDISE + २०२५-२६ प्रमाणेच शाळांना प्रत्यक्ष चाचणी पत्रिका वितरण करण्यात यावे. त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या चाचणी पत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) / शिक्षण निरीक्षक/प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांची वैयक्तिकरित्या राहील.
१५. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.
१६. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
१७. प्रस्तुत संकलित चाचणी-२ (PAT-३) कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac in या वेबसाईटवर चाचणीपूर्वी उपलब्ध असतील. उत्तरसूची चाचणी दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.
१८. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त चाचणीपत्रिका देण्यात याव्यात.
१९. संकलित चाचणी २( PAT३) चे गुणनोंद चाचणी पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.
१९. संकलित चाचणी २ (PAT३) मधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी पुढील शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.
२०. प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन निष्पत्ती वर्षाअखेरीस प्राप्त होतील याकडे लक्ष द्यावे.

* संकलित चाचणी २ (PAT-३) च्या कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत -

१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.
२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.
३) चाचणी कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.
४) तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची यादृच्छिक पद्धतीने तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.
उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही तारखांमध्ये बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेवूनच बदल करावा.

वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत संकलित चाचणी- २ च्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात.

संकलित चाचणी -२ (PAT३) चे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहेत. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील.

सर्व शिक्षकांना हे आवर्जून कळविण्यात यावे की, सदर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नाही. सबब सर्व चाचण्या प्रामाणिकपणे घेवून विद्यार्थ्यांचे गुणदानही त्याच पद्धतीने करून त्याची माहिती विद्या समीक्षा केंद्र (VSK) Chatboat वर भरावी. या माहितीचा उपयोग केवळ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अध्ययनविषयक गरजा शोधून प्रभावी उपाययोजना करण्यासाठीच होईल याची प्रकर्षाने सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी व त्यानुसार अध्यापनात सुधारणा करावी.

Circular PDF Copy Link

Digitally signed by HEMANT SHARACHCHANDRA VASEKAR Date: 09-03-2026 19:43:34
(डॉ. हेमंत वसेकर भा.प्र.से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

Organizing Annual Exam Summative Evaluation PAT Simultaneously For Class 1st To 9th
Organizing Annual Exam Summative Evaluation PAT Simultaneously For Class 1st To 9th समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील इयत्ता २ री ते ८ वी करिता संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT ३) आयोजनाबाबत

Leave a Comment

error: Content is protected !!