STARS SAT 2 PAT 3 MARKS CHATBOT LINK

STARS SAT 2 PAT 3 MARKS CHATBOT LINK

IMG 20250424 201002
STARS SAT 2 PAT 3 MARKS CHATBOT LINK

STARS SAT 2 PAT 3 MARKS CHATBOT LINK

विषय : संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत……

संदर्भ :

१. मा. आयुक्त यांचे पत्र जा.क्र. आशिका/प्राथमिक/२०२५/११३० दि. ०५ मार्च २०२५.

२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा.जिल्हा पत्र/२०२४-२५/०२२५७, दि. ०४ एप्रिल २०२५.

३. मा. संचालक यांची मान्य टिपणी दि.२३/०४/२०२५

उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ Improved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ०८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT – ३) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकाची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

१. संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) चाटबॉट मार्गदर्शिका लिंक –

https://bit.ly/PATUserManual

तसेच संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT३) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. २४ एप्रिल २०२५ ते ५ मे २०२५ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
२. संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT३) गुणांची नोंद करणेसाठी लिंक –

https://bit.ly/PAΑΤ-ΜΗ

तथापि उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/९ssWv४bu५QPCq६XHA) प्रतिसाद नोंदवावा.

संकलित मूल्यमापन २ चाचणीच्या (PAT३) सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणे व निकाल जाहीर करणे या सर्व शैक्षणिक बाबी दि. १ मे २०२५ पर्यंत पूर्ण झालेल्या असणार आहेत. सदर संकलित मूल्यमापन चाचणी -२ (PAT-३) चे गुणनोंद करण्याची सुविधा चाटबॉटवर दि. २४ एप्रिल २०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच सदरच्या गुणनोंदणी करिता दि. ५ मे २०२५ या पर्यंतचा कालावधी देण्यात येत असून याच मुदतीत १०० टक्के शाळांनी गुणनोंदणी करणे अनिवार्य आहे. तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. याकरिता मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के शाळांची गुणनोंदणी होईल याची दक्षता घ्यावी.

परिपत्रक पीडीएफ प्रत हवी असल्यास या ओळीला स्पर्श करा

(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

Leave a Comment

error: Content is protected !!