San Agrim Maryada Vadh
San Agrim Maryada Vadh
सण अग्रिम मर्यादा वाढविणेबाबत.
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय, क्रमांक-अग्रिम-२०२६/प्र.क्र.४०/ विनियम
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक ०५.११.२०२६
वाचा : (१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एफएनडी-१०६२-बी, दि.६.१२.१९६२.
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. मुंविनि-१०९९/प्र.क्र.५२/९९/विनियम, दि.२०.१०.१९९९.
( (३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०५/प्र.क्र.१८/०५/विनियम, दि.२०.०६.२००५.
(४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०७/प्र.क्र.५८/०७/विनियम, दि.१९.१०.२००७.
(५) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०८/प्र.क्र.७०/०८/विनियम, दि.१५.५.२००९.
(६) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०९/प्र.क्र.४८/०९/विनियम, दि.१५.०९.२००९.
(७) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-२०१०/प्र.क्र.१२/१०/विनियम, दि.१०.०५.२०१०.
(८) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-२०१२/प्र.क्र.३२/१२/विनियम, दि.१८.१०.२०१२.
(९) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-२०१५/प्र.क्र.५७/१५/विनियम, दि.२६.१०.२०१५
(१०) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-२०१८/प्र.क्र.३७/१८/विनियम, दि.२३.१०.२०१८
अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्र. १४२ (जे) अनुसार देण्यात येणाऱ्या सण अग्रिमाची रक्कम वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
शासन आता असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन १४८००/-(₹ चार हजार आठशे) पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १२०,०००/- (र वीस हजार फक्त) सण अग्रिम अनुज्ञेय राहील.
२. सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय राहील.
१. दिवाळी
६. रोश-होशना
२. रमझान ईद
७. वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती)
३. ख्रिसमस
८. स्वातंत्र्य दिन
४. पारसी नववर्ष
९. प्रजासत्ताक दिन
५. संवत्सरी
१०. डॉ. आंबेडकर जयंती
३. सण अग्रिम मंजूरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील.
४. हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
५. मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक १४२ (जे) मध्ये योग्य ती सुधारणा यथावकाश करण्यात येईल.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२६११०५१५३७५८८२०५ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
Digitally signed by RAVIKUMAR BALAJIRAO
LINGANWAD
Date: 2026.11.05 15:39:03 +05’30’
(रविकुमार लिंगनवाड)
उप सचिव, महाराष्ट्र शासन