स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणेच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शालेय कला व क्रिडा स्पर्धा आयोजित करणेबाबत प्रस्ताव Shaley Kala Krida Spardha

Shaley Kala Krida Spardha

Shaley Kala Krida Spardha

Shaley Kala V Krida Spardha

School Art and Sports Competitions

sthanik swarajya sansthanchya shalanmadhil vidyarthyanna sandhi upalabdha karun denechya anushangane shaikshanik varsh 2026-27 pasun shaley kala v krida spardha aayojit karanebabat prastav

Proposal regarding the organization of school-level arts and sports competitions, starting from the academic year 2026-27, with the objective of providing opportunities to students in schools run by local self-government bodies.

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

जा.क्र.प्राशिसं/टे-३०१/२०२६

दिनांकित स्वाक्षरी नमूद

 विषय- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील  विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणेच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शालेय कला व क्रिडा स्पर्धा आयोजित करणेबाबत प्रस्ताव

संदर्भी- १. मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे अध्यक्षतेखाली दि.९/५/२०२६ रोजीच्या बैठकीदरम्यान देण्यात आलेल्या सूचना

२. संचालनालयाचे पत्र क्र प्राशिसं/टे-३०१/२०२६/दि.८/९/२०२६

३. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र क्र. १/२५२७०४४/२०२६/दि.१७/१०/२०२६

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP २०२०) हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित असून शिक्षणामध्ये कला आणि क्रीडा या विषयांना केंद्रस्थानी ठेवण्याची शिफारस करते. शालेय स्तरावर अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रम यांच्यामधील दरी नष्ट करून कला आणि क्रीडा यांना मुख्य प्रवाहातील विषयांच्या बरोबरीने स्थान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना ओळखणे, त्यांना, प्रोत्साहन देणे आणि स्थानिक संस्कृतीशी त्यांचे नाते घट्ट करणे ही काळाची गरज आहे. शालेय वातावरणात चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

शालेय जीवनात विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळावी. त्यांच्या मधील कौशल्ये विकसित व्हावीत आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होऊन स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व लक्षात घेता कला व क्रीडा स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे. याचबरोबर शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रिडा व युवक सेवा संचालनालय यांच्यामार्फत नियमितपणे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. याचबरोबर काही जिल्हा परिषदामार्फत जिल्हा परिषद निधीमधून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

केंद्र सरकारच्या PAB (Project Approval Board) द्वारे ‘खेळ-उड्डाण उत्सव २०२६-२७’ (KHEL-UDAAN UTSAV 2026-27) एक उपक्रम मंजूर केला आहे.

यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत Sports and co-curricular activities and competition या उपक्रमासाठी प्राथमिक करिता रू.२२.४६९ कोटी आवर्ती तरतूद मंजूर आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अनुदानित शाळांमधील विदयार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणेच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून केंद्रस्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तरावर शालेय कला व क्रिडास्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.

याबाबत आवश्यक खर्च मंजूर तरतूदीनुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई मार्फत समग्र शिक्षा अंतर्गत अंतर्गत Sports and co-curricular activities and competition या उपक्रमासाठी मंजूर असणा-या तरतुदीच्या मर्यादेत निधी उपलब्धतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी जिल्हयासाठी व प्रशासन अधिकारी महानगर पालिका (पाच मनपा) यांनी मनपासाठी सोबत जोडलेल्या निकषानुसार कला व क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या खर्चाची मागणी

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाकडे सादर करावी.

स्पर्धा पूर्ण झाल्यावर अहवाल संचालनालयास व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाकडे सादर करावा,

सोबत – मार्गदर्शक सूचना

Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 30-10-2026 16:09:35

(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे-१

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

३. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

Shaley Kala Krida Spardha
Shaley Kala Krida Spardha

  शालेय कला व क्रीडा स्पर्धा (२०२६-२७)

१. स्पर्धा गट, इयत्ता व वयोगट निश्चिती :

विद्यार्थ्यांची इयत्ता व वयोगटानुसार खालीलप्रमाणे दोन प्रमुख गटात विभागणी करण्यात येत आहे. १.१ प्राथमिक गट (Primary): पात्रताः इयत्ता ३ री ते ५ वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी.

१.२ उच्च प्राथमिक गट (Upper Primary): पात्रता: इयत्ता ६ वी ते ८ वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी.

सदरची स्पर्धा प्राथमिक व उच्च प्राथमिक गटासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळामधील विदयार्थ्यांसाठी राहील. संबंधित जिल्हा परिषद व महानगरपालिका यांना आवश्यकतेनुसार त्यांच्या वैयक्तिक निधीतून (जि.प.सेस मधून) इतर कला क्रीडा स्पर्धा समाविष्ट करता येतील.

२. कला स्पर्धा:-

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी शालेय स्तरावर कला व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा, मानवी मूल्ये आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख होऊन त्याबद्दल सार्थ अभिमान निर्माण होतो. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. यासाठी खालीलप्रमाणे वैयक्तिक स्पर्धा व सांघिक स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे.

२.१ प्राथमिक गट (Primary):
पात्रताः इयत्ता ३ री ते ५ वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी.

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ मध्ये वाचा या ओळीला स्पर्श करून

Shaley Kala Krida Spardha
Shaley Kala Krida Spardha

Leave a Comment

error: Content is protected !!