Shikshak Shikshakettar Niyukti Vayomaryada
Age Limit for Appointment of Teaching/Non-Teaching Staff
rajyatil manyata prapt khajgi vyavsthapananchya madhyamik, uccha madhyamik shalanteel shikshak/shikshakettar karmcharyanchya saralsevene niyuktikarita uchhtam vayomaryadebabat spashtikaran.
Clarification regarding the upper age limit for the direct recruitment of teaching and non-teaching staff in secondary and higher secondary schools run by recognized private managements in the state.
राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीकरीता उच्चतम वयोमर्यादेबाबत स्पष्टीकरण.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण. २०२६/प्र.क्र. २६६/ई-१७६८६६७/टीएनटी-१, मंत्रालय मुंबई ४०००३२
दिनांक :- ०५ नोव्हेंबर, २०२६
संदर्भ:
- १) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. सीईटी-२०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१, दि. ०७.०२.२०१९
२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२. दि. ०७.०३.२०१९.
३) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र. १७६/टीएनटी-१, दि.११.०८.२०२६.
प्रस्तावना :
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ९ (४) (ब) मधील तरतुदीप्रमाणे खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक (इयत्ता ९ वी ते १०) व उच्च माध्यमिक (इयत्ता ११ ते १२ वी) शाळातील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा विहित करण्यात आलेली नाही. तथापि, संदर्भ क्र. १, २ व ३ येथील शासन निर्णयातील संबंधित तरतुदीमुळे क्षेत्रिय स्तरावर संभ्रम निर्माण होत असल्याबाबतची निवेदने शासनास प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने योग्य ते स्पष्टीकरण निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय : महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ९ (४) (ब) मधील तरतुदीप्रमाणे संदर्भाधीन शासन निर्णय १, २ व ३ मधील खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक (इयत्ता ९ वी ते १० वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता ११ वी ते १२ वी) शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेबाबतच्या तरतूदी गैरलागू ठरतात. त्यामुळे खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक (इयत्ता ९ वी ते १०) व उच्च माध्यमिक (इयत्ता ११ ते १२ वी) शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६११०५१८५०५४५४४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
