सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा दिनांक ११ एप्रिल ते २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्याबाबत Class 1st To 9th Annual Exam

Class 1st To 9th Annual Exam

Class 1st To 9th Annual Exam

Class 1st To 9th Annual Exam Time Table

Std 1st To 9th Annual Exam Date Sheet Schedule Declared

Iytta Pahili Te Navavi Varshik Pariksha Velapatrak

Iytta Pahili Te Navavi Varshik Pariksha Jahir

Final Semester Exams for Classes1 to 9

Pahili Te Navavi Antim Pariksha

Regarding the holding of annual examinations in all medium and all management schools of the State Board for the academic year 2025-26 from April 11 to April 22, 2026

WhatsApp Channel Follow Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे

क्र. शिसं/संकीर्ण/२०२६/ए-१/विद्याशाखा/ 1778737

दि.१२/०३/२०२६
12 MAR 2026

महत्वाचे /कालमर्यादित/ई-मेल व्दारे

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व,

३) शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

४) शिक्षणाधिकारी वृन्हमुंबई महानगरपालिका

५) प्रशासकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका

६) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. (सर्व)

७) उपशिक्षणाधिकारी/गटशिक्षणाधिकारी सर्व पंचायत समिती.

विषय :- सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा दिनांक ११ एप्रिल ते २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्याबाबत..... 

संदर्भ : मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र जा.क्र.राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा. २जिल्हा पत्र/२०२५-२६/१७६८८५३दि.०९/०३/२०२६.

उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संदर्भीय पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे इयत्ता २ री ते ८ वी करिता नियोजन करण्यात आलेले असून संकलित चाचणी २ (PAT 3) दिनांक ११,१५ व २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व शाळांनी त्याच दिवशी आयोजित संकलित चाचणी २ (PAT 3) करून त्याअनुषंगाने कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. उपरोक्त दिनांकांमध्ये आपल्या स्तरावरुन फेरबदल करण्यात येऊ नये. (सोबत संदर्भीय पत्राची प्रत जोडली आहे.)

तसेच सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बार्षिक परीक्षा या मूल्यांकन चाचणी २ (PAT 3) हा कालावधी वगळून उर्वरित दिवशी आयोजित करण्यात याव्यात.

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविदयालयामध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी -२ (PAT 3) /, इयत्ता १ ते ८ वी, ९ वी व ११ वी आणि इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेला उपस्थित असणारी विदयार्थ्यांची संख्या ही ग्राह्य धरण्यात येईल. या अनुषंगाने सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक/योजना, सहाय्यक शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना वार्षिक परीक्षेदरम्यान भेटी देऊन एकूण पटावर विदयार्थी व परीक्षेला उपस्थित विदयार्थी संख्येचा अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करावा. विदयार्थी उपस्थिती नोंद करण्याच्या सुविधेबाबत यथावकाश कळविण्यात येईल.

Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 12-शिरदे भौसीबोरी: 11:43

शिक्षण संचालक

प्राथमिक

महाराष्ट्र राज्य, पुणे

Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 12-03-2026 18:05:26 (डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत माहितीस्तव सविनय सादर :-

१. मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा.आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.

४. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, ७०८, आरबी कुमठेकर मार्ग, सदाशिव पेठ, पुणे.

Class 1st To 9th Annual Exam
Class 1st To 9th Annual Exam

ALSO READ 👇

दरवर्षी २८ दिवस सार्वजनिक सुट्ट्या, प्रत्येक आठवड्यातील रविवारच्या ५२ सुट्टया आणि ४४ दिवस उन्हाळा सुट्टी, अशा एकूण १२४ दिवस शाळा बंद असतात. त्यात सत्र परीक्षांचेही काही दिवस असतात. मात्र, शैक्षणिक वर्षातील ३६५ पैकी किमान २२० दिवस तरी विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, असा निकष आहे. तरीपण, दरवर्षी मार्च अखेर अंतिम सत्र परीक्षा घेतली जायची. परीक्षा झाल्याने एप्रिल महिन्यापासूनच विद्यार्थी शाळेला यायचे बंद व्हायचे. या पार्श्वभूमीवर अंतिम सत्र परीक्षा मागच्या वर्षी म्हणजेच २०२५ पासून एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (एससीईआरटी) घेतला.

परीक्षेचा निकाल १ मे रोजी जाहीर होऊन २ मे पासून शाळांना उन्हाळा सुट्टी असेल, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात होईल. २ मे पासून शाळांना उन्हाळा सुट्टया असतील. विदर्भ वगळता १५ जूनपासून दरवर्षीप्रमाणे राज्यातील सर्व शाळा सुरु होतील तर विदर्भात २६ जून पासून शाळा सुरु होतील

Leave a Comment

error: Content is protected !!