शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अपात्र ठरलेल्या तथापि, तदनंतर पात्र ठरत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्या यांची माहिती शासनास सादर करणेबाबत Tappa Anudan GR शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदानास पात्र प्राथमिक शाळा/तुकडयांची तपासणी करणेबाबत

Tappa Anudan GR

Tappa Anudan GR

Twenty Percent Grant Tappa Anudan GR

टप्पा अनुदान अपडेट्स Tappa Anudan update

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे

जा.क्र.: प्राशिसं/खाप्राशा / ७७५३५५९/२०२६/ड-५०४

दिनांक: Digital Sign Date

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषदा, सर्व

   विषय-शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अपात्र ठरलेल्या तथापि, तदनंतर पात्र ठरत असलेल्या प्राथमिक शाळा व तुकड्या यांची माहिती सादर करणेबाबत.

संदर्भ-१. शासन निर्णय क्रः- माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दि.०६.०२.२०२३.

२. संचालनालयाचे पत्र क्रमांक: प्राशिसं/खाप्राशा/पटसंख्या/२०२५/ड-५०४/१५११२२०, दि. ०३/११/२०२५.

३. शासन पत्र क्रमांक: संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१०/एसएम-४, दिनांक:-०८.०७.२०२६.

संदर्भाधीन अ.क्र. १ चे शासन निर्णयानुसार सन २०२२-२३ वर्षाच्या संचमान्यतेनुसार, आधार पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निश्चित होणारा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुदानास पात्र ठरविण्यात आला आहे.

तथापि शासन निर्णय दिनांक ०६/०२/२०२३ मधील अटी च्या अनुषंगाने काही खाजगी प्राथमिक शाळा / वर्ग व तुकड्या या क्षेत्रिय स्तरावर अपात्र ठरल्या आहेत. सदर शाळा, वर्ग व तुकड्या या नंतरच्या सन २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार पात्र ठरत असल्याची निवेदने शासनास/संचालनालयास प्राप्त झाली आहेत.

त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, शासन निर्णय दि.०६.०२.२३ नुसार अनुदानास पात्र ठरलेल्या तथापि सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार क्षेत्रिय स्तरावर अपात्र ठरलेल्या परंतु, सन २०२३-२४ च्या अथवा त्यानंतरच्या संचमान्यतेनुसार पात्र ठरत असलेल्या प्राथमिक शाळा / तुकड्या व त्यावरील कार्यरत कर्मचारी संख्या यांची योग्य व अचूक एकत्रित माहिती संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सोबत दिलेल्या प्रपत्रात दिनांक १७/०७/२०२६ पर्यंत संचालनालयास सादर करावी.

विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास आपल्या माहिती अभावी सदरील शाळा अनुदानापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल याची नोंद घ्यावी.

Digitally signed by Sharad Shankargiri Gosavi Date: 16-07-2026 11:39:29

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.

सोबत – प्रपत्रे पीडीएफ लिंक

प्रत : १. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. दिपक गुंडमवार, कक्ष अधिकारी (एसएम-४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

_______ ALSO READ _______

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक),पुणे

शिसंमा-२०२६/शा.नि.६/०२/२०२३/पटसंख्या 2014536

Digital sign date
10 JUL 2026

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प.सर्व.

३. शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)

विषय – शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अपात्र ठरलेल्या तथापि, तदनंतर पात्र ठरत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्या यांची माहिती शासनास सादर करणेबाबत.

संदर्भ-

१. शासन निर्णय क्र, माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दि.०६.०२.२०२३.

२. संचालनालयाचे पत्र शिसंमा-२०२५ (एस-७)/१५८१०१५, दि.४/१२/२०२५

३. शासनपत्र क्रमांक-२०२६/प्र.क्र.१०/एसएम-४, दि.८/०७/२०२६

वरील विषयाबाबतचे संदर्भीय शासनपत्र सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.

संदर्भीय शासनपत्रामध्ये नमूद केल्यानुसार शासन निर्णय दि.०६/०२/२०२३ अन्वये, सन २०२२-२३ वर्षाच्या संचमान्यतेनुसार, आधार पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निश्चित होणारा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुदानास पात्र ठरविण्यात आला आहे.

२. उपरोक्त दि.०६/०२/२०२३ मधील सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार अपात्र ठरलेल्या परंतु, सन २०२३-२४ च्या अथवा त्यानंतरच्या संचमान्यतेनुसार पात्र ठरत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/ वर्ग व तुकड्या यांची माहिती शासनास सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत.

३.शा.नि.दि.६/०२/२०२३ अन्वये पात्र तथापि सन २०२२-२३ संचमान्यतेनुसार पटसंख्येअभावी अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या तथापि सन २०२३-२४ व २०२४-२५ संचमान्यतेनुसार शेवटच्या वर्गातील पटसंख्या निकषानुसार असलेल्या २० टक्के, ४० टक्के व ६० टक्के माध्यमिक शाळा व तुकडयांची माहिती आपले कार्यालयाकडून संचालनालयास यापूर्वी सादर करण्यात आलेली आहे. सदरची यादी सोबत जोडण्यात येत आहे.

सदर यादीची आपले स्तरावर पडताळणी करण्यात यावी. तसेच याव्यतिरिक्त सन २०२२-२३ संचमान्यतेनुसार पटसंख्येअभावी अपात्र ठरलेल्या तथापि सन २०२३-२४ व २०२४-२५ संचमान्यतेनुसार शेवटच्या वर्गातील पटसंख्या निकषानुसार असलेल्या माध्यमिक शाळा व शाळांमधील वर्ग/तुकड्या आपले स्तरावर शिल्लक असल्यास सदर माध्यमिक शाळा व तुकडयांचा सोबतच्या यादीत समावेश करून एकत्रित प्रस्ताव सोमवार दिनांक १३/०७/२०२६ रोजी संचालनालयास सादर करावा.

सदर दिनांकास माहिती प्राप्त न झाल्यास तसेच आपल्या माहितीअभावी सदरील शाळा अनुदानापासून वंचित राहील्यास त्याची सर्वस्वी आपली जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी.

Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 10-07-2026 19:29:50

सोबत- माध्यमिक शाळा/तुकड्या यादी पीडीएफ लिंक

(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रतः-१. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

२. दिपक गुंडमवार, कक्ष अधिकारी (एसएम-४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२

शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अपात्र ठरलेल्या तथापि, तदनंतर पात्र ठरत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्या यांची माहिती शासनास सादर करणेबाबत Tappa Anudan GR शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदानास पात्र प्राथमिक शाळा/तुकडयांची तपासणी करणेबाबत
शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अपात्र ठरलेल्या तथापि, तदनंतर पात्र ठरत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्या यांची माहिती शासनास सादर करणेबाबत Tappa Anudan GR शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदानास पात्र प्राथमिक शाळा/तुकडयांची तपासणी करणेबाबत

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मंत्रालय (विस्तार), दालन क्र.४३९, मुंबई

दिनांक:-०८.०७.२०२६.

क्रमांक:- संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१०/एसएम-४

तात्काळ

प्रति,
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय – शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अपात्र ठरलेल्या तथापि, तनंतर पात्र ठरत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्या यांची माहिती शासनास सादर करणेबाबत.

संदर्भ-

१. संचालक (प्राथमिक) म.रा., पुणे यांचे अहवाल दि.०९.०४.२०२६ व दि.३०.०६.२०२६ २. शासन निर्णय क्र, माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दि.०६.०२.२०२३.

महोदय,

संदर्भाधीन दि.०६.०२.२०२३ अन्वये, सन २०२२-२३ वर्षाच्या संचमान्यतेनुसार, आधार पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निश्चित होणारा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुदानास पात्र ठरविण्यात आला आहे.

२. तथापि, उपरोक्त अटी च्या अनुषंगाने काही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/ वर्ग व तुकड्या या अपात्र ठरल्या आहेत. सदर शाळा, वर्ग व तुकड्या या नंतरच्या सन २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार पात्र ठरत असल्याचे शासनास निवेदने प्राप्त झाली आहेत. तसेच सदंर्भ क्र.१ येथील अहवालामध्ये देखील काही शाळा अशा प्रकारे पात्र होत असल्याचे कळविले आहे.

३. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, उपरोक्त दि.०६.०२.२३ मधील सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार अपात्र ठरलेल्या परंतु, सन २०२३-२४ च्या अथवा त्यानंतरच्या संचमान्यतेनुसार पात्र ठरत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/ वर्ग व तुकड्या यांची माहिती आजच शासनास सादर करावी, ही विनंती.

(दीपक गुंडमवार) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत आवश्यक त्या कार्यवाहीस्तव :-

१. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन पूरकपत्र क्र. प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४
मंत्रालय (विस्तार), मुंबई ४०००३२

दिनांक :- २२ मे, २०२६

संदर्भ :-
१. शासन निर्णय उमावि-२०२३/प्र.क्र.९३/एसएम-४, दि. १५ मार्च, २०२४

२. शासन निर्णय क्र. प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि. २५ ऑगस्ट, २०२५

३. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा-२५/(ए-०२)/पटवर्धन /मुल्यांकन/ई. ऑ. ६१५७४८७/ एस-६, दि.१३ ऑक्टोबर, २०२५

प्रस्तावना :-

राज्य शासनाच्या मुल्यांकनाच्या सुधारीत निकषांनुसार पात्र होणाऱ्या शाळा व तुकड्यांना वेतन अनुदान टप्प्याटप्प्याने अनुज्ञेय करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर निकषांनुसार पात्र झालेल्या शाळा व तुकड्यांना राज्य शासनाद्वारे वेळोवेळी वेतन अनुदानाचा टप्पा अनुज्ञेय करण्यात आला आहे. तथापि मुल्यांकनानुसार पात्र होऊनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या शाळा/ तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रकरणातील मा. उच्च न्यायालयाचे आदेश, वित्त विभागाच्या दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने संदर्भ

क्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहे.

२. भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित कै. सौ. विजयालक्ष्मी श्रीकृष्ण गांधी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमान रमेशजी करीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी या कनिष्ठ महाविद्यालयास संदर्भक्र. २ येथील शासन निर्णयान्वये ४० टक्के अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे. आता, दि. २५ ऑगस्ट, २०२५ च्या शासन निर्णयामध्ये, दि. १५ मार्च, २०२४ रोजीच्या शासन निर्णयाचा समावेश करुन अनुदानाचा पुढील टप्पा अदा करण्याची विनंती शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये केली आहे.

संदर्भ क्र.२ येथील दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुदानास पात्र सर्व शाळा/महाविद्यालयांना सरसकट अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आला आहे. भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित कै. सौ. विजयालक्ष्मी श्रीकृष्ण गांधी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमान रमेशजी करीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी या कनिष्ठ महाविद्यालय या शाळांचा समावेश अनुदानित शाळांच्या यादीमध्ये करुन पुढील टप्पा अनुदानाकरीता या शाळांचा समावेश करुन क्षेत्रीय स्तरावरुन शासनास प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. तथापि, त्यानुसार कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. यास्तव शासन निर्णय दि.२५.०८.२०२५ मध्ये संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयाचा समावेश नसल्यामुळे, सदर शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्यासाठी शासन पूरकपत्र निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन पुरकपत्रः-

शासनाच्या उपरोक्त संदर्भ क्र. २ येथील दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी
यांना टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले आहे. उक्त दि. २५ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील वाचा येथील अ.क्र. (२५) नंतर खालील तक्त्यात नमूद केलेला शासन निर्णय समाविष्ट करण्यात येत आहे.

अ.क्र.

शासन निर्णय क्रमांक व दिनांक

(२६) क्र. उमावि-२०२३/प्र.क्र.९३/एसएम-४, दि.१५ मार्च, २०२४

२. सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in वर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेताक २०२६०५२२१३०१३०३९२१ असा आहे. हे शासन पूरकपत्र डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

DEEPAK

GANGADHAR GUNDAMWAR

(दीपक गुंडमवार) कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत
Tappa Anudan GR
राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत
Tappa Anudan GR

————- ALSO READ ————–

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे

स्मरणपत्र

शिसंमा-२०२६ (एस-७)/ टप्पा अनुदान / 1796238

Digital sign date 20 MAR 2026

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प.सर्व.

३. शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)

      विषयः- दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत.

संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांक प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.२५/०८/२०२५ २.जा.क्र.प्राशिसं/खाप्राशा/मुल्यांकन/२०२५/ड ५०४/०३७४५, दि.२९/०८/२०२५

३. संचालनालयाचे पत्र शिसंमा-२०२६ (एस-७)/ टप्पा अनुदान/१७४८२२४, दि.२७/०२/२०२६

वरील संदर्भीय पत्रे पाहावीत.

शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदान व नव्याने २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग/तुकडयासंदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणेबाबत आपणास निर्देश देण्यात आलेले आहेत.

शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अटी व शर्तीनुसार आपले स्तरावर २० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळा व तुकडयांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ५ दिवसात सादर करावेत. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्राप्त शालार्थ आयडी प्रस्तावाची पडताळणी करून १० दिवसात संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालर्थ आयडी देण्याची कार्यवाही आपणास वरील संदर्भ क्र.३ चे पत्रान्वये कळविण्यात आले होते.

सदर प्रकरणी आपले स्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा. तसेच शालार्थ आयडी अभावी २० टक्के अनुदानासाठी पात्र शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन अदा न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार आपली राहील याची नोंद घ्यावी.

Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 20-03-2026 16:02:4 (डॉ. महेश पालकर)

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रतः-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

२.मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा व तुकडयां मधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी प्रस्तावा बाबत Tappa Anudan GR शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदानास पात्र प्राथमिक शाळा/तुकडयांची तपासणी करणेबाबत
२० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा व तुकडयां मधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी प्रस्तावा बाबत Tappa Anudan GR शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदानास पात्र प्राथमिक शाळा/तुकडयांची तपासणी करणेबाबत

ALSO READ 👇

शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक), मध्यवर्ती इमारत, रोड, पुणे ४११ ००१.

शिसंमा-२०२६ (एस-७)/ टप्पा अनुदान /२६/०२/२०२६

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प.सर्व.

३. शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)

विषयः- दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत.

संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांक प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.२५/०८/२०२५ २.जा.क्र.प्राशिसं/खाप्राशा/मुल्यांकन/२०२५/ड ५०४/०३७४५, दि.२९/०८/२०२५

शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदान व नव्याने २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग/तुकडयासंदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणेबाबत आपणास निर्देश देण्यात आलेले आहेत.

शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अटी व शर्तीनुसार आपले स्तरावर २० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळा व तुकडयांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ५ दिवसात सादर करावेत. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्राप्त शालार्थ आयडी प्रस्तावाची पडताळणी करून १० दिवसात संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालर्थ आयडी देण्याची कार्यवाही करावी.

शालार्थ आयडी अभावी २० टक्के अनुदानासाठी पात्र शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन अदान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षण निरिक्षक (उ/द/प) आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेवर निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी.

Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 27-02-2026 13:56:57

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रतः-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडाविभाग, मंत्रालय, मुंबई-३२. २. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे

२० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा व तुकडयां मधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी प्रस्तावा बाबत
२० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा व तुकडयां मधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी प्रस्तावा बाबत

ALSO READ 👇

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय
महाराष्ट्र राज्य, पुणे

जा.क्र.: प्राशिसं/खाप्राशा/टप्पा अनुदान/२०२६/४-५०४/1722651
दिनांक : 13 FEB 2026

      आदेश:

विषय : शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदानास पात्र प्राथमिक शाळा/तुकडयांची तपासणी करणेबाबत.

संदर्भ :

११ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४० दिनांक २५/०८/२०२५.

२) संचालनालयाचे पत्र क्र.: प्राशिसं/खाप्राशा/मुल्यांकन/२०२५/४-५०४/०३७४५, दि २९/८/२०२५.

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदान व नव्याने २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग/तुकडया संदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणेबाबत क्षेत्रिय कार्यालयांना निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच सदर शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या प्राथमिक शाळा व तुकडयांपैकी सद्यस्थितीत आपले स्तरावर प्रत्यक्ष अनुदान वितरण आदेश दिलेल्या शाळा व तुकड्या तसेच अनुदान वितरण आदेश न दिलेल्या शाळा व तुकडया याबाबतचा अहवाल संचालनालयास सादर करणेबाबत आपणांस वेळोवेळी कळविण्यात आले आहे. शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अटी व शर्तीमधील अट क्र. १७ मध्ये पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.

अट क. १७ : दरवर्षी संबंधित शिक्षण संचालक स्तरावरुन या शासन निर्णयातील किमान ५ टक्के शाळांची ईश्वरचिड्डी पद्धतीने निवड करुन पडताळणीचा स्वंयस्पष्ट अहवाल शासन सादर करणे बंधनकारक राहील.

वरीलप्रमाणे नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील मुद्दा क्र. अ, ब, क व ड येथे नमूद करण्यात आलेल्या प्राथमिक शाळा व वर्ग/तुकडयांना आपल्या स्तरावरुन पात्र ठरवून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे अशा प्राथमिक शाळा व वर्ग/तुकडयांची तपासणी करण्याकरीता खालीलप्रमाणे जिल्हानिहाय पथक तयार करण्यात येत आहेत.

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद.

२) उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद.

३) अधीक्षक, सा.रा.से. (प्राथमिक) जिल्हा परिषद,

सदर तपासणी पथकाने त्यांना तपासणी करावयास दिलेल्या जिल्हयातील शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ नुसार २० टक्के, ४० टक्के, ६० टक्के व ८० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शाळांपैकी ५ टक्के शाळांची व वर्ग/तुकडयांची शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अटी व शर्तीनुसार सोबत दिलेल्या प्रपत्रात नमूद सर्व बाबींची दिनांक २०/०२/२०२६ ते १८/०३/२०२६ या कालावधीत तपासणी करुन त्यासंदर्भातील आपला स्वंयस्पष्ट अहवाल दिनांक २५/०३/२०२६ पर्यंत संचालनालयास समक्ष सादर करावा.

सोबत : प्रपत्र

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक

प्राथमिक शिक्षण संचालनालय,

महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रति,

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व.

२) उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व.

३) अधीक्षक, सा.रा.से. (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व.

यांना देऊन कळविण्यात येते की, आपल्या नावासमोर वर्शविलेल्या जिल्यातील शासन निर्णय दि. २५/०८/२०२५ नुसार २०/४०/६०/८० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शाळापैकी ५ टक्के शाळांची तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल सोबत दिलेल्या प्रपत्रात संचालनालयास सादर करावा.

प्रत: विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग यांना आवश्यक त्या कार्यवाहीस्तव.

प्रत माहितीस्तव सविनय सादर १) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२. २) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

परिपत्रक पीडीएफ लिंक

शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदानास पात्र प्राथमिक शाळा/तुकडयांची तपासणी करणेबाबत Tappa Anudan GR राज्यातील खाजगी विनाअनुदानीत व अंशतः अनुदानीत शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत
शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदानास पात्र प्राथमिक शाळा/तुकडयांची तपासणी करणेबाबत Tappa Anudan GR राज्यातील खाजगी विनाअनुदानीत व अंशतः अनुदानीत शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत

ALSO READ 👇

शिसंमा-२०२५ (एस-७)/ शाळा तपासणी
आदेश
दि.–/०१/२०२६
02 JAN 2026

विषयः- दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत.

संदर्भ :
१. शासन निर्णय क्रमांक प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.२५/०८/२०२५
२.जा.क्र. प्राशिसं/खाप्राशा/मुल्यांकन/२०२५/ड ५०४/०३७४५, दि.२९/०८/२०२५
३. शासनपत्र क्रमांकः प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.१३/१०/२०२५
४. शासनपत्र क्रमांकः प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.५/१२/२०२५

शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदान व नव्याने २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग/तुकडयासंदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणेबाबत आपणास वरील संदर्भ क्र.२ अन्वये निर्देश देण्यात आलेले आहेत.


सदर शासन निर्णयातील अटी व शर्तीमधील अट क्र. १७ मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. अट क्र.१७ :- दरवर्षी संबंधित शिक्षण संचालक स्तरावरून ५ टक्के शाळांची ईश्वर चिट्ठी पध्दतीने निवड करून पडताळणीचा स्वयस्पष्ट अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील.


वरीलप्रमाणे नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अ, ब, क व ड मधील नमूद माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील वर्ग/तुकडयांना आपले स्तरावरून पात्र ठरवून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे अशा सर्व माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील वर्ग/तुकडयांची तपासणी करणेबाबत खालीलप्रमाणे जिल्हानिहाय तपासणी पथक तयार करण्यात आलेले आहे.


१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प./शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)
२. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प./ शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)
३. अधीक्षक, सारासे, गट ब, जि.प./ बृहन्मुंबई (उ/द/प)


सदर तपासणी पथकातील सदस्यांनी त्यांना तपासणी करावयास दिलेल्या जिल्हयातील २० टक्के, ४० टक्के, ६० टक्के व ८० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सर्व माध्यमिक शाळा व वर्ग/तुकड्यांची शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अटी व शर्तीनुसार सोबतच्या विहित प्रपत्रात नमूद सर्व बाबींची दिनांक ५/०१/२०२६ ते दिनांक ३१/०१/२०२६ या कालावधीत तपासणी करून त्यासंदर्भातील आपला स्वयस्पष्ट अहवाल दिनांक २/०२/२०२६ रोजी समक्ष संचालनालयास सादर करावा.

परिपत्रक पीडीएफ लिंक

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे

Tappa Anudan GR राज्यातील खाजगी विनाअनुदानीत व अंशतः अनुदानीत शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत
Tappa Anudan GR राज्यातील खाजगी विनाअनुदानीत व अंशतः अनुदानीत शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत


Leave a Comment

error: Content is protected !!