Vyavsay Shikshan Abhyaskram

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मुंबई यांच्यामार्फत २२७ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबत.
दिनांक : २६ नोव्हेंबर, २०२६
संदर्भ :-
१. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२०, दिनांक २९ जुलै २०२०.
२. कुलगुरू, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मुंबई यांचे दिनांक ०२.०६.२०२६ रोजीचे पत्र.
३. केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या (PAB) सन २०२६-२७ मधील मंजुरीचे इतिवृत्त.
४. समग्र शिक्षा अंतर्गत व्यवसाय शिक्षणाबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या लागू मार्गदर्शक सूचना.
प्रस्तावना :-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर कौशल्याधारित व व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF) व केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या समग्र शिक्षा Framework नुसार व्यवसाय शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत.
केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळाने (PAB) राज्यातील ९७० शाळांमध्ये व्यवसाय शिक्षणाचे अभ्यासक्रम राबविण्यात मंजुरी दिलेली आहे. मंजूर शाळांपैकी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना वाटप केल्यानंतर उर्वरित २२७ शाळांमध्ये सन २०२६-२७ मध्ये व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना दिनांक २३.०३.२०२१ रोजी करण्यात आली असून, सदर विद्यापीठाचे नामकरण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मुंबई असे करण्यात आले आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामार्फत शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यवसाय शिक्षण उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक २ अन्वये शासनास प्राप्त झाला आहे.
सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील २२७ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ मार्फत समग्र शिक्षा फ्रेमवर्क व मार्गदर्शक सूचनानुसार राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन निर्णय :-
केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळाने (PAB) मंजूर ९७० शाळांपैकी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना वाटप केल्यानंतर उर्वरित २२७ शाळांमध्ये सन २०२६-२७ मध्ये व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामार्फत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मुंबई यांनी संबंधित शाळांमध्ये केंद्र शासन, समग्र शिक्षा Framework व NSQF मधील धोरणानुसार व्ययसाय शिक्षण अभ्यासक्रम राबविताना खालीलप्रमाणे अंमलबजावणी करावी :-
अ) समग्र शिक्षा आराखडा, राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF), राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF), राज्य अभ्यासक्रम आराखडा तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या लागू मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
आ) मंजूर व्यवसाय शिक्षण विषय/सेक्टर व विविध पदांनुसार कामाचे स्वरूप (Job Roles) अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करावी.
इ) संबंधित अभ्यासक्रमासाठी आवश्यक पात्र प्रशिक्षक, विषयतज्ज्ञ व इतर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.
ई) प्रत्यक्ष, मिश्रित (Hybrid) व अनुभवाधारित शिक्षणाची आवश्यक व्यवस्था करावी.
उ) लागू मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांना आवश्यक औद्योगिक प्रत्यक्ष अनुभव (Industry Exposure), कार्यातर्गत प्रशिक्षण (On-the-Job Training) व अंतर्वासिता (Internship) उपलब्ध करून द्यावी.
ऊ) विद्यार्थ्यांचे लेखी (Theory) व प्रात्यक्षिक (Practical) मूल्यमापन/परीक्षा लागू अभ्यासक्रम व सक्षम प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित कराव्यात.
ऋ) अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू NSQF व संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या निकषांनुसार प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.
ल) प्रशिक्षण, औद्योगिक प्रत्यक्ष अनुभव, कार्यांतर्गत प्रशिक्षण व अंतर्वासिता दरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षितता व आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची सुनिश्चिती करावी.
ऍ) विद्यार्थ्यांची नोंदणी, उपस्थिती, प्रशिक्षणाची प्रगती व मूल्यमापनाची नोंद निर्धारित पद्धतीने ठेवावी.
३. सदर २२७ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण राबविण्यासाठी आवश्यक कार्यादेश राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी शासनाचे नियम, धोरण व उपलब्ध वित्तीय तरतुदींच्या अधीन राहून निर्गमित करावा.
४. सदर कार्यादेशामध्ये संबंधित शाळांची यादी, मंजूर विषय/सेक्टर, कामाचे स्वरूप (Job Roles), कार्यकालावधी, विद्यार्थ्यांची संख्या, अपेक्षित शैक्षणिक निष्पत्ती, आवश्यक मनुष्यबळ, अहवाल सादरीकरणाची पद्धत व इतर आवश्यक अटी व शर्तीचा समावेश करावा.
५. सदर उपक्रमावरील खर्च समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत संबंधित वर्षासाठी मंजूर तरतुदींमधून, PAB ने मंजूर केलेल्या मर्यादेत व लागू वित्तीय नियमांनुसार करण्यात यावा. मंजूर तरतुदीपेक्षा अधिक खर्च करता येणार नाही.
६. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मुंबई यांनी उपक्रमाची प्रगती व आवश्यक अहवाल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेस सादर करावा. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत उपक्रमाचे नियमित निरीक्षण, संनियंत्रण व आढावा घेण्यात यावा. आवश्यकतेनुसार जिल्हा व शाळा स्तरावर प्रशासकीय व शैक्षणिक समन्वय साधण्यात यावा.
७. उपक्रमाच्या प्रगतीनुसार, विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रशिक्षणाची गुणवत्ता, उपलब्ध संसाधने व मूल्यमापनाच्या निष्कर्षांचा विचार करून पुढील टप्प्यात शाळांची संख्या वाढविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल.
८. या शासन निर्णयामुळे मंजूर PAB/समग्र शिक्षा तरतुदीपलीकडे शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही.
९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२६११२६१८३१५४१३४९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
TUSHAR VASANT MAHAJAN
Digitally signed by TUSHAR VASANT MAHAJAN DN-IN-GOVERNMENT OF MAHARASHTRA, OU-SCHOOL EDUCATION AND SPORT DEPARTMENT, 2.5.4.20-196c23510809269675db2359794523-8918118 634069a6cc7a72b, postalCode-400032, st-Maharashtra, rialNumber-1A39CEF3C157B0EE6A2ABE5779ACF233682613F7 B9C335068F4877267695CECA, TUSHAR VASANT MAHAJAN Date: 2026.11.26 18:33:09+05:30
(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२६/प्र.क्र. १२८/एस.डी.-६
मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२
Vyavsay Shikshan Abhyaskram
kaushalya vidyapeeth, mumbai yanchyamarfat 227 shalanmadhye vyavsay shikshan abhyaskram rabavinyas manyata denyababat