Eat Right Mela
Eat Right Mela
Regarding oEat Right Melarganizing a proper diet fair and essay competition and poster competition at school level in every district in the year 2026-27 under the “Good Diet – Movement, Maharashtra” campaign.
yogya aahar – chalval, maharashtr” mohimeantargat san 2026-27 madhye pratyek jilhyat yogya aahar melava v shaley staravar nibandh spardha, poster spardha aayojit karanyababat.
जा/असुमाका.क्र. Eat Right Mela/१८२५/२०२६/७
दिनांक : १६/११/२०२६
विषय :- "योग्य आहार - चळवळ, महाराष्ट्र" मोहिमेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात योग्य आहार मेळावा व शालेय स्तरावर निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आयोजित करण्याबाबत.
संदर्भ :- अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांचा सन २०२६-२७ चा मंजूर कृती आराखडा.
महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्यामार्फत “योग्य आहार चळवळ, महाराष्ट्र” ही मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये अन्न सुरक्षा, सकस व संतुलित आहार, सुरक्षित अन्न सेवन, आरोग्यदायी जीवनशैली तसेच शाश्वत अन्न पद्धतींबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे.
तसेच, भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) व FDA महाराष्ट्र राज्य याच्यातील सामंज्यस्य करार अंतर्गत मंजूर कृती आराखडा २०२६-२०२७ मध्ये योग्य आहार मेळावा (Eat Right Mela) या घटकासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक योग्य आहार मेळावा (Eat Right Mela) “योग्य आहार चळवळ, महाराष्ट्र “या मोहिमे अंतर्गत आयोजित करावा. सदर मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थी, नागरिक, अन्न व्यवसायिक व विविध शासकीय यंत्रणा यांचा सक्रिय सहभाग घेऊन अन्न सुरक्षा व आरोग्यविषयक जनजागृती करण्यात यावी.
सदर योग्य आहार मेळावा (Eat Right Mela) आयोजित करण्यापूर्वी सर्व जिल्ह्यामध्ये शालेय स्तरावर दोन गटांमध्ये निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. याबाबतची कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील.
१. निबंध स्पर्धेचे आयोजन
१. सदर निबंध स्पर्धा इयत्ता ५ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी दोन गटांत आयोजित करण्यात यावी.
२. स्पर्धेचे गट खालीलप्रमाणे राहतील.
गट १ – इयत्ता ५ वी ते ८ वी (लहान गट)
गट २ – इयत्ता ९ वी ते १२ वी (मोठा गट)
३. निबंधासाठी विषय खालीलप्रमाणे राहतील.
गट १ – इयत्ता ५ वी ते ८ वी
अ) आरोग्य हीच संपत्ती.
ब) निरोगी आयुष्य माझी भूमिका.
क) फळे आणि भाज्या खाऊया, निरोगी राहूया.
गट २ – इयत्ता ९ वी ते १२ वी
अ) अन्न सुरक्षा: निरोगी समाजाचा भक्कम पाया.
ब) जंक फूड संस्कृती आणि त्याचे दुष्परिणाम.
क) आरोग्यदायी सवयींची सुरुवात स्वतःपासून.
२. पोस्टर स्पर्धेचे आयोजन
१. सदर पोस्टर स्पर्धा इयत्ता ५ वी ते १२वी मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली राहील. निबंध स्पर्धेप्रमाणेच दोन गटांत स्पर्धा आयोजित करण्यात यावी.
गट १ – इयत्ता ५ वी ते ८ वी (लहान गट)
गट २ – इयत्ता ९ वी ते १२ वी (मोठा गट)
२. पोस्टर/चित्र काढण्यासाठी A३ आकाराच्याच ड्रॉइंग पेपरचा वापर करावा.
३. पोस्टर तयार करताना पोस्टर कलरचा वापर करावा.
४. पोस्टरमध्ये सकस व संतुलित आहार, अन्न सुरक्षा, अन्न भेसळ प्रतिबंध, सुरक्षित अन्न हाताळणी, निरोगी जीवनशैली, अन्नाची नासाडी टाळणे व शाश्वत अन्न पद्धती यांसारख्या विषयांवर आधारित सामाजिक जनजागृतीपर संदेश असावा.
५. पोस्टरमधील कल्पकता व सामाजिक संदेशास प्राधान्य देण्यात यावे. आवश्यकतेनुसार पोस्टरवर घोषवाक्य अथवा सामाजिक संदेश लिहिण्यास मुभा राहील.
३. निबंध व पोस्टर स्पर्धेसाठी सर्वसाधारण अटी व नियम
१. स्पर्धेतील सर्व नियम व अटींचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक स्पर्धकाची राहील.
२. निबंध A४ आकाराच्या कागदाच्या एकाच बाजूस विद्यार्थ्याच्या स्वहस्ताक्षरात लिहिलेला असावा.
३. निबंधासाठी शब्दमर्यादा ८०० ते १००० शब्द राहील.
४. निबंध व पोस्टर हे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेतून व विचारांतून तयार केलेले असावेत. सोशल मीडियावरून अथवा इतर स्रोतांवरून घेतलेले साहित्य ग्राह्य धरण्यात येणार नाही.
५. शाळा स्तरावर दोन्ही स्पर्धांचे आयोजन करून त्याबाबतचे छायाचित्र व सुमारे दोन मिनिटांचा व्हिडिओ तयार करण्यात यावा.
६. प्रत्येक शाळेने दोन्ही गटांमधून प्रत्येकी उत्कृष्ट ३ निबंध व उत्कृष्ट ३ पोस्टर तसेच उपक्रमाचे फोटो व विडीयो हे प्रशासनाच्या website-
वरती upload करावेत.
४. जिल्हास्तरीय निवड प्रक्रिया
१. संबंधित जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त निबंध व पोस्टर यांची जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्ह्यातून निबंध व पोस्टर स्पर्धेतील दोन्ही गटांमधून प्रत्येकी उत्कृष्ट ३ निबंध व उत्कृष्ट ३ पोस्टर निवडण्यात यावे व निवड झालेल्या दोन्ही गटांमधून प्रत्येकी उत्कृष्ट ३ निबंध व उत्कृष्ट ३ पोस्टर यांची physical copy प्राप्त करून घ्यावी.
२. जिल्ह्यातून निबंध व पोस्टर स्पर्धेतील दोन्ही गटांमधून प्रत्येकी उत्कृष्ट ३ निबंध व उत्कृष्ट पोस्टर तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा / स्पर्धकांचा सन्मान संबंधित जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या योग्य आहार मेळावा (Eat Right Mela) कार्यक्रमात करण्यात यावा. यावेळी विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात यावे.
५. विभागीय स्तरावरील निवड प्रक्रिया
१. प्रत्येक जिल्हास्तरावर निवड झालेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांमधून विभागीय स्तरावर स्वतंत्र निवड प्रक्रिया राबविण्यात यावी.
२. विभागीय स्तरावर निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धेमधून प्रत्येकी उत्कृष्ट ३ स्पर्धकांची निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा / स्पर्धकांचा सन्मान संबंधित विभागात आयोजित करण्यात येणाऱ्या Eat Right Mela कार्यक्रमात करण्यात करण्यात यावा. यावेळी विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात यावे.
३. विभागीय स्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांचे निबंध व पोस्टर यांची प्रत, स्पर्धकांचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तालुका व जिल्हा या तपशिलांसह दोन्ही गटांमधून प्रत्येकी उत्कृष्ट ३ निबंध व उत्कृष्ट ३ पोस्टर यांची physical copy अन्न व औषध प्रशासन, मुख्यालय, मुंबई येथे पाठविण्यात यावी.
६. राज्यस्तरावरील निवड प्रक्रिया
विभागीय स्तरावरून प्राप्त उत्कृष्ट ३ निबंध व उत्कृष्ट ३ पोस्टर यांमधून राज्यस्तरावर अंतिम ३ क्रमांकांची निवड करण्यात येईल. व त्यातील अंतिम तीन विजेत्यांचा सन्मान मा. अन्न सुरक्षा आयुक्तांमार्फत मुंबई येथे करण्यात येईल.
७. जिल्हास्तरीय Eat Right Mela चे आयोजन १. प्रत्येक विभागीय सह आयुक्त (अन्न) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक Eat Right Mela आयोजित करावा.
२. सदर मेळाव्याचे आयोजन करताना अन्न सुरक्षा, सकस व संतुलित आहार, अन्न भेसळ प्रतिबंध, सुरक्षित अन्न हाताळणी, आरोग्यदायी जीवनशैली व शाश्वत अन्न पद्धती याबाबत जनजागृती करणारे विविध उपक्रम राबविण्यात यावेत.
३. Eat Right Mela च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासांठी Walkathon किंवा Cycle Rally यापैकी किमान एका उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
४. सदर मेळाव्यामध्ये निबंध व पोस्टर स्पर्धेतील जिल्हास्तरीय विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात यावे.
५. मेळाव्यामध्ये अन्न सुरक्षा व आरोग्यविषयक जनजागृतीपर प्रदर्शन, माहितीपर स्टॉल्स, पथनाट्य, प्रात्यक्षिके व इतर नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करावे.
६. मेळाव्यामध्ये स्थानिक आहार तज्ञ, डॉक्टर्स यांची मदत घ्यावी.
७. समन्वय व अंमलबजावणी
१. सदर उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालये, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद तसेच इतर संबंधित शासकीय व निमशासकीय संस्थांशी समन्वय साधण्यात यावा.
२. विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळविण्याच्या दृष्टीने संबंधित शैक्षणिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात.
३. संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) व पदनिर्देशित अधिकारी यांनी स्थानिक पातळीवर आवश्यक नियोजन करून सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा.
४. सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांनी त्यांच्या विभागातील जिल्हानिहाय Eat Right Mela आयोजनाचे नियोजन, स्पर्धांचे आयोजन, निवड प्रक्रिया व पारितोषिक वितरण याबाबत समन्वय साधून कार्यवाही करावी.
८. अहवाल सादर करणे
सदर उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, विभागीय स्तरावरील निवड प्रक्रिया, Eat Right Mela तसेच Walkathon/Cycle Rally यांची छायाचित्रे, व्हिडिओ, सहभागी विद्यार्थ्यांची संख्या, विजेत्यांची माहिती व कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल मुख्यालयास jcfoodhq२२@gmail.com या ई-मेल वर सादर करावा.
तरी, उपरोक्त सूचनांनुसार आपल्या विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक Eat Right Mela आयोजित करण्यासाठी आवश्यक ते नियोजन खालील प्रमाणे करावे.
अनु.क्र. कारवाई प्रस्तावित दिनांक
१. शालेय स्तरावर स्पर्धांचे आयोजन
१/१२/२०२६ ते १५/१२/२०२६
२. जिल्हास्तरावर स्पर्धकांची निवड
१६/१२/२०२६ ते ३१/१२/२०२६
३. विभाग स्तरावर स्पर्धकांची निवड
१/१/२०२७ ते ७/१/२०२७
४. मुख्यालय स्तरावर स्पर्धकांची निवड
८/१/२०२७ ते १०/१/२०२७
५. cycle rally/Walkathon
११/१/२०२७ ते १७/१/२०२७
६. Eat Right Mela
१८/१/२०२७ ते २४/१/२०२७
तसेच, जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावरील निवड प्रक्रिया निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण करावी. सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी. सदर बाबीस प्राधान्य देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.
Digitally signed by TUKARAM H MUNDHE Date: 16-11-2026 17:17:25
(तुकाराम मुंढे) भा. प्र. से. अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म.राज्य,
