Tappa Anudan GR राज्यातील खाजगी विनाअनुदानीत व अंशतः अनुदानीत शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत

Tappa Anudan GR

Tappa Anudan GR

Twenty Percent Grant Tappa Anudan GR

शिसंमा-२०२५ (एस-७)/ शाळा तपासणी
आदेश
दि.–/०१/२०२६
02 JAN 2026

विषयः- दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत.

संदर्भ :
१. शासन निर्णय क्रमांक प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.२५/०८/२०२५
२.जा.क्र. प्राशिसं/खाप्राशा/मुल्यांकन/२०२५/ड ५०४/०३७४५, दि.२९/०८/२०२५
३. शासनपत्र क्रमांकः प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.१३/१०/२०२५
४. शासनपत्र क्रमांकः प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.५/१२/२०२५

शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदान व नव्याने २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग/तुकडयासंदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणेबाबत आपणास वरील संदर्भ क्र.२ अन्वये निर्देश देण्यात आलेले आहेत.


सदर शासन निर्णयातील अटी व शर्तीमधील अट क्र. १७ मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. अट क्र.१७ :- दरवर्षी संबंधित शिक्षण संचालक स्तरावरून ५ टक्के शाळांची ईश्वर चिट्ठी पध्दतीने निवड करून पडताळणीचा स्वयस्पष्ट अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील.


वरीलप्रमाणे नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अ, ब, क व ड मधील नमूद माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील वर्ग/तुकडयांना आपले स्तरावरून पात्र ठरवून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे अशा सर्व माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील वर्ग/तुकडयांची तपासणी करणेबाबत खालीलप्रमाणे जिल्हानिहाय तपासणी पथक तयार करण्यात आलेले आहे.


१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प./शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)
२. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प./ शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द/प)
३. अधीक्षक, सारासे, गट ब, जि.प./ बृहन्मुंबई (उ/द/प)


सदर तपासणी पथकातील सदस्यांनी त्यांना तपासणी करावयास दिलेल्या जिल्हयातील २० टक्के, ४० टक्के, ६० टक्के व ८० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सर्व माध्यमिक शाळा व वर्ग/तुकड्यांची शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अटी व शर्तीनुसार सोबतच्या विहित प्रपत्रात नमूद सर्व बाबींची दिनांक ५/०१/२०२६ ते दिनांक ३१/०१/२०२६ या कालावधीत तपासणी करून त्यासंदर्भातील आपला स्वयस्पष्ट अहवाल दिनांक २/०२/२०२६ रोजी समक्ष संचालनालयास सादर करावा.

परिपत्रक पीडीएफ लिंक

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे

Tappa Anudan GR राज्यातील खाजगी विनाअनुदानीत व अंशतः अनुदानीत शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत
Tappa Anudan GR राज्यातील खाजगी विनाअनुदानीत व अंशतः अनुदानीत शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत

Read More

Leave a Comment

error: Content is protected !!