Shikshan Sevak Tin Vetan Vadh
Shikshan Sevak Tin Vetanwadha
Shikshan Sevak Tin Warshik Vetanwadhi
Shikshan Sevak Three Annual
salary increment
शिक्षण सेवक तीन वेतन वाढ
महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग,मुंबई
क्र. न्यायाप्र-२०२३/प्र.क्र.२४५/१९२९७५६/आस्था-१४
दिनांक :- २० नोव्हेंबर, २०२६
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड
विषय :- रिट याचिका क्र. ११५५८/२०२४ श्री. माधव दत्तात्रय लोलमवाड आणि इतर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर
संदर्भ :- सहायक सरकारी वकील, मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांचे दि.२६.१०.२०२६ रोजीचे पत्र त्यासोबतच्या दि.१५.१०.२०२६ रोजीच्या मा. न्यायालयाच्या आदेशासह.
महोदय,
उपरोक्त रिट याचिका क्र.११५५८/२०२४ मध्ये मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी दि.१५.१०.२०२६ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, श्री. माधव दत्तात्रय लोलमवाड यांची प्रथम नेमणुक ही शिक्षण सेवक पदावर दि.१९.११.२००१ पासून मानधन तत्वावर करण्यात आली होती.
२. शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय दि.१०.०३.२००० व दि.२७.०२.२००३ अन्वये शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त अनुदानित व विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार शिक्षण सेवकांची नियुक्ती ही प्राथमिक शाळांवर मानधनावर करावयाची आहे. तसेच या शिक्षकांना नियमित स्वरुपात नियुक्त केलेल्या प्राथमिक शिक्षकांचे किंवा शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ अनुज्ञेय असणार नाहीत. त्याचप्रमाणे शिक्षण सेवक पदावर तीन शैक्षणिक वर्षे समाधानकारक काम केल्यानंतर संबंधित उमेदवाराला प्राथमिक शिक्षकांच्या नियमित पदावर नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती दयावयाची आहे.
३. श्री. लोलमवाड यांची शिक्षण सेवक पदावरील नियुक्ती ही शालेय शिक्षण विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयांतील तरतुदीनुसार व या शासन निर्णयात नमुद अटी शर्तीनुसार मानधन तत्वावर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेता, श्री. लोलमवाड यांनी दि.१९.०८.२०२४ रोजीच्या निवेदनान्वये केलेल्या मागणीनुसार (याचिके सोबत Exhibit G) त्यांना शिक्षण सेवक पदावरील दि.१९.११.२००१ ते दि.१८.११.२००४ या तीन वर्षाच्या कालावधीच्या वेतनवाढी व त्यास अनुसरुन अन्य अनुषंगिक लाभ अनुज्ञेय करता येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. श्री. लोलमवाड यांनी शासन स्तरावर सादर केलेली सर्व निवेदने निकाली काढण्यात आलेली आहेत.
४. श्री. लोलमवाड यांनी उपरोक्त दि.१९.०८.२०२४ रोजी दिलेले निवेदन हे सचिव (ग्राम विकास), सचिव (शालेय शिक्षण) व सचिव (वित्त) यांना सादर केलेले आहे. तथापि, याचिकाकर्ता श्री. माधव लोलमवाड हे जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत केंद्रप्रमुख पदावर कार्यरत असल्यामुळे ते ग्राम विकास विभागाच्या अधिनस्थ आहेत. त्यामुळे त्यांच्या निवेदनावर प्रतिवादी क्र.१ सचिव (वित्त) यांचेवतीने प्रतिवादी क्र.२ सचिव (ग्राम विकास) यांनी उपरोक्त प्रमाणे घेतलेला निर्णय संबंधितांना तात्काळ कळविण्यात यावा व त्याची पोहोच शासनास सादर करण्यात यावी, ही विनंती.
आपली,
(ज्योत्स्ना अर्जुन) अवर सचिव, महाराष्ट्र शासन.
प्रत उचित कार्यवाहीकरिता अग्रेषितः शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड.
प्रत माहितीस्तव :-
१) उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
२) उप सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.