Maha School GIS Mobile App Link
Maha School GIS Mobile App Link
Regarding recording school location information through mobile app in U-DISE Plus system for the year 2025-26. (U-DISE Plus – GIS Capture Mobile App)
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
क्रमांकः-शिसं/जिओ टॅगिग/एस-४/२०२६
दिनांकः /०५/२०२६
विषयः राज्यातील सर्व शाळांचे "Maha School GIS" अॅपवर जिओ टॅगिंग करणेबाबत.
संदर्भः
१. शिक्षण आयुक्तालयाचे क्र. आशिका /२०२५/Geo tagging/ईगव्ह-१४३, दि.१९/१२/२०२५ रोजीचे पत्र
२. शिक्षण आयुक्तालयाचे क. आशिका/२०२५/एमआरसेंक/ईगव्ह १४३, दि.१९/१२/२०२५ रोजीचे पत्र
३. शासन परिपत्रक क्र. इंगव्ह २०२५/प्रक्र७/संगणक दिनांक २३/०४/२०२५ रोजीचे पत्र
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये “Maha School GIS” अॅपवर जिओ टॅगिंग करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या. तथापी सोबत जोडलेल्या विविरणनुसार अद्यापही राज्यातील एकुण २२१८ शाळा “Maha School GIS” अॅपवर जिओ टॅगिंग न झालेले दिसत आहेत. करीता संबंधित सर्व शिक्षणाधिकारी सर्व संबंधित अधिक्षक वेतन पथक (प्राथ/माध्य) सर्व यांनी आपल्या जिल्हयातील मुख्याध्यापक यांना सुचित करून प्रलंबित “Maha School GIS” अपवर जिओ टॅगिंग करणेबाबतची कार्यवाही दि.१३/५/२०२६ रोजी पर्यंत पूर्ण करावी.
सोबत प्रलंबित शाळा यादीसाठी स्पर्श कराल
आपल्या शाळेचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले किंवा नाही ? पाहण्यासाठी या लिंकवर आपल्या शाळेचा यु-डायस क्रमांक टाका
👇👇👇👇👇👇👇👇
Digitally signed by SHRIRAM MAHADIRANZADE Date: 05-21:30:43
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे
प्रत
१. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांना माहितीस्तव सविनय सादर
२.श्री. प्रमोद कदम, कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग माहितीस्तव (एसएम-२)
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व
३. शिक्षणाधिकारी वृन्हमुंबई महानगरपालिका
४. शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/दक्षिण पश्चिम)
५. प्रशात्तन अधिकारी, मनपा/नपा सर्व
६. वेतन पथक अधिक्षक (प्राथ / माध्य) सर्व

ALSO READ 👇
निपुण भारत
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२५-२६/३7१३
दिनांक : 112 DEC 2025
विषयः सन २०२५-२६ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेच्या ठिकाणाची माहिती मोबाईल अॅपद्वारे नोंदविणेबाबत. (U-DISE Plus – GIS Capture Mobile App)
संदर्भ: केंद्र शासनाचे D.०.२३-५/२०२५-Stats दि. ०२ डिसेंबर, २०२५ रोजीचे पत्र.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी शाळेच्या ठिकाणाची (अक्षांश व रेखांक्ष) अचूक माहिती मोबाईल अॅपद्वारे (U-DISE Plus GIS Capture Mobile App) नोंदविण्याकरिता मोबाईल अॅप दि. ०२ डिसेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय सूचना केंद्र, नवी दिल्ली यांच्या सहाय्याने विकसित करून प्रसिध्द केले आहे. सदर अॅपद्वारे संगणकीकृत केलेल्या माहितीचा उपयोग केंद्र/राज्य/जिल्हा/तालुका स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी, नियोजन, शैक्षणिक संसाधने, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, ग्राफिकल विश्लेषण करण्यासाठी करण्यात येणार आहे.
सदरचे अॅप हे Android व IOS ऑपरेटिंग स्टिम असलेल्या मोबाईलवरती इंस्टॉल करण्यासाठी सर्व शाळांना Google Play Store व Apple App Store उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मोबाईलमध्ये U-DISE Plus GIS Capture अॅप इंस्टॉल करून यु-डायसच्या लॉगिन व पासवर्डद्वारे मोबाईल अॅपमध्ये लॉगिनकरून शाळेच्या ठिकाणाची माहिती अचूक नोंदवावी. U-DISE Plus – GIS Capture अॅप वापरण्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना पत्रासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत काही अडचणी आल्यास तालुका/जिल्हा/राज्य स्तरावरील संगणक प्रोग्रामर, MIS-Co-ordinator व ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधावा.
याबाबत आपणास कळविण्यात येते की, जिल्ह्यातील सर्व शाळांना GIS Capture Mobile App द्वारे शाळेच्या ठिकाणाची माहिती मार्गदर्शक सूचनानुसार तात्काळ नोंदविण्याकरिता आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
सोबत : केंद्र शासनाचे पत्र व मार्गदर्शक सूचना.
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रति,
१) मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
३) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई.
Maha School GIS Mobile App Link
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी बेझंट रोड., पुणे
क्र. आशिका/२०२५/एमआरसेंक / इंगव्ह. १४३/1195807/2025
दि. ३०/०४/२०२५
विषय : राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करणेबाबत… “Maha School GIS” मोबाईल अॅप
संदर्भ
: १. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर (MRSAC) सोबत दि.०४.०२.२०२५ रोजीचा करारनामा
२. शासन परिपत्रक क्रमांक: ईगव्ह-२०२५/प्र.क्र.७/संगणक, दिनांक २३ एप्रिल, २०२५
विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र. (२) वरील शासन परिपत्रकाचे अवलोकन व्हावे. (सोबत प्रत)
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टंग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे (geospatial technology) सर्व माहिती एकत्रित करण्याकरीता Mobile App: “Maha School GIS” अॅप विकसित करण्यात आले आहे.
सदर मोबाईल अॅप मध्ये शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडयस प्लस मधील संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावयाचे आहे. त्यानंतर शाळेची युडयस प्लस मध्ये भरलेली माहिती या अॅपमध्ये दिसेल. त्यानंतर शाळेचे GIS Location (Latitude & Longitude with time stamp) Capture करुन शाळेचे नावासह फोटो, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे फोटो समाविष्ट करुन संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो / माहिती अद्ययावत करावयाची आहे.
या संदर्भात दिनांक १७.०४.२०२५ रोजीच्या व्हीसीव्दारे बैठकीमध्ये सर्व क्षेत्रिय कार्यालयांना अॅपच्या वापराबाबत डेमो व इतर सर्व आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार “Maha School GIS” मोबाईल अॅप, युजर मॅन्यूअल व व्हिडिओ लिक ही सर्व शाळांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सर्व शाळांकडून दिनांक १९.०४.२०२५ पासून सदरची माहिती भरुन पाठविण्याबाबत क्षेत्रिय अधिका-यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर बैठकीसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत जिल्हा प्रोग्रामर तसेच तालुका एमआयएस कॉर्डिनेटर हे देखील उपस्थित होते. जिल्हा प्रोग्रामर व तालुका एमआयएस कॉर्डिनेटर यांच्या मदतीने सर्व शाळा मॅप होतील याची शिक्षणाधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
School Mapping चा अहवाल पाहण्याची सुविधा
या लिंकव्दारे Reports या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या रिपोर्टमध्ये एकूण शाळा, त्यापैकी मॅप/अनमॅप शाळा यांचा जिल्हा/तालुका/शाळानिहाय सविस्तर अहवाल उपलब्ध आहे. जिल्हयातील अनमॅप शाळांच्या रिपोर्टनुसार संबंधीत शिक्षणाधिकारी यांनी दररोज आढावा घेऊन सर्व शाळांचे मॅपिंग पूर्ण करावयाचे आहे.
प्रत्येक शाळा व्यवस्थित व योग्य ठिकाणी मॅप झाली आहे या बाबतची खात्री
या लिंकवर करावी. शाळेचे नोंदविलेले ठिकाणामध्ये तफावत दिसून येत असल्यास सदर शाळेची माहिती पुन्हा नव्याने मॅप करावी. त्यासाठी पूर्वी मॅप केलेली माहिती डिलीट करण्याची आवश्यकता नाही, नव्याने शाळा मॅप केल्यानंतर पूर्वीच्या माहितीवर नवीन मॅप केलेली माहिती ओव्हरराईट होते व नव्याने भरलेली माहिती मॅप होते,
विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नियमित आढावा घेऊन विभागातील सर्व शाळांचे मंपिंग पूर्ण झालेबाबत खात्री करावी. विभागातील मॅप व अनमॅप शाळांची यादी दिलेल्या लिंक वरुन उपलब्ध करुन घेऊन आढावा घ्यावा. व त्यानुसार राज्यातील सर्व शाळांचे मॅपिंग विहित कालमर्यादेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा
(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.) आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे
२. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
३. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
४. शिक्षणाधिकारी (मनपा) (सर्व)
५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व
६. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)


