Caste Validity Certificate Appeal
Caste Validity Certificate Appeal
jaat vaidhata pramanpatra apeel
Caste Validity Certificate Appeal
jaat vaidhata pramanpatra padtalni apeel pradhikaran
Caste Validity Certificate Verification Appellate Authority
maharashtra anusuchit jati, anusuchit jamati, vimukta jati, bhatkya jamati, itar magasvarg v vishesh magas pravarg jatiche pramanpatra (denyache v tyachya padtalniche viniyaman) (sudharana) adhinium, 2026
Maharashtra Scheduled Castes, Scheduled Tribes, Deemukt Castes, Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Classes Caste Certificates (Regulation of Issue and Verification thereof) (Amendment) Act, 2026
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष १२, अंक १२२ (५)]
सोमवार, ऑगस्ट १०, २०२६/श्रावण १९, शके १९४८
[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४३५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
आदिवासी विकास विभाग,मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक १० ऑगस्ट, २०२६
अधिसूचना
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२६.
क्रमांक एसटीसी-२१२०/प्र.क्र.१३७/का.१०. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२६ (२०२६ चा महा. ३८) याच्या कलम ६ख च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीबाबत छाननी समितीने पारित केलेल्या आदेशांच्या संदर्भात, “अपील प्राधिकरण” म्हणून त्या त्या महसूल विभागासाठी नियुक्त केलेल्या विभागीय आयुक्तांना विनिर्दिष्ट करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
विजय वाघमारे, शासनाचे सचिव.
