Sanskrut Divas Sanskrut Saptah
Sanskrut Divas Sanskrut Saptah
Sanskrut Divas 27 August 2026 aani Sanskrut Saptah 24 August te 30 August 2026 ya kalavadhit sajara karane babat
Regarding the celebration of Sanskrit Day 27th August 2026 and Sanskrit Week from 24th August to 30th August 2026
जा.क्र. शिसंमा/संकीर्ण/संस्कृतसप्ताह/२०२६/ए-१/विद्या शाखा
दिनांक :- स्वाक्षरीचे खाली नमूद असले प्रमाणे
विषयः- संस्कृत सप्ताह साजरा करणे बाबत.
संदर्भ :- शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२६/प्र.क्र. १७८/एस.डी.-४, दिनांक १० ऑगस्ट २०२६.
उपरोक्त संदर्भिय शासन पत्रान्वये आपणास कळविण्यात येते की, संस्कृतभारती विद्यालयीन शिक्षा प्रमुख (महाराष्ट्र, गुजरात, गोवा), संस्कृत भारती यांचे पत्र, दि. २९/०६/२०२६ (प्रत सलंग्न) उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधिन शासन पत्रान्वये संस्कृत सप्ताह साजरा करणेबाबत कळविण्यात आले आहे.
१. भारताच्या प्राचीन परंपरेचा ठेवा म्हणजेच संस्कृत भाषा, संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी देशातील आणि विदेशातील विविध अभ्यासक कायम उत्सुक असतात. या भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भारतात आणि विदेशातही विविध संस्था, संघटना कार्यरत आहेत. भारतातील आणि विदेशातीलही विविध शाळा महाविद्यालय आणि विश्वविद्यालयांमध्ये या भाषेचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाचे कार्य कायम चालू आहे. महाराष्ट्रात विविध भाषा प्रचारासाठी आणि जागृतीसाठी विविध भाषा दिन साजरे करण्यात येतात.
२. संस्कृत दिवस साजरा करणे १९६९ या वर्षापासून सुरू झाले. तसेच संस्कृत सप्ताह साजरा करणे २००० या वर्षापासून सुरू झाले. केंद्र शासनाच्या योजनेतून नारळी पौर्णिमेपूर्वीचे तीन दिवस आणि नंतरचे तीन दिवस असे सात दिवस संस्कृत सप्ताह साजरा करण्यासंबंधी परिपत्रक प्रचारित करण्यात आले आहे. यावर्षी संस्कृत दिवस २७ ऑगस्ट २०२६ आणि संस्कृत सप्ताह २४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत असणार आहे.
३. महाराष्ट्रातही राज्य सरकारच्या अखत्यारितील सर्व शाळांमध्ये संस्कृत दिवस किंवा संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे. त्यामुळे संस्कृत संबंधी अधिकाधिक प्रचार आणि प्रसार होऊन आपल्या मराठी या राज्यभाषेच्या पोषणासाठीही उपयुक्त कार्य होण्यास मदत होणार आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील भारतीय ज्ञान विज्ञान परंपरेचा प्रचारही होण्यास उपयुक्त वातावरण निर्माण होईल. या कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्कृत विषयी आपल्या भावना प्रगट करण्याचे एक संधी विद्यार्थ्यांना मिळेल. संस्कृत दिवस किंवा संस्कृत सप्ताह साजरा करण्याविषयीची विनंती संदर्भाधिन पत्रान्वये केली आहे. यानुषंगाने, संस्कृत दिवस आणि संस्कृत सप्ताह साजरा करण्यासंबंधी आपण आपल्या स्तरावरून आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व
माध्यमांच्या शाळांना कळवावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा. Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 12-08-2026 18:38:35
Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 12-08-2026 19:17:04
(शरद गोसावी) शिक्षण संचालक, (प्राथमिक शिक्षण संचालनालय), महाराष्ट्र राज्य, पुणे
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.
