Issue And Verification Of Caste Certificates
Issue And Verification Of Caste Certificates
SC VJNT OBC SBC Regulation Of Issue And Verification of Caste Certificates
These rules may be called the Maharashtra Scheduled Castes, Deemed Castes, Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Classes
(Regulation of Issue and Verification of Caste Certificates) (Amendment) Rules, 2018.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-४०० ०३२, दिनांक ३ जुलै, २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २०००.
क्रमांक-सीबीसी-१०-२०१७-प्र.क्र.२१९-मावक :-
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (सन २००१ चा महा. २३) याच्या कलम १८ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि याबाबतीत त्यास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे पुढील नियम करीत आहे सदर नियम उक्त अधिनियमाच्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक केल्याप्रमाणे याआधीच प्रसिद्ध करण्यात आले आहेत :-
१. या नियमांस, महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग
(जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०१८ असे म्हणावे.
२. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ याच्या नियम ४ मधील, उप-नियम (२) मधील खंड (च) ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल :-
(च) पुढील कागदपत्रांसह, इतर संबंधित लेखी पुरावा, कोणताही असल्यास,
(एक) वडील, काका, आत्या किंवा आजोबा किंवा आजोबांचे भाऊ किंवा बहीण किंवा पणजोबा किंवा पणजोबाचे भाऊ किंवा बहीण, वडिलांकडील रक्ताचे नातेवाईक यांचा शाळा नोंदवहीतील उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म आणि मृत्यु नोंदवही किंवा इतर कोणत्याही शासकीय किंवा निम-शासकीय कागदपत्रांतील जातीच्या नोंदींचा उतारा ;
(दोन) वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांचा जन्म आणि मूत्यु नोंदवहीतील उतारा (गावाची नोंदवही नमुना
क्रमांक-१४), स्थानिक स्वराज्य संस्थांची कागदपत्रे;
(तीन) संबंधित जातप्रवर्गाच्या मानीव दिनांकापूर्वी नोंदविण्यात आलेली वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांच्या कागदपत्रात नमूद करण्यात आलेली जातीची नोंद, उदा. जमीन, घर किंवा इतर स्थावर संपदेच्या विक्री किंवा खरेदी विलेख, गहाणखत, करारनामा, इनाम सनद ज्याद्वारे हक्क हस्तांतरित केले गेले असतील;
(चार) मुख्यतः औरंगाबाद महसुली विभागाकडील राष्ट्रीय नोंदवही यातील वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांच्या
जातीची नोंद ;
(पाच) विदर्भातील जमिनीच्या संदर्भातील कागदपत्रातील खासकरून कोतवाल किंवा कोतवार पुस्तकातील वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांच्या जातीची नोंद, खस-याचा उतारा, इत्यादी किंवा वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांच्या जन्म आणि मृत्यु दाखल्यातील जातीची नोंद;
(सहा) पुराभिलेख संचालनालयातील अभिलेखात उपलब्ध असलेले जातीचा पुरावा देणारे इनाम जमिनिशी संबंधित कागदपत्रे उदा. लेखी विवरणपत्र, मौखिक पुरावा, पुर्शिस, वंशावळ, इत्यादी;
(सात) गाव फेरफार नोंदवहीतील जातीच्या नोंदीचा क, ड, ई पत्राच्या नमुन्यातील कागदपत्रे, जुन्या न्याय प्रक्रियांमधील कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या रक्ताच्या नातेवाईकांच्या जातीच्या नोंदी;
(आठ) वडिलांकडील रक्ताच्या सख्ख्या नातेसंबंधात पूर्वजांच्या संदर्भात मानीव दिनांकापूर्वी जुन्या जाती व्यवस्थेतील परंपरागत व्यवसायाची नोंद करण्यात आलेले शासकीय आणि निमशासकीय प्रमाणपत्र;
(नऊ) आडनावाऐवजी परंपरागत व्यवसायाचा जात म्हणून नोंद असलेला जुना अभिलेख ;
(दहा) मानीव दिनांकापूर्वीची सनद किंवा कामकाज, ज्यात महाराष्ट्र कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम,
१९४८ (१९४८ चा ६७) किंवा इतर कोणत्याही कायद्यातील तरतुदींनुसार कुळास जमिनीचा मालक म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि जातीची नोंद करण्यात आली आहे;
(अकरा) मानीव दिनांकापूर्वी जनगणनेच्या अभिलेखात घेण्यात आलेल्या जातीच्या नोंदी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
Issue And Verification Of Caste Certificates
