स्वच्छता पखवाडा २०२६ अंतर्गत शाळांमध्ये ई-कचरा जनजागृती आणि संकलन मोहीम राबविणेबाबत Swachchata Pakhvada

Swachchata Pakhvada

Swachchata Pakhvada

Cleanliness Fortnight 2026

Swachchata Pakhvada Upkram

Cleanliness fortnight activities

Swachchata Pakhvada 2026 antargat shalanmadhye e-kachara janjagruti aani sankalan mohim rabavinebabat

Regarding implementation of e-waste awareness and collection campaign in schools under Swachhta Pakhwada 2026

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

क्र.शिसंमा/संकीर्ण / ई-कचरा जनजागृती आणि संकलन मोहीम / २०२६ / विद्या शाखा / ए-२/

दिनांक १६/१०/२०२६
महत्वाचे/कालमर्यादित/ई-मेल व्दारे

विषयः- स्वच्छता पखवाडा २०२६ अंतर्गत शाळांमध्ये ई-कचरा जनजागृती आणि संकलन मोहीम राबविणेबाबत.

संदर्भ :- १. श्री. अमरप्रित दुग्गल, सह सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक २७/०८/२०२६.
२. शासन पत्र क्रमांक संकीर्ण २०२६/प्र.क्र.२००/एस.डी.४ दिनांक ४ सप्टेंबर, २०२६.

हेही वाचाल –


अधिक जाणून घ्या Eco clubs for Mission LIFE बद्दल या ओळीला स्पर्श करून

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, भारतामध्ये दरवर्षी लाखों टन ई-कचरा निर्माण होतो. ई-कचऱ्याच्या पुनर्वापरामुळे माती, हवा आणि भूजल यामध्ये घातक विषारी घटक सोडले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासावर आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी शाळांमध्ये ई-कचरा जनजागृती आणि संकलन मोहीम राबविणेबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

१. मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शाळा स्तरावर कालबाह्य झालेल्या इलेक्ट्रॉनिक (केबल्स, जुने फोन, कॅल्क्युलेटर, चार्जर, कीबोर्ड इत्यादी) टाकण्यासाठी सुरक्षित आणि कोरडा खोका उपलब्ध करून घेण्यात यावा. अशा प्रकारे ई-कचरा संकलन कोपरा शाळेमध्ये तयार करण्यात यावा.
२. मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी ई-कचरा संकलन करण्यासाठी CPCB (केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ) / SPCB (राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ) अधिकृत पुनर्चक्रणकर्ते किंवा PROS (उत्पादक जबाबदारी संस्था) यांच्याशी संपर्क करावा.
३. मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी ई-कचऱ्याचे धोके, विल्हेवाट व इतर विषयांबद्दल विद्यार्थी/शिक्षकांसाठी मार्गदर्शन संत्रे शाळा / कनिष्ठ महाविद्यालय मध्ये आयोजित करण्यात यावी.
४. मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी ई-कचरा जाणीव जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, ई कचऱ्यापासून कलाकृति तयार करणे. यासारख्या उपक्रमांचे आयोजन करावे.
५. मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी विद्यार्थ्याना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरातील कालबाह्य झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तु शोधून शाळेतील ई-कचरा संकलन कोपऱ्यामध्ये जमा करण्यास प्रोत्साहीत करावे.
६. मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शाळेत जमा होणारा ई-कचरा विल्हेवाट करण्यासाठी CPCB (केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ)/SPCB (राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ) अधिकृत पुनर्चक्रणकर्ते किंवा PROS (उत्पादक जबाबदारी संस्था), महानगर पालिका, नगर पालिका मधील संबंधित विभागाशी संपर्क करावा.
७. ई-कचरा मोहिमेच्या अधिक प्रसिद्धी आणि प्रसारासाठी. राज्ये/केंद्रशासित प्रदेश/विधानमंडळांनी #SpecialCampaign& या हॅशटॅगसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपक्रमांची नोंदणी करावी.
८. संकलित ई-कचऱ्यावर ई कचरा व्यवस्थापन नियम २०२२ नुसार काटेकोरपणे प्रक्रिया केली जाईल. यासाठी खालील मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

ई-कचरा सुरक्षित विल्हेवाट कार्यप्रवाहः-

[विद्यार्थी/घर]

↓
[शाळेची ई-कचरा पेटी]
↓
[शाळा/क्लस्टर/ब्लॉक संकलन केंद्र]

↓
पुनर्वापराचे प्रमाणपत्र)

↓
[CPCB/SPCB पुनर्चक्रणकर्ता]

९. शाळांनी ई-कचरा भंगार विक्रेत्याकडे सोपवू नये. CPCB अधिकृत पोर्टल किंवा राज्य SPCB नोंदणी कार्यालये यांचेकडे सोपवावा.
१०. शाळांसाठी सुरक्षा नियमावली:-
१. परवानगी असलेल्या वस्तूः लहान गॅझेट्स, वायर्स, सर्किट बोर्ड, टाकून दिलेले फोन, रिमोट कंट्रोल्स, संगणकाचे साहित्य, आयटी पेरिफेरल्स, इअर बड्स इत्यादी ई कचरा संकलन करावे.
२. प्रतिबंधित/धोकादायक वस्तूः खराब झालेल्या लिथियम आयन बॅटरी, फुटलेले कॅथोड-रे ट्यूब (CRT) मॉनिटर्स, कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प (CFLs) किंवा गळती होत असलेले सेल मुलांनी हाताळू नयेत याची दक्षता घेण्यात यावी.
३. इलेक्ट्रॉनिक उपकरणे उघडण्यास, तोडण्यास किंवा त्यांचे भाग वेगळे करण्यास विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सक्त मनाई करण्यात यावी.
११. पडताळणी आणि ताब्यात ठेवण्याची साखळी :-

ई-कचरा एकत्रीकरण अंतर्गत, प्रमाणित पुनर्चक्रणकर्त्याने शाळेच्या नोडल अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ई-कचऱ्याचे वजन करणे आवश्यक आहे.
पुनर्वापर करणारा अनुपालनाचा पुरावा म्हणून औपचारिक ई-कचरा हस्तांतरण पावती आणि पुनर्वापर/विघटन/नूतनीकरण प्रमाणपत्र प्रदान करेल.
१२. ई-कचरा जनजागृती आणि संकलन मोहीम विविध उपक्रमांचे आयोजन करून दिनांक २८ ऑक्टोबर, २०२६ रोजी सदर उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम शाळा स्तरावर आयोजित करावा. शाळेतील इको क्लब समन्वयक यांनी
https://ecoclubs.education.gov.in इको क्लब्स फॉर मिशन लाइफ पोर्टलवर मेट्रिक्स (सहभागी विद्यार्थ्यांची संख्या, आयोजित कार्यशाळा, गोळा केलेले किलोग्राम इत्यादी) माहिती नोंदवावी.
त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय वांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या केंद्र शासनाच्या सूचना निदर्शनास आणून स्वच्छता पखवाडा-२०२६ अंतर्गत शाळांमध्ये ई-कचरा जनजागृती आणि संकलन मोहीम राबविणेबाबतच्या आयोजनाबाबत सर्व संबंधितांस आपल्या स्तरावरून सूचित करावे.

(डॉ. सुचिता पाटेकर)
राज्यस्तरीय नोडल अधिकारी स्वच्छता पखवाडा-२०२६
तथा
शिक्षण उपसंचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे.

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,
२) शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषदा सर्व,
३) शिक्षण निरीक्षक (बृहन्ममुंबई) (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
४) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, सर्व महानगरपालिका


प्रत माहितीस्तव :-
१. मा. आयुक्त, (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सविनय सादर.
२. मा. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना सविनय सादर.
३. मा. श्री. तुषार महाजन, उप सचिव, (एस.डी. ४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सविनय सादर.
४. मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सविनय सादर.

Leave a Comment

error: Content is protected !!