विशेष मोहीम ६ अंतर्गत २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ई-कचरा व्यवस्थापनावर एकदिवसीय विशेष उपक्रम राबविण्याबाबत E Kachra Upkram

E Kachra Upkram

E Kachra Upkram

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

vishesh mohim 6 antargat 28 october 2026 roji i-kachara vyavsthapanavar ekdivasiya vishesh upkram rabavinyababat

Regarding implementation of one-day special activities on e-waste management on 28th October 2026 under Special Campaign 6

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
निपुण भारत समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा. क्र. मप्राशिप/सशि/इको (E-waste)/१/२०२६-२७/

दिनांक:-ई-साक्षांकित
प्रति,
मा. शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक),
महाराष्ट्र राज्य,
पुणे.

विषयः विशेष मोहीम ६ अंतर्गत २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ई-कचरा व्यवस्थापनावर एकदिवसीय विशेष उपक्रम राबविण्याबाबत.

संदर्भ :१) भारत सरकारचे ई-मेल दिनांक १६.०९.२०२६.
२) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/इको (E-waste)/१/२०२६-२७/१/२४८७०००, दि.२३.०९.२०२६.
३) भारत सरकारचे अर्धशासकीय पत्र क्र.१७-३५/२०२५-Coord, दि.०५.१०.२०२६.

महोदय,
उपरोक्त संदर्भिय पत्राद्वारे भारत सरकारने खालीलप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.
एकदिवसीय विशेष उपक्रमः सर्व कार्यालये आणि शाळांमध्ये २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ई-कचरा व्यवस्थापनावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जावा.
प्रार्थना सभा आणि प्रश्नमंजुषाः शाळांच्या २८ ऑक्टोबरच्या प्रार्थना सभेचा मुख्य विषय “ई-कचरा व्यवस्थापन” असावा. तसेच विद्यार्थ्यांसाठी ई-कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन आणि विल्हेवाट यावर आधारित एक छोटी प्रश्नमंजुषा (Quiz) आयोजित करावी.

ई-कचरा संकलनः ऑक्टोबर २०२६ महिनाभर जनजागृती आणि ई-कचरा गोळा करण्याचे काम सुरू ठेवावे. महिनाभरात गोळा झालेला सर्व कचरा २८ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत recyclers /refurbishers सुपूर्द करावा.
अधिकारी वर्ग आणि मदतः गट/जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी शाळांना केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ/राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ (CPCB/SPCB) कडे नोंदणीकृत Recycling शोधण्यासाठी आणि ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मदत करावी.

अहवाल सादर करणे (Reporting): महिनाभरात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची आणि गोळा केलेल्या ई-कचऱ्याची माहिती Eco clubs for Mission LIFE पोर्टलवर https://ecoclubs.education.gov.in २८ ऑक्टोबर २०२६ रोजीच अपलोड करण्यात यावी.

याबाबत सर्व संबंधित शाळा आणि यंत्रणेला या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करून सोबत जोडलेल्या सूचनापत्रकानुसार नमूद लिंकवर माहिती भरण्याबाबत आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात.

आपला विश्वासू,
Digitally signed by Devidas Balkrishna Kulal Date: 15-10-2026 14:36:10

(देविदास कुलाळ) सह संचालक (प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.

Leave a Comment

error: Content is protected !!