State Teacher Award
State Teacher Award
State Teacher Award Scheme
rajya adarsh shikshak puraskar” yojneteel lekhashirshanche susutrikaran karanebabat
State Ideal Teacher Award Scheme
“राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार” योजनेतील लेखाशिर्षांचे सुसूत्रीकरण करणेबाबत.”
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०२६/प्र.क्र.२०/टीएनटी-४
मंत्रालय, मुंबई
दिनांक : ३१ ऑगस्ट, २०२६.
१) शासन निर्णय क्र. पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/टीएनटी-४, दिनांक २८ जून, २०२२.
संदर्भ :
२) शासन निर्णय क्र. पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/टीएनटी-४, दिनांक १६ जुलै, २०२५.
३) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२६/प्र.क्र.४७/का. १४११, दिनांक ०३ ऑगस्ट, २०२६.
प्रस्तावनाः
राज्यातील लोकाभिमुख सेवा व कल्याणकारी योजना अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच विद्यमान कार्यपध्दतीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. सेवा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवताना नागरिकांना होणारा त्रास कमी करणे, अर्जातील अनावश्यक रकाने कमी करणे, कागदपत्रांची संख्या मर्यादित करणे आणि मंजूरीचे स्तर कमी करणे, कागदपत्रांची संख्या मर्यादित करणे आणि मंजुरीचे स्तर कमी करणे यावर भर देणे गरजेचे आहे. त्याकरिता शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) राबविण्यात येत आहे. विद्यमान प्रक्रियेतील त्रुटी दूर करून एकसमान, कालबध्द व प्रणाली आधारित सेवा वितरण व्यवस्था निर्माण करण्यासाठी व्यापक धोरणात्मक कार्यपध्दती संदर्भाधीन क्र.३ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केली आहे.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगिण विकासाचा पाया आहे. शिक्षण क्षेत्रात समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. सदर पुरस्कार वितरण करण्यासाठीचा समारंभ दरवर्षी दिनांक ०५ सप्टेंबर रोजी घेण्यात येतो. सदरचा राज्य शिक्षक पुरस्कार वेगवेगळया प्रवर्गातील शिक्षकांसाठी देण्यात येतो. व यासाठी प्रवर्गानुसार वेगवेगळया ४ लेखाशिर्षांतर्गत निधी अर्थसंकल्पित करण्यात येत होता. तथापि, सदर योजनेचा उद्देश एकच असल्यामुळे तसेच पुरस्कार वितरणामध्ये सुसूत्रता येण्याकरीता विभागाच्या योजनांचे सुसूत्रीकरण करण्याच्या हेतूस्तव अशी लेखाशिर्ष योजना एकत्रित करून शिक्षक पुरस्कारासाठी सद्यःस्थितीत अस्तित्वात असणारे लेखाशिर्ष क्र.२२०२एल२०८, २२०२एल२१७, २२०२एल२२६ व २२०२एल१८२ या ४ लेखाशिर्षाऐवजी २२०२एल२०८ या एकाच लेखाशिर्षांतर्गत निधी अर्थसंकल्पित करून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन निर्णय :
राज्याच्या शिक्षकांना पुरस्कार देण्याकरीताच्या कामकाजात सुसूत्रता आणणे या उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार योजनेकरिता वेगवेगळया प्रवर्गातून पुरस्कारांचे वाटप करण्यात येत होते. यापुढे “मागणी क्र.ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, १०४, शिक्षक आणि इतर सेवा, (००) (०३) आदर्श शिक्षकांना पुरस्कार (कार्यक्रम) “लेखाशीर्ष (२२०२एल२०८) ०५-बक्षिसे” हे एकच लेखाशिर्ष कार्यरत राहिल आणि या एकाच लेखाशिर्षांतर्गत निधीची तरतूद व वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. व उर्वरित खाली नमूद ३ लेखाशिर्ष बंद करण्यात येत आहेत.
अ.क्र.लेखाशिर्ष
१. २२०२ एल २१७
२. २२०२ एल २२६
३. २२०२ एल १८२
२. संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी. सन २०२६-२७ पासून “राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार” योजनेचा सर्व खर्च “मागणी क्र.ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, १०४, शिक्षक आणि इतर सेवा, (००) (०३) आदर्श शिक्षकांना पुरस्कार (कार्यक्रम) “लेखाशीर्ष (२२०२एल२०८)
०५-बक्षिसे” या एकमेव लेखाशिर्षातूनच भागविण्यात यावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०८३११५०३४०६१४९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
उप सचिव, महाराष्ट्र शासन