School Bag Policy 2020
School Bag Policy 2020
School Bag Policy, 2020 chi shalanmadhye prabhavi ammalbajavani karnyababat
Regarding the effective implementation of School Bag Policy, 2020 in schools
क्र.प्राशिसं/संकीर्ण-८०२/School Bag Policy-२०२०/२०२६
प्रति,
दिनांक / ०८/२०२६
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परीषद (सर्व)
३) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
४) शिक्षण निरीक्षक (दक्षिण / पश्चिम / उत्तर), बृहन्मुंबई
विषय :- School Bag Policy, २०२० ची शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत
संदर्भ :-
१. भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, Department of School Education & Literacy यांचे पत्र क्र. F.No.१-४/२०१८-IS-३, दि. ११ मे, २०२६
२. भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, Department of School Education & Literacy यांचे पत्र क्र. F.No.१-४/२०१८-IS-३, दि. २४.११.२०२०
३. National Council of Educational Research and Training (NCERT) यांची Policy on School Bag-२०२०
उपरोक्त संदर्भीय School Bag Policy, २०२० धोरणानुसार, विदयार्थ्यांच्या शालेय दप्तराचे वजन कमी करणे, विदयार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व कृतीप्रधान करणे आवश्यक आहे. सदर धोरणाची अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे होण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१. शाळांच्या मुख्याध्यापकांना स्पष्ट सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच मान्यताप्राप्त खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना School Bag Policy, २०२० मधील तरतुदींची माहिती देऊन त्यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
२. दप्तराचे वजन विदयार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा अधिक दप्तराचे वजन होणार नाही, याची दक्षता शाळांनी घ्यावी. धोरणामध्ये वर्गनिहाय विदयार्थी वजन व अपेक्षित दप्तर वजनाचा मार्गदर्शक तक्ता देण्यात आलेला आहे.
शाळांनी विदयार्थ्यांचे व दप्तराचे वजन वेळोवेळी तपासून नोंद ठेवावी व ज्या विदयार्थ्यांचे दप्तर निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे, त्याबाबत तात्काळ योग्य कार्यवाही करावी.
३. पूर्व-प्राथमिक स्तर पूर्व-प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शक्यतो शाळेत दप्तर आणण्याची आवश्यकता राहणार नाही, याबाबत शाळांनी नियोजन करावे.
४. पाठ्यपुस्तके व वह्यांची संख्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी विदयार्थ्यांना अनावश्यक पाठ्यपुस्तके, वह्या, कार्यपुस्तिका किंवा इतर साहित्य दररोज शाळेत आणण्यास सांगू नये.
दैनंदिन वेळापत्रकानुसार त्या दिवसासाठी आवश्यक असलेलीच पुस्तके व शैक्षणिक साहित्य विदयार्थ्यांनी आणावे, यासाठी वर्गनिहाय दप्तर वेळापत्रक (Bag Timetable) तयार करावे.
५. शाळेत पुस्तके ठेवण्याची व्यवस्था शक्य असल्यास शाळांनी विदयार्थ्यांसाठी वर्गनिहाय कपाटे, शेल्फ, लॉकर किंवा पुस्तके ठेवण्याची अन्य सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून दररोज सर्व पुस्तके घरी नेण्याची आवश्यकता राहणार नाही.
६. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेत स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध असल्यास विदयार्थ्यांना अनावश्यकपणे जड पाण्याची बाटली आणण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे शाळेतील पिण्याच्या पाण्याची सुविधा कार्यरत व पुरेशी असल्याची खात्री करावी.
७. वेळापत्रकाचे नियोजन शाळेचे साप्ताहिक वेळापत्रक तयार करताना एकाच दिवशी विदयार्थ्यांना जास्तीत जास्त पुस्तके व वह्या आणाव्या लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
विषय शिक्षकांनी आपापल्या विषयासाठी आवश्यक साहित्याची संख्या कमी ठेवून शक्य तितक्या कृतीप्रधान व अनुभवाधारित अध्यापन पद्धतीचा वापर करावा.
८. गृहपाठ व शैक्षणिक साहित्य विदयाथ्यांना अनावश्यक लिखित गृहपाठ, अतिरिक्त वह्या, प्रकल्प साहित्य किंवा इतर साहित्य आणण्यास सांगून दप्तराचे वजन वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी.
९. Bagless Days / दप्तरविरहित दिवस
इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी NEP २०२० व School Bag Policy, २०२० नुसार १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी नियोजित करून स्थानिक पातळीवरील कारागीर, व्यावसायिक व कौशल्याधारित व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रम राबवावेत.
यामध्ये सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी बनविणे, हस्तकला, कला, स्थानिक व्यवसाय, कृषीविषयक उपक्रम इत्यादींचा समावेश करता येईल. केंद्र शासनाने इयत्ता ६ ते ८ मध्ये अशा १० दिवसांच्या bagless period ला विशेष प्रोत्साहन दिले आहे. १०. दप्तरविरहित उपक्रम शाळांनी वर्षभरात नियोजनपूर्वक खालीलप्रमाणे दप्तरविरहित/कृतीप्रधान दिवस आयोजित करावेत :-
कला व हस्तकला उपक्रम
क्रीडा व शारीरिक शिक्षण
प्रश्नमंजुषा व बौद्धिक खेळ
वाचन व कथाकथन
स्थानिक कला व संस्कृती
व्यावसायिक कौशल्यांची ओळख
परिसर अभ्यास व क्षेत्रभेट
बागकाम व पर्यावरण संवर्धन
स्थानिक कारागीर तज्ज्ञांशी संवाद,
११. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी दप्तराचे जास्त वजन विद्याथ्यांच्या पाठीचा कणा, खांदे व शरीराच्या वाढीवर विपरीत
परिणाम करू शकते. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शिक्षक, पालक व विदयाथ्यर्थ्यांमध्ये दप्तराच्या योग्य वजनाबाबत जनजागृती करावी. विशेष गरजा असलेल्या विदद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शारीरिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक सवलती व पर्यायी व्यवस्था करावी. १२. पालकांची भूमिका पालक सर्भामध्ये School Bag Policy, २०२० बाबत माहिती देऊन विदयार्थ्यांच्या दप्तरात अनावश्यक वस्तू ठेवू नयेत, तसेच शाळेने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसारच पुस्तके व साहित्य पाठवावे, याबाबत मार्गदर्शन करावे.
१३. अचानक तपासणी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी शाळांच्या भेटीदरम्यान विदयार्थ्यांच्या दप्तराचे वजन तपासावे.
तपासणीदरम्यान खालील बाबींची विशेष पडताळणी करावी :-
१. विदयार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत दप्तराचे वजन.
२. वर्गनिहाय पुस्तके व वह्यांची संख्या.
३. दप्तर वेळापत्रकाची अंमलबजावणी.
४. शाळेत पुस्तके ठेवण्याची व्यवस्था.
५. पिण्याच्या पाण्याची सुविधा.
६. दप्तरविरहित दिवसांचे आयोजन.
इयत्ता ६ वी ते ८ वी तील १० दिवसांच्या bagless period ची अंमलबजावणी.
८. पालकांना दिलेले मार्गदर्शन.
९. शाळेने ठेवलेली दप्तर वजन तपासणी नोंदवही.
१४. अहवाल व नोंद प्रत्येक शाळेने School Bag Policy. २०२० च्या अंमलबजावणीबाबत स्वतंत्र नोंद ठेवावी. गटशिक्षणाधिकारी यांनी शाळानिहाय अनुपालनाची माहिती संकलित करून शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावी.
१५. जबाबदारी निश्चित करणे School Bag Policy, २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची राहील. गटशिक्षणाधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांनी नियमितपणे देखरेख करून अनियमितता आढळल्यास संबंधित शाळेला आवश्यक त्या सूचना देऊन अनुपालन सुनिश्चित करावे.
१६. अनुपालन अहवाल सर्व शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये सदर धोरणाची अंमलबजावणी झाल्याबाबत शाळानिहाय अनुपालन अहवाल प्राप्त करून त्याचा आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार संकलित अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा.
वरील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. विदयार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने School Bag Policy, २०२० मधील तरतुदींचे पालन करण्यास कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
Digitally signed SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 31-08-2026 14:30:15
(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे