“खरेदीपूर्व मोजणी” ही सुविधा लागू करण्याबाबत Kharedipurv Mojani

Kharedipurv Mojani

Kharedipurv Mojani

“kharedipurv mojani” hee suvidha lagu karnyababat

Regarding the implementation of the “Pre-purchase Calculation” facility

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

दिनांक:- ९.१०.२०२६
क्र. संकीर्ण-२०२६/E-१८४९५१२/भूमापन

विषय :- "खरेदीपूर्व मोजणी" ही सुविधा लागू करण्याबाबत

संदर्भः – आपले पत्र क्र./भू-१/ खरेदी पूर्व मोजणी/ई-३०८६४१८/२०२६, दि.७.९.२०२६

महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, संदर्भिय पत्रान्वये आपण खरेदीपूर्व मोजणी सुविधा राबविणे कामी पथदर्शी प्रकल्पास शासनस्तरावरुन अनुमती प्रदान करणेबाबत व नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निर्देश देणेबाबत विनंती केली आहे.

२. त्यानुषंगाने मा. मंत्री (महसूल) यांचे पुढीलप्रमाणे निर्देश प्राप्त झाले आहेत.:-

” ज्या जागेचे किंवा बांधकामाचे रजिस्ट्रेशन प्रस्तावित असेल / त्या जागेची किंवा बांधकामाची मोजणी १५ दिवसांमध्ये करण्याकरता अर्ज करण्याची तरतूद / तात्काळ मोजणी/ तात्काळ “क” प्रत आणि “क” प्रत नोंदणी document वर (दस्तावर) print होणे याबाबतची तरतूद जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी करावी व फेरसादर करावे
३. मा. मंत्री (महसूल) यांनी उपरोक्तप्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार पुढील उचित कार्यवाही करून शासनास प्रस्ताव फेरसादर करावा, ही विनंती.

आपली,

2026.10.09 18:48:15 +05’30”
MILIND MANE 11.0.20
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महसूल विभाग मंत्रालय (मुख्य इमारत),मुंबई

Kharedipurv Mojani
Kharedipurv Mojani

Leave a Comment

error: Content is protected !!