Shikshak Badli Takrar

Shikshak Badli Takrar
Zilha Antargat Shikshak Badli Takrar
District Transfer Teacher Complaints
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रार अर्ज / निवेदनांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत…
दिनांकः १७ नोव्हेंबर, २०२६.
वाचा :-
१) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४, दि.१८.०६.२०२४.
२) मा. उच्च न्यायालय, नागपूर यांनी याचिका क्रमांक ६३९२/२०२५ मध्ये दि.०३.११.२०२६ रोजी दिलेले आदेश.
प्रस्तावना:-
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीचे सुधारित धोरण उपरोक्त वाचा क्रमांक १ येथील दि.१८.०६.२०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतुदीनुसार बदलीनंतर संबंधित शिक्षकाने बदलीच्या ठिकाणी तात्काळ रूजू होणे आवश्यक आहे. तथापि, बदली आदेशाविरुध्द अपिल किंवा न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास, बहुतांश वेळा संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाहीत. परिणामी, शिक्षक बदली झालेल्या शाळेवर रुजू न झाल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा येते.
तसेच, बदली आदेशाविरुध्द शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे दाखल केलेल्या अपिलावर समितीने ३० दिवसांच्या आत निर्णय घ्यावयाचा आहे. तथापि, त्यानुसार कार्यवाही होत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच याचिका क्रमांक ६३९२/२०२५ मध्ये मा. उच्च न्यायालय, नागपूर यांनी दि.३.११.२०२६ रोजीच्या आदेशान्वये बदली आदेशास स्थगिती नसताना देखील संबंधित शिक्षक बदली झालेल्या शाळेवर रुजू न झाल्यामुळे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नूसार विदयार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा पोहचत असल्यामुळे संबंधित शिक्षकाने झालेल्या बदलीच्या अनुषंगाने तक्रार अर्ज/निवेदन सादर केले असल्यास, सदर निवेदनाचा विचार हा संबंधित कर्मचारी बदलीच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतरच करण्यात येईल, अशी सूचना बदली आदेशामध्ये समाविष्ट करण्याबाबत सूचित केले आहे.
त्यानूसार, सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :-
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रार अर्ज/निवेदनांच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व अन्य संबंधित अधिकारी यांना खालीलप्रमणे सूचना देण्यात येत आहेत.
- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेनंतर कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित करताना, या कार्यमुक्ती आदेशामध्ये, झालेल्या बदलीच्या अनुषंगाने तक्रार अर्ज/निवेदन सादर केले असल्यास, सदर
निवेदनाचा विचार हा बदलीच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतरच करण्यात येईल, अशी सूचना समाविष्ट करण्यात यावी.
॥. कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल तर, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विदयार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा पोहचत असल्यामुळे अशा शिक्षकाविरुध्द संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई तात्काळ करावी.
II. शिक्षकांनी बदली आदेशाविरुध्द सादर केलेल्या तक्रार अर्ज/निवेदनावर वाचा क्रमांक १ येथील दि.१८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ३० दिवसांचे आत निर्णय घ्यावा.
IV. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या अनियमिततेबाबत विभागीय आयुक्तांकडे ७ दिवसाच्या आत दाद मागू शकतात. अशा पध्दतीने विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेल्या अपीलवजा तक्रारीवर शक्यतो तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील ३० दिवसांचे आत विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावयाचा आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील.
V. बदलीच्या अनुषंगाने दाखल केलेल्या अपीलवजा तक्रारीवर विभागीय आयुक्तांनी निर्णय घेतल्यानंतर बदलीविषयक सादर करण्यात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत. तसेच बदली आदेशाच्या अनुषंगाने संबंधित बदली प्राधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांचेकडे अशी निवेदने प्रलंबित असल्याचे समजण्यात येणार नाहीत.
२. उपरोक्त तरतूदींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी यांना देण्यात येत आहेत. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सूचना सर्व शिक्षकांच्या निर्दशनास आणाव्यात.
३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२६१११७१७४२४९६६२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः जिपब-११२६/प्र.क्र.२६३/आस्था-१४
