rajyatil sarv shala 9 julyla band aandolanababat
Regarding the protest, all schools in the state will be closed on July 9
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र. शिसंमा-२६/शाळा बंद/बातमी/एस-१/2006261/2026 दि. 07 JUL 2026
विषय :- राज्यातील सर्व शाळा ९ जुलैला बंद आंदोलनाबाबत.
संदर्भ :- विविध वर्तमान पत्रामध्ये छापून आलेली बातमी
वरील विषयाबाबतचे संदर्भीय बामती सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित/विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यासाठी दि.०९ जुलै, २०२६ रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे उक्त संदर्भीय वृत्तपत्रातील बामतीद्वारे निर्देशनास आलेले आहे.
तरी विद्यार्थी हीत लक्षात घेता दि. ०९ जुलै, २०२६ रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची आपल्या स्तरावरून दक्षता घ्यावी, तसेच ज्या शाळा दि. ०९ जुलै, २०२६ रोजी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही आपल्यास्तरावरून करण्यात यावी व सदर बाब सर्व शाळांच्या निर्देशनास आणून द्यावी.
Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 07-07-2026 19:01:38
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत :- मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तय.
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषदा, सर्व
३) शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उ/द.प.)

_________ ALSO READ ________

School Shutdown Movement
schools in the state of Maharashtra will be closed
महत्वाचे
शिसंमा-२०२५ (एस-६-७)/शाळा बंद/निवेदन | 32.99
दि.२/०७/२०२५
विषयः- अंशतः शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने दि.८ व ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद असलेबाबत.
संदर्भः- शिक्षण समन्वयक संघ, महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन दिनांक १/०७/२०२५
उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय निवेदन सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.
अंशतः शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने दि.८ व ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद ठेवणेबाबत शिक्षण समन्वयक संघ, महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. तरी विद्यार्थी होत लक्षात घेता दि.८ व ९ जुलै २०२५ रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही यांची आपले स्तरावरून दक्षता घ्यावी.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प.सर्व.
३. शिक्षण निरिक्षक, बृहमुंबई (उ/द/प)
