राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २१ एप्रिल, २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत….. सामान्य प्रशासन विभागाचे व शिक्षण संचालक आदेश Shala Band Andolan राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि.२१ एप्रिल, २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाच्या अनुषंगाने बैठक

दिनांक: २२ एप्रिल, २०२६

क्रमांक : संकिर्ण १५२६/प्र.क्र.४१/१६-अ

प्रति,
अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई, अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई,अपर मख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई,अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई, प्रधान सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई, प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, गो.ते. रुग्णालय आवार, मुंबई, प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, गो.ते. रुग्णालय आवार, मुंबई, प्रधान सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, मुंबई, प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई, प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदुम, मंत्रालय, मुंबई, प्रधान सचिव (पदुम), कृषी व पदुम, मंत्रालय, मुंबई, सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गो. ते. रुग्णालय आवार, मुंबई, सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, मुंबई, अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मुंबई,अध्यक्ष, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, मुंबई, अध्यक्ष, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, मुंबई.

विषय : राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि.२१ एप्रिल, २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाच्या अनुषंगाने बैठक..

संदर्भ : १. शासन पत्र क्र. संघटना १५१७/प्र.क्र.२१/१६-अ, दि.११.१.२०१७.

महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मा. मुख्य सचिव महोदय यांचे अध्यक्षतेखाली बुधवार, दिनांक २२.४.२०२६ रोजी सायं. ५.०० वाजता मा. मुख्य सचिव यांचे समिती कक्ष, ६ वा मजला, मंत्रालय मुंबई ३२ येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची प्रत सोबत जोडली आहे. सदर मागण्यांस अनुसरुन आपल्या विभागाशी संबंधित मुद्यांबाबतच्या माहितीसह आपण बैठकीस व्यक्तीशः उपस्थित रहावे, ही विनंती.

आपला,

उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
४ सामान्य प्रशासन विभाग, था मजला (विस्तार इमारत) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.

प्रत,
१. मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई ३२.
२. सचिव, (साविस), यांचे स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
३. निवडनस्ती (१६-अ) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.

राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २१ एप्रिल, २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत….. सामान्य प्रशासन विभागाचे व शिक्षण संचालक आदेश Shala Band Andolan राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि.२१ एप्रिल, २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाच्या अनुषंगाने बैठक
राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २१ एप्रिल, २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत….. सामान्य प्रशासन विभागाचे व शिक्षण संचालक आदेश Shala Band Andolan राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि.२१ एप्रिल, २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाच्या अनुषंगाने बैठक

राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक २१ एप्रिल २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

क्र.संकीर्ण/संप/२०२६/

दिनांक: स्वाक्षरीखाली नमूद आहे

विषय- राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक २१ एप्रिल २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत.

संदर्भ – सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्रमांक संघटना१५२६/प्रक्र४१/१६अ, दिनांक २०/४/२०२६.

    परिपत्रक

राज्य शासकीय कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र यांनी दिनांक २१ एप्रिल, २०२६ पासून बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे.

तथापि महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्र.६ अन्वये शासकीय कर्मचा-यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असून या संदर्भात शासनाने संदर्भिय परिपत्रकास अनुसरुन खालील बाबी सर्व कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.

१. शासकीय-निमशासकीय कर्मचा-यांनी संपामध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणक समजण्यात येईल व अशा कर्मचा-यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

२. कर्मचा-यांनी संपात सहभागी न होता, नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित रहावे.

३. संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची पुरेशी व्यवस्था करावी.

४. संप काळात कोणत्याही शासकीय कर्मचा-यास कोणत्याही प्रकारची रजा मंजूर केली जाणार नाही.

५. शासकीय कर्मचा-यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे “काम नाही वेतन नाही” हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे.

६. अत्यावश्यक सेवा अंतर्गत कार्यरत कर्मचारी संपावर गेल्यास त्यांच्यावर संबंधित अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल.

तरी सर्व कर्मचा-यांच्या सदर बाबी निदर्शनास आणण्यात येत असून, सदर शासन सूचनांचे काटेकोरपणे पालन सर्वांनी करावे.

(हरुन आतार) 20/4/26 शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११ ००१

राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २१ एप्रिल, २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत….. सामान्य प्रशासन विभागाचे व शिक्षण संचालक आदेश Shala Band Andolan
राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २१ एप्रिल, २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत….. सामान्य प्रशासन विभागाचे व शिक्षण संचालक आदेश Shala Band Andolan

प्रति, शिक्षण आयुक्तालयातील सर्व कर्मचारी.

प्रत – शिक्षण आयुक्तालयातील सर्व अधिकारी.

प्रत आवश्यक कार्यवाहीस्तव-

१. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

   ALSO READ 👇 

राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २१ एप्रिल, २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत…..

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक संघटना-१५२६/प्र.क्र.४१/१६-अ

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मुंबई – ४०० ०३२

दिनांक : २० एप्रिल, २०२६.

        परिपत्रक

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी दि. २१ एप्रिल, २०२६ पासून बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे.

२ महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्र.६ अन्वये शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. दि. दि. २१ एप्रिल, २०२६ पासून बेमुदत संप कालावधीत शासनाचे कामकाज सुरळीतरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व मंत्रालयीन विभाग/तसेच त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना पुढे दर्शविल्याप्रमाणे उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत:-

अ) शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचा-यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचे आदेश विनाविलंब निर्गमित करण्यात यावेत व ते सर्व कर्मचारी यांच्या व्यक्तीशः निदर्शनास आणावेत. तसेच त्या आदेशाची प्रत शासनाच्या प्रत्येक विभाग/कार्यालय यांच्या सूचना फलकावर लावण्यात यावी.

ब) कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता, नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करावा.

क) संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी व ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांचेकडे दयावी. आवश्यकता भासल्यास गृहरक्षक/पोलिस दलाची मदत घ्यावी.

ड) विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी संप काळात आपले मुख्यालय सोडून जावू नये.

इ) विभागप्रमुखांनी / कार्यालय प्रमुखांनी या आदेशाच्या दिनांकापासून संप संपेपर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचा-यास कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करु नये आणि जे कर्मचारी रजेवर असतील अशा प्रत्येक प्रकरणी विचार करुन त्यांची रजा रद्द करुन त्यांना कामावर तात्काळ बोलवावे किंवा कसे ते ठरवावे.

ई) शासकीय कर्मचा-यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे “काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याचे कर्मचा-यांना अवगत करावे.

फ) ज्या शासनाच्या सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत घोषित करण्यात आल्या आहेत अशा सेवांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करावे. जे कर्मचारी संपावर जातील त्यांच्याविरुध्द सदर अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्यात यावी.

३. सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये संप काळात अत्यावश्यक व इतर सेवा सुरळीत चालू राहतील याबाबत उपाययोजना कराव्यात.

४. सदर संप कालावधीमध्ये कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचारी यांची माहिती क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांचेशी संबंधित मंत्रालयीन विभागांना कळवावी व मंत्रालयीन विभागाने त्यांच्या विभागाची माहिती दुपारी १२.०० वाजेपर्यंत व अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांची संकलित माहिती दुपारी २.०० वाजेपर्यंत या परिपत्रकासोबत जोडलेल्या विहित प्रपत्रात कार्यासन आरक्षण-१, सामान्य प्रशासन विभाग, ४ था मजला, विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ यांचेकडे सादर करावी. यापूर्वी असे निदर्शनास आले आहे की, कर्मचाऱ्यांची उपस्थितीची कार्यालयनिहाय माहिती विहित वेळेवर उपलब्ध करुन देत नाहीत. तेव्हा यावेळी काळजीपूर्वक सदर माहिती विहित कालमर्यादेत देण्याची व्यवस्था करावी.

५. सर्व विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या विभागातील व त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात संपाच्या कालावधीत उपस्थितीची माहिती दुपारी १२.०० वाजेपर्यंत या विभागाकडे अचूक पाठवावी. तसेच संपाच्या कालावधीतील उपस्थितीची टक्केवारी दुपारी १२.०० वाजेपर्यंत या विभागाकडे अचूक प्राप्त होईल अशाप्रकारे पाठवावी.

६. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२६०४२०१७१५२४४१०७ हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

उप सचिव, महाराष्ट्र शासन

  सोबत :- प्रपत्र

प्रति,

१. मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधान सभा, महाराष्ट्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

२. सर्व सन्माननीय विधान परिषद / विधान सभा व राज्यातील संसद सदस्य, महाराष्ट्र राज्य.

३. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई ३५.

४. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

५. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

Read More

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११ ००१

प्रत मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तय सविनय सादर.

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग, सर्व.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. सर्व.
३) शिक्षण निरिक्षक, बृहमुंबई (उ.द.प.)

This page has been viewed 5391 times.

Leave a Comment

error: Content is protected !!