Online Mahiticha Adhikar Aavrutti 2 0

Online Mahiticha Adhikar Aavrutti 2 0

Online Mahiticha Adhikar Aavrutti 2 0

Online Mahiticha Adhikar Aavrutti 2 0 ya Sanketsthalavar Sarv Kshetriy Karyalaye

Online Mahiticha Adhikar Aavrutti 2.0 ya Sanketsthalavar Sarv Kshetriy Karyalaye

Online Mahiticha Adhikar Aavrutti Two Point Zero ya Sanketsthalavar Sarv Kshetriy Karyalaye

online mahiticha adhikar (aavrutti 2.0) ya sanketsthalavar rajyatil sarv kshetriy karyalayancha samavesh

Regarding inclusion of all regional offices in the state on the online Right to Information (Version 2.0) website.

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग

१९ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मुंबई-४०००३२.

क्रमांकः साप्रवि- १२०२३/०६/२०२६-साप्रवि (कक्ष-६)

प्रती,

दिनांक:- १५ मे, २०२६,

अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,

मंत्रालय, मुंबई.

विषय :- ऑनलाइन माहितीचा अधिकार (आवृत्ती २.०) या संकेतस्थळावर राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश करण्याबाबत.

महोदय,

महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती प्राप्त करण्यासाठी “ऑनलाइन माहितीचा अधिकार” हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत सदर संकेतस्थळावर मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हास्तरीय प्रमुख कार्यालये अशा एकूण २१५ कार्यालयांचा समावेश करण्यात आलेला असून त्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध आहे.

२. पूर्वी सदर पोर्टलच्या मर्यादित सव्र्व्हर क्षमतेमुळे राज्यातील उर्वरित क्षेत्रीय कार्यालयांचा पोर्टलवर समावेश करण्यास तांत्रिक मर्यादा येत होत्या, तथापि, आता सदर पोर्टलचे अद्ययावतीकरण करून “ऑनलाइन माहितीचा अधिकार आवृत्ती २.०” हे सुधारित पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तसेच, सदर पोर्टलच्या व्यवस्थापन व समन्वयासाठी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. यास्तव, राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालये/ महामंडळे / अधिनस्त कार्यालये यांचा टप्प्याटप्याने सदर पोर्टलवर समावेश करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

३. ऑनलाइन माहितीचा अधिकार पोर्टलवर कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश करताना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) मार्फत संबंधित सार्वजनिक प्राधिकरणातील एका अधिकाऱ्याची “नोडल ऑफिसर” म्हणून नोंद करण्यात येते. त्यानंतर संबंधित नोडल ऑफिसरमार्फत त्यांच्या अखत्यारितील जन माहिती अधिकारी यांचा पोर्टलवर समावेश करण्यात येतो. त्या अनुषंगाने संबंधित सार्वजनिक प्राधिकरणातील सर्व जन माहिती अधिकारी पोर्टलवर समाविष्ट करण्यात आलेले आहेत याची खात्री संबंधित नोडल ऑफिसर यांनी करावी. तसेच, जन माहिती अधिकारी यांच्या पदस्थापना / बदल्या / निवृत्ती इत्यादींमुळे आवश्यक होणारे बदल वेळोवेळी पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावेत, याची दक्षता घेण्यात यावी.

४. काही प्रशासकीय विभागांच्या अंतर्गत स्वतंत्र उपविभाग कार्यरत आहेत. उदाहरणार्थ, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत उद्योग, ऊर्जा व कामगार असे स्वतंत्र उपविभाग कार्यरत आहेत. अशा

विभागांकडून विनंती प्राप्त झाल्यास प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर नियुक्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

राज्यातील ग्रामस्तरावरील स्वतंत्र कार्यालये असलेल्या आणि ज्या कार्यालयांसाठी मर्यादित संख्येत जन माहिती अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत, अशा प्रकरणांमध्ये संबंधित वरिष्ठ कार्यालयास “नोडल कार्यालय” म्हणून नियुक्त करण्यात यावे व त्या कार्यालयातील एका अधिकाऱ्यास “नोडल ऑफिसर” म्हणून नामनिर्देशित करण्यात यावे.

६. उदाहरणार्थ, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) हे जन माहिती अधिकारी म्हणून नियुक्त असतील, तर संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालय हे नोडल कार्यालय म्हणून कार्य करेल, अशा परिस्थितीत NIC मार्फत तहसील कार्यालयातील एका अधिकाऱ्याची नोडल ऑफिसर म्हणून पोर्टलवर नोंद करण्यात येईल. त्यानंतर संबंधित नोडल ऑफिसरमार्फत त्यांच्या अखत्यारितील इतर जन माहिती अधिकारी तसेच ग्रामस्तरावरील तलाठी यांचा पोर्टलवर समावेश करण्यात येईल. त्याचप्रमाणे, ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) हे जन माहिती अधिकारी म्हणून नियुक्त असतील, तर संबंधित पंचायत समिती कार्यालयातील गट विकास अधिकारी कार्यालय हे नोडल कार्यालय म्हणून कार्य करेल. अशा परिस्थितीत प्रशासकीय विभागांनी केवळ तालुकास्तरीय कार्यालयांची व त्या कार्यालयातील नोडल अधिकाऱ्यांची माहिती सामान्य प्रशासन विभागास उपलब्ध करून देणे अपेक्षित राहील. जन माहिती अधिकारी यांची माहिती उपलब्ध करून देण्याची आवश्यकता नाही.

७. वरीलप्रमाणेच, एखाद्या तालुकास्तरीय कार्यालयात केवळ एकच जन माहिती अधिकारी नियुक्त असेल, तर अशा कार्यालयासाठी संबंधित जिल्हास्तरीय कार्यालय हे नोडल कार्यालय म्हणून कार्यरत राहील, अशा परिस्थितीत प्रशासकीय विभागांनी केवळ जिल्हास्तरीय कार्यालयांची व तेथील नोडल अधिकाऱ्यांची माहिती सामान्य प्रशासन विभागास उपलब्ध करून देणे अपेक्षित राहील.

८. राज्यभरातील सर्व कार्यालये ऑनलाईन माहितीचा अधिकार या पोर्टलवर येणार असल्यामुळे वापरकर्त्यास ज्या कार्यालयात माहिती अधिकार अर्ज करावयाचा आहे ते कार्यालय शोधता यावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयांचे संबंधित विभागाच्या अंतर्गत मॅपिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागाच रचनेची माहिती ट्रि-डायग्राम स्वरूपात सादर करावी.

९. उपरोक्त कार्यपद्धती व सूचना विचारात घेऊन, आपल्या प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचा “ऑनलाइन माहितीचा अधिकार” पोर्टलवर समावेश करण्यासाठी आपल्या विभागाची तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयांची माहिती सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील जोडपत्र ‘अ’ व ‘ब’ मध्ये भरून सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात यावी. तसेच, सदर माहितीची सॉफ्ट कॉपी rtipmu.gad@mah.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठविण्यात यावी. क्षेत्रिय कार्यालयांनी थेट या विभागास माहिती सादर न करता त्यांच्या प्रशासकीय विभागामार्फतच सादर करावी.

सदर शासन पत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असुन त्यांचा संगणक सांकेतांक २०२६०५१५१७१७१५०५०७ असा आहे.

आपला, Digitally signed by ATUL NILKANTHRAO PATNE Date: 2026.05.15 17:18:20+05’30’ (डॉ. अतुल पाटणे)

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-संग्रहार्थ-कार्या-६

Leave a Comment

error: Content is protected !!