राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणेबाबत Shalansathi Anukampa Niyukti Sudharit Yojana

Shalansathi Anukampa Niyukti Sudharit Yojana

Shalansathi Anukampa Niyukti Sudharit Yojana

Revised scheme of compassionate appointment for private aided schools implemented

rajyatil khajgi anudanit v anshata anudanit shalansathi anukampa niyuktichi sudharit yojana lagu karanebabat

Regarding the implementation of the revised scheme of compassionate appointment for private aided and partially aided schools in the state.

Directorate of Education, (Scheme) Maharashtra State 17. Dr. Ambedkar Road, Pune 411 001.

शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, डॉ. आंबेडकर रोड पुणे ४११ ००१.

E-mail Id:- directoradult1@gmail.com

महाराष्ट्र शासन

दूरध्वनी क्रमांक – २०/२६१२६७२६/२६१२३५१५

क्रमांक-शिसंयो/२०२६/अनुकंपा/खाप्रशा/आस्था-का-३

दिनांक १४/०५/२०२६.

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

२. शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद सर्व.

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व.

४. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व.

५. शिक्षण निरीक्षक (पश्चिम/दक्षिण/उत्तर) बृहन्मुंबई.

विषय- राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणेबाबत.

संदर्भ

  • १. शासन निर्णय क्रमांक- अकंपा२०२५/प्र.क्र.८२९/ टीएनटी-१, दिनांक २७/१/२०२६. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई-३२.

२. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) म.रा. पुणे यांचे पत्र

क्रमांक शिसंमा/२०२५अनुकंपा/टि-४१७१२६१८, दिनांक १०/२/२०२६.

३. शिक्षण संचालक (योजना) म.रा. पुणे यांचे पत्र क्रमांक शिसंयो/२०२६/अनुकंपा/खाप्रशा/आस्था-का३, दिनांक २६.२.२०२६/६.३.२०२६.

४. शिक्षण संचालक (प्राथमिक) म.रा. पुणे यांचे पत्र.

क्रमांक प्राशिसं/अनुकंपा/योजना/२६/टे-५०२/१८५४८४३,

दिनांक २०/४/२०२६.

५. मा.आयुक्त-शिक्षण, म.रा. पुणे तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य) यांचे समवेत दिनांक ७/५/२०२६ रोजी झालेली चर्चा.

संदर्भ-१ वरील शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्र.२, ३ व ४. नुसार या बाबत आवश्यक त्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.

या संदर्भात मा.आयुक्त शिक्षण, म.रा. पुणे तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य) व शिक्षण संचालक (योजना) यांच्या दिनांक ७/५/२०२६ रोजी झालेल्या चर्चेनुसार असे कळविण्यात येते की, दिनांक २७/१/२०२६ पासून सुधारित धोरण अंमलात आले असल्याने, या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक २७/१/२०२६ पूर्वी प्राप्त प्रस्तावांवर यांपूर्वीच्या धोरणानुसार संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचेस्तरावरुन कार्यवाही होणे आवश्यक आहे.

सदर बाब विचारात घेता अनुकंपा नियुक्ती बाबत दिनांक २७/१/२०२६ पूर्वी प्राप्त प्रस्तावांवर संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी उचित कार्यवाही करावी. असे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (योजना) यांचेकडे प्राप्त झाले असल्यास त्यांनी ते संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे परत पाठवावेत. तसेच दिनांक २७/१/२०२६ नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर शिक्षणाधिकारी (योजना) यांनी संदर्भिय शासन निर्णयातील निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही त्वरीत करावी.

संबंधित शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाने संदर्भिय शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार संस्था/शाळांकडून शिफारशीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी करुन, प्रस्ताव अचूक असल्यास संबंधित उमेदवाराच्या नियुक्तीबाबत स्वयंस्पष्ट शिफारस संस्थेकडे/शाळेकडे करावी. तसेच सदर शिफारस पत्राची एक प्रत संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवावी.

प्रस्तावांवर वेळेत कार्यवाही न झाल्याने न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी शिफारशीसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (योजना) यांची राहील आणि मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील, याची नोंद घ्यावी.

Digitally signed by

Krishnakumar Bhaskarrao Patil का रसला: 17 शिक्षण संचालक (योजना)

महाराष्ट्र राज्य, पुणे १.

Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 15-05-2026

10:31:12

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

Digitally signed by

Sharad Shankargiri Gosavi Date: 15-05-2026 11:3 (46 गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे १.

प्रत-मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांना माहितीस्तव सविनय सादर.

प्रत-मा.आयुक्त-शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.

Shalansathi Anukampa Niyukti Sudharit Yojana
Shalansathi Anukampa Niyukti Sudharit Yojana

Leave a Comment

error: Content is protected !!