New Curriculum Changes In Textbooks
New Curriculum Changes In Textbooks
Regarding the new textbooks to be published in the academic year 2026-27 as well as changes to textbooks
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ‘बालभारती’, सेनापती बापट मार्ग, पुणे
परिपत्रक
विषय : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नव्याने प्रकाशित करावयाची पाठ्यपुस्तके तसेच पाठ्यपुस्तकांच्या बदलाबाबत…
Shaikshnik varsh 2026-27 Madhye prakashit karavyachi pathyapustake tasech pathyapustakanchya badla babat
संदर्भ :
१) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र ९४/एसडी-४ दिनांक १६.०४.२०२५
२) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१९/प्र.क्र. (२४३/१९)/ एसडी-४ दि ०८.०८.१९ व दिनांक ११.११.२०१९ रोजीचे शुध्दीपत्रक.
३) परिपत्रक क्रमांक व/ड/६/११२४ दिनांक १९.०५.२०२५
संदर्भीय शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी पाठ्यपुस्तकांच्या संदभनि झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.
१) संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार आहेत. या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांच्या किंमती अलहिदा कळविण्यात येतील. सोबत परिशिष्ट ‘अ’ जोडले आहे.
२) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ (जून २०२६) हे इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी व ११ वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्धपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.
३) इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमासाठी ‘शिकू मराठी आंनदाने’ तसेच हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगु, तमिळ व बंगाली या इतर माध्यमांसाठी ‘करू मैत्री मराठीशी’ ही मराठी भाषेची अनिवार्य पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
४) इयत्ता ६ वीसाठी हिंदी सुलभभारती व हिंदी सुगमभारती तसेच सुगमभारती (कन्नड संयुक्त), तारुफे उर्दू, सिंधूभारती अरे/देव, तेलुगु सरलभारती व गुजराती साहित्य परिचय ही पुनर्मुद्रण (जून्या अभ्यासक्रमाची) वैकल्पिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
५) इयत्ता ५ वी, ७ वी व इयत्ता ८ वीच्या एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय, मुल्यमापन योजना समान आहे. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारीत आहेत. सदर इयत्तांची भांडारात शिल्लक असलेली पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
६) संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णय व शुध्दीपत्रकान्वये इयत्ता ९ वी ते १२ वीसाठी विषययोजना व मुल्यमापन योजनेनुसार विद्यार्थ्यांनी सदर इयत्तांसाठी बालभारतीने तयार केलेल्या प्रात्यक्षिक नोंदवहींचा वापर करणे बंधनकारक राहील. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने खाजगी प्रकाशनांच्या प्रात्यक्षिक नोंदवहींचा वापर करण्याचे बंधन / सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये.
D:/Ganesh K/Prim-Program 2026-27/75
७) पाठ्यपुस्तक मंडळामार्फत महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार ‘स्वाध्यायपुस्तिकांची’ निर्मिती केलेली आहे. सदर ‘स्वाध्यायपुस्तिकांच्या’ दर्शनी किंमतीवर ४०% वटाव देण्यात येत आहे. तरी विद्यार्थ्यांनी सदर स्वाध्यायपुस्तिकांचा वापर करण्यात यावा.
तरी वरीलप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नव्याने प्रकाशित होणारी पाठ्यपुस्तके तसेच बदलाबाबतची नोंद राज्यातील सर्व नोंदणीकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर सर्व संबंधितांनी घ्यावी.
क्रमांक: व/ड/६/१२९२
दिनांक : ०७.०५.२०२६
(अनुराधा ओक)
संचालक,
पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे-४.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वीसाठी नव्याने प्रकाशित होणा-या
पाठ्यपुस्तकांचा तपशील दर्शविणारा तक्ता (परिशिष्ट अ)

परिपत्रक पीडीएफ लिंक