Mother’s Day Quiz With eCertificate
Mother’s Day Quiz With eCertificate
Mother’s Day Quiz With Certificate
Mother’s Day Quiz With eCertificate
मातृदिन प्रश्न मंजुषा प्रमाणपत्र
मदर्स डे (Mother’s Day) या विषयावर आधारित १० बहुपर्यायी प्रश्न (MCQs)
मातृदिन प्रश्न मंजुषा प्रमाणपत्रासह तसेच उत्तर सूची (Answer Key) आणि स्पष्टीकरणासह
कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई, विधात्याच्या कृपेचं वरदान म्हणजे आई मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
jagtik matrutva din
World Mother’s Day
Jagtika matrutva din Marathi mahiti
Matrutva din prashnottari
Mahatma to din questions answers
१० मे जागतिक मातृत्व दिन
जागतिक मातृत्व दिन (Mother’s Day) हा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. आई म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव, गाव आणि आयुष्याची शिदोरी वैगेरे वैगेरे. हे सगळं आठवतं जेव्हा आईबद्दल काहीतरी लिहायचं असतं तेव्हा. इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी अशी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरिक्षण सर्वांनाच लागू पडते असे नाही. पण, आई बद्दल भरभरुन बोलले जाते ते म्हणजे ज्या दिवशी असतो मातृदिन. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो.
यंदाही हा दिवस महाराष्ट्र, देश आणि जगभरात साजरा केला जाईल. असा हा मातृदिन साजरा करण्यास नेमकी सुरुवात कशी झाली? जगभरातील सर्व महिलांसाठी ज्या आई झाल्या आहेत. ज्यांनी मानव या प्रजातीतील प्रत्येकाला सृष्टीत जन्म दिला आहे; तिच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, इतरांसाठी सतत कष्ट उपसत असताना प्रत्येक टप्प्यावर जिची भूमिका बदलत जाते अशा प्रत्येक स्त्रिसाठी विशेषत्वाने साजरा केला जाणारा दिवस म्हणजे मातृदिन.
मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस ही आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत होती. ती अविवाहीत होती. तसेच, तिने एखादे अपत्यही दत्तक म्हणून घेतले नव्हते. ती सदैव आपल्या आई सोबतच राहात असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यार्थ मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली.
‘मदर्स डे’ साजरा करण्याच्या पद्धती व्यक्ती, संस्था आणि समाजपरत्वे विभिन्न आढळतात. काही संस्था या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. ज्यात चर्चा, परिसंवाद, आरोग्य शिबिरं आदिंचा समावेश असतो. तर, काही लोक आर्थिक रुपात, किंवा वस्तू रुपात आईला भेट देतात. काही लोक आपले प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्याची भावना ही ज्याच्या त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
SHARAD DATTRAO
DESHMUKH MH GOVT STATE AWARDEE TEACHER
BHARTI SHARADRAO
DESHMUKH MH GOVT STATE AWARDEE TEACHER
PARTH SHARADRAO DESHMUKH IIT-CSE
BHARTI SHARADRAO DESHMUKH MH GOVT
STATE AWARDEE TEACHER
निर्मित – शरद दत्तराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त (पूर्वीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) (हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे)
प्रश्न निर्मितीसाह्य – सौ. भारती शरदराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त (पूर्वीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) (हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे)
तांत्रिकसाह्य – चि.पार्थ शरदराव देशमुख IIT-CSE जुनियर सायंटिस्ट सॅमसंग कंपनी बेंगलुरू