MPSP Guidelines Implementation Of Uniform Scheme
MPSP Guidelines Implementation Of Uniform Scheme
मप्राशिप/सशि/लेखा/निधीवितरण/मोफत गणवेश (समग्र शिक्षा राज्य शासन) / (Rec.) / २०२६-२७/1792
-: कार्यालयीन आदेश:-
20 MAY 2026
समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात २८,७७,०५२ गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना एका गणवेशाच्या मंजूर तरतुदीच्या ८०% मर्यादेत रक्कम रु.६९,०४,९२,४८०/- तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजनेतील योजनेपासून वंचित राहणाऱ्या सामान्य प्रवर्गातील १०,१९,९६९ लाभार्थी विद्यार्थ्यांना मंजूर तरतुदीच्या ८०% मर्यादेत रक्कम रु.२४,४७,९२,५६०/- असे एकूण रक्कम रु.९३,५२,८५,०४०/- (रु. त्र्याण्णव कोटी बावन्न लक्ष पंच्याऐंशी हजार चाळीस फक्त) इतक्या निधीची आवश्यक असलेल्या रकमांची पडताळणी उपक्रम राबविणाऱ्या उपक्रमधारकांनी केली व त्यांनी अंतिम केलेल्या आकडेवारीनुसार शाळांना वितरीत करावयाचा निधी जिल्हा परिषद, सर्व व प्रशासनाधिकारी/महानगरपालिका, सर्व यांना मोफत गणवेश या लेखाशिर्षांतर्गत Recurring – GEN, SC, ST Withdrawal limit PFMS (Child Limit) प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे. सदरचा निधी लवकरात लवकर खर्च करुन विषयांकित प्रकरणी उर्वरित आवश्यक निधीची मागणी या कार्यालयास कळविण्यात यावी जेणेकरुन पुढील निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
जिल्हा परिषद व मनपा यांनी देखील सदर निधीचे वितरण Withdrawal limit PFMS द्वारेच करणे आवश्यक आहे. मंजूर तरतूदी नुसार वितरित केलेला निधी विचारात घेऊन खर्च दिलेल्या कार्यक्रमावरच करावयाचा आहे. प्रकल्प मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तातील सूचना, FMP Manual व इतर लागू असलेले नियम यांचे पालन करून व आवश्यक मंजूरी घेऊन खर्च करण्यात यावे. सदर निधी प्राप्त होताच त्याची पोहच या कार्यालयास तातडीने देण्यात यावी.
(संजय यादव भा.प्र.से 20/5/2026)
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई..
प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव अग्रेषित :
Regarding the implementation of the uniform scheme for the year 2026-27.
GOVERNMENT OF MAHARASHTRA SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT
SAMAGRA SHIKSHA
NIRUN
MAHARASHTRA PRATHAMIK SHIKSHAN PARISHAD, MUMBAI
जा.क्र. मप्राशिप/सशि/गणवेश योजना/२०२५-२६/८४६
दिनांक: 11 MAR 2026
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).
२) प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी, महानगरपालिका (सर्व).
विषय : सन २०२६-२७ मधील गणवेश योजना अंमलबजावणीबाबत.
🙋 हे ही वाचा –
शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ करिताच्या समग्र शिक्षा अभियानाच्या मार्गर्शक सूचना अद्याप केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वितरण होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त होण्यास विलंब झाल्यास पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देणे शक्य होणार नाही. याकरिता आपल्या जिल्हा परिषद / महानगरपालिका अंतर्गत शाळांमधील गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांची मापे स्थानिक शिलाई कारागीर यांचेकडून घेण्यात यावीत. सदरची कार्यवाही शाळांना उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वी करण्यात यावी. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचे गणवेश पुरविणे सोयीचे होईल.
🙋 हे ही वाचा –
गणवेश वाटप योजनेबाबतच्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
राज्य प्रकल्प समन्वयक म.प्रा.शि.प., मुंबई.

ALSO READ 👇
MPSP Guidelines Implementation Of Uniform Scheme 2025-26
सन २०२५-२६ मधील गणवेश योजना अंमलबजावणीबाबत
शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांगधील सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वितरण होणे आवश्यक आहे. याकरिता आपल्या जिल्हा परिषद / महानगरपालिका अंतर्गत शाळांमधील गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांची मापे स्थानिक शिलाई कारागीर यांचेकडून घेण्यात यावीत. सदरची कार्यवाही शाळांना उन्हाळी सुट्टी मिळण्यापूर्वी करण्यात यावी. ज्यामुळे विद्याथ्यर्थ्यांना त्यांच्या मापाचे गणवेश पुरविणे सोयीचे होईल.
गणवेश वाटप योजनेबाबतच्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद यांनी गणवेश योजना अंमलबजावणी बाबत सूचना केलेल्या आहेत
