साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस ०१ ऑगस्ट हा “लेखन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करणेबाबत Lekhan Prerna Din

Lekhan Prerna Din

Lekhan Prerna Din

Lekhan Prerna Diwas

Writing Inspiration Day

sahityaratn lokshaheer anna bhau sathe yancha janmdivas 01 august ha “lekhan prerna din” mhanun sajara karanebabat

Regarding celebrating the birth anniversary of Sahitya Ratna Lokshahir Anna Bhau Sathe, 01st August, as “Writing Inspiration Day”

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस ०१ ऑगस्ट हा “लेखन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण- १०२६/प्र.क्र.७६/समन्वय

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक :- २९ जुलै, २०२६

प्रस्तावना -:

अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने मराठी साहित्य विश्वात अमूल्य आणि भरीव असे योगदान दिले आहे. आपल्या लेखणीच्या जोरावर अण्णा भाऊ साठे हे साता समुद्रापार एक झुंझार लेखक म्हणून स्वप्रतिभेच्या बळावर पोहचले, अशा जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण म्हणून ०१ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जावा असे महाराष्ट्रातील अण्णा भाऊंच्या साहित्यावर प्रेम करणा-या वाचकांना वाटते. मराठी मनाला अण्णा भाऊ साठे या प्रतिभावंत लेखकाच्या जयंतीच्या निमित्ताने आपणही लेखन करुन आपली प्रतिभा मराठी साहित्यात उमटविली पाहिजे, ही प्रेरणा मिळावी आणि समाजातील सर्वच स्तरातील प्रतिभावंत या निमित्ताने लिहिते व्हावेत ही या मागची भूमिका आहे. त्यानुषंगाने ०१ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व विद्यापीठे/महाविद्यालये/संस्थांमध्ये ‘लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याबाबतचे निदेश देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

शासन परिपत्रक :

प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण म्हणून लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा ०१ ऑगस्ट हा जन्मदिवस उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व विद्यापीठे/महाविद्यालये/संस्थांमध्ये ‘लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२.या लेखन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वरील शैक्षणिक संस्थांमध्ये खालील उपक्रम राबविण्यात यावेत. (१) विद्यार्थ्यांना विविध विषय देवून विद्यार्थ्यांकरिता कविता, कथा, निबंध लेखन स्पर्धाचे आयोजन करणे.

(२) विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित करणे.

(३) स्थानिक साहित्यिकांच्या मुलाखती, व्याख्याने आयोजित करणे.

(४) ग्रंथ दिंडी आयोजित करुन ग्रंथलेखनाचे महत्व पटवून देणे.

(५) अण्णा भाऊंच्या कथा, कादंब-या, प्रवास वर्णन, लोकनाट्य तसेच शाहिरीचे विद्यार्थ्यांनी वाचन करणे.

(६) अण्णा भाऊ साठे यांच्या व्यक्तित्व आणि साहित्यिक कर्तृत्वावर व्याख्यानांचे आयोजन करणे. (७) अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा तसेच साहित्य संमेलनांचे आयोजन करणे.

३. याकरीता संचालक (उच्च शिक्षण), संचालक (तंत्र शिक्षण) संचालक (कला) यांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व विद्यापीठे/महाविद्यालये/संस्था यांना १ ऑगस्ट हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याबाबत सूचित करावे.

४. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२६०७२९१६२९३७२००८ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रत,

A S MUTYAL

(अ.शा. मुत्याल) उप सचिव, महाराष्ट्र शासन

१) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.

२) मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास) यांचे प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई,

३) मा.उप मुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क) यांचे प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई

४) मा. मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

६) अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.

५) मा. राज्यमंत्री (उच्च व तंत्र शिक्षण), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

७) सर्व संचालक, उच्च शिक्षण / तंत्र शिक्षण/कला/ ग्रंथालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

८) सर्व सह सचिव / सर्व उप सचिव/ अवर सचिव/ कक्ष अधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

१०) निवडनस्ती (आस्था-२)

९) कुलसचिव, सर्व सार्वजनिक/अभिमत/खाजगी/समूह विद्यापीठे महाराष्ट्र राज्य.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस ०१ ऑगस्ट हा "लेखन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करणेबाबत Lekhan Prerna Din
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस ०१ ऑगस्ट हा “लेखन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करणेबाबत Lekhan Prerna Din

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज जयंती दिन
विनम्र अभिवादन !

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
मराठी माहिती जीवन चरित्र वाचा आणि प्रश्नमंजुषा सोडवा
निबंधा करिता भाषणाकरिता सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा करता उपयुक्त माहिती

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/08/annabhau-sathe-quiz.html

दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर असलेल्या अण्णाभाऊनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ०१ ऑगस्ट १९२० वाटेगावमध्ये झाला.
ते केवळ दीड दिवस शाळेत गेले आणि त्यानंतर शिक्षण सोडले
कोंडाबाई साठे आणि जयवंता साठे यांच्याशी विवाह
१९३१-३२ कुटुंबासह उपजीविकेसाठी मुंबईत स्थलांतर
त्यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या

अण्णाभाऊ साठेंच्या गाजलेल्या कादंबऱ्या
•फकीरा •वारणेचा वाघ •वैजयंता •आवडी •माकडीचा माळ
•अलगूज •चित्रा
•रानगंगा •रूपा
•फुलपाखरू

अण्णाभाऊ साठेंची
कोणती कादंबरी
तुम्हाला सर्वाधिक आवडते?
कमेंटमध्ये नक्की सांगा !

Leave a Comment

error: Content is protected !!