Shikshak Padonnati GR
Shikshak Padonnati GR
jilha parishad aasthapanevaril shikshak sanvargatoon vividh padanvar padonnatisathichi kalbaddha karyapaddhati vihit karanyababat.
Regarding prescribing a time-bound procedure for promotion to various posts from the teaching cadre in the Zilla Parishad establishment
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
जा.क्र.प्राशिसं/टे-३०१/२०२६
दिनांक- ५/८/२०२६
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सर्व
विषय- मा. उच्च न्यायालय मुंबई, खडपीठ नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र ५९४३/२०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत
संदर्भ-१. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२४४/टीएनटी-१/दि.२९/७/२०२६
२. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६/दि.१४/५/२०२६
३. रिट याचिका क्र.४५७४/२०२६ या प्रकरणी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी पारित केलेला दि.१०/७/२०२६ रोजीचा न्यायनिर्णय
४. संवालनालयाचे पत्र क्र.१/२०१४५७१/२०२६/दि.१०/७/२०२६
५. संचालनालयाचे पत्र क्र. १/२०५२७३५/दि.३०/७/२०२६
विषयांकित प्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि.२९/७/२०२६ मध्ये जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबध्द कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. त्यानुसार संचालनालयाचे संदर्भ क्र.५/१/२०५२७३५/दि.३०/७/२०२६ रोजीच्या पत्रान्वये आपणांस कार्यवाही करणेबाबत कळविण्यात आलेले होते.
परंतु शालेय शिक्षण विभागाच्या दि.२९/७/२०२६ रोजीच्या शासन निर्णयाला मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र. ५९४३/२०२६ अन्वये आव्हान देण्यात आले असून मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने २९-७-२०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील खड ४(अ) च्या अमलबजावणीस स्थगिती देण्यात आलेली आहे.
त्यामुळे सन २०२६ च्या माहे ऑगस्ट मधील (शासन निर्णयातील ४ अ नुसार) चालू वर्षी करावयाच्या पदोन्न्तीबाबतची कार्यवाही शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.
Digitally signed by Sharad Shankargiri Gosavi Date: 05-08-2026 18:49:44
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य पुणे-१
प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व
प्रत माहितीस्तव सविनय सादर-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुबई-३२
२. मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुण

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२६/प्र.क्र. २४४/टीएनटी-१ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक : २९ जुलै, २०२६.
संदर्भ :१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, एसआरव्ही-२०१८/प्र.क्र. १५९/कार्यासन-१२, दि. ०१.०८.२०१९.२) शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र. प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती / २०२६, दि. १४.०५.२०२६.३) रिट याचिका क्र. ४५७४/२०२६ या प्रकरणी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी पारीत केलेला दि. १०.०७.२०२६ रोजीचा न्यायनिर्णय.
प्रस्तावना :
जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक इत्यादीं पदांवर त्या-त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार पदोन्नती देण्यात येते. सदर पदोन्नती ज्येष्ठता-नि-पात्रता या आधारावर दिली जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाने अंजूमन ईशात-ए-तालिम ट्रस्ट विरुध्द महाराष्ट्र शासन या प्रकरणात दि.०१.०९.२०२५ रोजी पारीत केलेल्या न्यायनिर्णयानुसार टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण होणे ही पदोन्नतीसाठीची आवश्यक पात्रता ठरविली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये प्रत्येक वर्षाचा दि. ०१ सप्टेंबर हा पदोन्नती प्रक्रिया सुरु होण्याचा दिनांक ठरविण्यात आला आहे. या आधारावर संदर्भ क्र. २ अन्वये पदोन्नती संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. संदर्भ क्र. २ येथील दि. १४.०५.२०२६ रोजीच्या पत्रास मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका क्र. ४५७४/२०२६ अन्वये आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणांचा न्यायनिर्णय दि. १०.०७.२०२६ रोजी पारीत झाला असून त्याद्वारे संदर्भक्र. २ येथील दि. १४.०५.२०२६ रोजीचे पत्र रद्दबातल ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात पदोन्नती प्रक्रियेत एकसुत्रता असावी, जेणेकरुन विद्यार्थी हित व शिक्षकांना दिलासा मिळेल या दृष्टीने कार्यवाही करण्यासंदर्भात शासनास निर्देश देण्यात आले आहेत. सदर निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय :
संदर्भ क्र. २ येथील दि. १४.०५.२०२६ रोजीचे पत्र दि. १०.०७.२०२६ रोजीपासून रद्दबातल ठरविण्यात येत आहे.
२. जे शिक्षक TET/CTET उत्तीर्ण असणे या अर्हतेबरोबरच सेवाप्रवेश नियमानुसार आवश्यक असणारा अनुभव व अन्य अर्हता धारण करीत आहेत, त्यांचा समावेश पदोन्नतीसाठीच्या विचारक्षेत्रात करण्यात यावा.
३. दि. १०.०७.२०२६ पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पदोन्नती आदेश निर्गमित झाले आहेत, त्या ठिकाणची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल.
३. पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा पदोन्नत्यांना संरक्षण प्रदान करण्यात आले असले तरी जे शिक्षक अन्यथा पदोन्नतीसाठी पात्र ठरले असते, मात्र दि. १४.०५.२०२६ रोजीच्या शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या पत्रामुळे अपात्र ठरले, असे शिक्षक यानंतर पदोन्नत झाल्यास पदोन्नतीच्या संवर्गातील त्यांची सेवाज्येष्ठता ही निम्न संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात यावी.
४. पदोन्नती प्रक्रियेत संपूर्ण राज्यात एकसुत्रता असावी यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती निश्चित करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
अ) या चालू वर्षी करावयाच्या पदोन्नतीबाबत-
- माहे ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी.
II. पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व TET/CTET सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी.
II. पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात यावी.
IV. संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत दि.३१.०८.२०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतरच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल.
ब) पुढील वर्षी पासुन करावयाच्या पदोन्नतीबाबत-
- प्रत्येक वर्षाच्या दि. ०१ जानेवारी रोजी आवश्यकता असल्यास तात्पूरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात यावी. यासंदर्भात आलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिम सेवाज्येष्ठता यादी दि. ३१ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात यावी.
॥. तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याची आवश्यकता नसल्यास दि. ०१ जानेवारी रोजी अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात यावी.
iii. दि. १५ फेब्रुवारी ते दि. २२ फेब्रुवारी या कालावधीत पदोन्नती समितीची बैठक आयोजित करण्यात यावी. बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व TET/CTET सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी.
IV. पात्र उमेदवारांची शिफारस करण्याची कार्यवाही पुढील एक आठवडयात करण्यात यावी.
V. दि. ३१ मार्च पर्यंत पदोन्नतीचे आदेश निर्गमित करुन पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
VI. दि. ३१ मार्च पर्यंत पदोन्नती आदेश निर्गमित करण्यात आले तरी पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये. असे शिक्षक दि. ०२ मे रोजी पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होतील या दृष्टीने त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे.
५. उपरोक्त प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करणे सर्व जिल्हा परिषदांसाठी अनिवार्य असेल. या कार्यपध्दतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असेल. अशा प्रकारे कार्यवाही करताना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
६. सदर आदेश संदर्भ क्र. ३ येथील न्यायनिर्णयान्वये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच ग्राम विकास विभागाचे अनौपचारीक संदर्भ क्र. ०१/२०२६/आस्था-१४, दि.२८.०७.२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०७२९१९१०२२२६४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by ABASAHEB ATMARAM KAWALE Date: 2026.07.29 19:11:10+05’30’
(आबासाहेब कवळे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
