परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत Amendment In Sanction Of Family Pension And Gratuity

Amendment In Sanction Of Family Pension And Gratuity

Amendment In Sanction Of Family Pension And Gratuity

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत.

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

महाराष्ट्र शासन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्रमांकः व्हिओसी-२०२३/प्र.क्र.७७/कौशल्य-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: १२ मे, २०२६.

वाचा :
१) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांका अंनियो १००५/प्र.क्र.१२६/सेवा-४, दिनांक ३१/१०/२००५.

२) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांकः अंनिया १००७/प्र.क्र.१८/सेवा-४, दिनांक ७/०७/२००७

३) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांका अंनियो २०१०/ (६७८/१०/विशि २. दि. २५/०३/२०११

४) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांका अंनियो-२०१२/प्र.क्र.९६/सेवा-४, दि.२७.०८.२०१४

५) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. अंनियो २०१५/ (NPS)/प्र.क्र.३२/सेवा-४, दि.०६.०४,२०१५

६) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र. व्हिओसी-२०२१/प्र.क्र.१००/कौशल्य-२. दि.२६/०९/२०२२

७) केंद्र शासनाचे कार्यालयीन ज्ञापन क्र.३८/४१/०६/P&PWA), दि.०५.०५.२००९

८) केंद्र शासनाचे कार्यालयीन ज्ञापन क्र.७/५/२०१२-P&PW (F)/B, दि.२६.०८.२०१६

९) केंद्र शासनाची अधिसूचना क्र. G.S.R.२२७ (E) दिनांक ३०.०३.२०२१.

१०) केंद्र शासनाची अधिसूचना क्र.G.S.R.६५८ (E), दिनांक २३.०९.२०२१

११) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांकः रानियो-२०२२/प्र.क्र.३४/सेवा ४, दि. ३१ मार्च, २०२३

१२) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांका रानियो-२०२२/प्र.क्र.३४/सेवा ४, दि. २० एप्रिल, २०२३

१३) संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांचे पत्र दि. १४/०५/२०२४ व

दि. १४/११/२०२५ रोजीचे पत्र.

प्रस्तावना :

दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना संदर्भ क्र. (१) येथील दिनांक ३१/१०/२००५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अंमलात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती संदर्भ क्र. (२) येथील दिनांक ७/०७/२००७ रोजीच्या

शासन निर्णयान्वये ठरविण्यात आली आहे. राज्यातील व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय, २ स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा/प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भ क्र. (३) येथील दि. २५/०३/२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये ठरविण्यात आली आहे. सदर योजना केंद्राच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत संदर्भ क्र. (४) येथील दि.२७/०८/२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये समाविष्ट केलेली आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय, २ स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा/प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याची कार्यपद्धती संदर्भ क्र. (६) येथील दि. २६/०९/२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत केली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना /राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभअनुज्ञेय ठरत नाहीत.

तद्नंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्र. (९) येथील Central Civil Services (Implementation of National Pension System) Rules, २०२१, दिनांक ३०/०३/२०२१ अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तिवेतन अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय केले आहे. तसेच केंद्र शासनाच्या संदर्भक्र. (१०) येथील Central Civil Services (Payment of Gratuity under National Pension System) Rules, २०२१ दिनांक २३/०९/२०२१ अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंर्तगत कर्मचाऱ्याचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय केले आहे.

केंद्र शासनाच्या वरील निर्णयांच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबतची कार्यपध्दती संदर्भ क्र. (११) येथील दि. ३१ मार्च, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत केली आहे. सदर तरतूद राज्यातील जिल्हा परिषदा तसेच, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक / उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी. या सूचनेस अनुसरुन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय, २ स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा/प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः

दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय, २ स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा/प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा-

(अ) शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान,
(ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.
त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास व रुग्णता निवृत्तिवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन / रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल.
(क) तसेच व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय, २ स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा/प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.

वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यु उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यःस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतूदी लागू राहतील.

२. शासन निर्णय, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग क्र. व्हिओसी-२०२१/प्र.क्र.१४५/कौशल्य-२, दि.१६/०१/२०२३ अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना ही वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. (११) येथील शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नयेत. तसेच, प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावीत.

३. दिनांक ०१/११/२००५ ते या निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तिवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना-३ मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागेल. त्यानुसार कुटुंब निवृत्तिवेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज / लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल. सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तिवेतन अनुज्ञेय राहील.

४. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे सेवेत नियुक्त होणारा शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तिवेतन लेखा क्रमांक (PRAN) मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तिवेतन निधी विनियमक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबतचा सोबतचा नमुना-२ मध्ये विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा.

५. जे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे सेवेत नियुक्त होणारा शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा विकल्प सादर करतील, त्यांनी नमुना-१ प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे.६. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत वरील परिच्छेद क्र.
४ प्रमाणे विकल्प देणे बंधनकारक राहील. तसेच यापुढे व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय, +२ स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा/प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानित पदावर नियुक्त होणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपरोक्तप्रमाणे विकल्प शासन सेवेत १००% अनुदानित पदावर नियुक्त झाल्यावर ८ दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील.

७. या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०५१२१४२५२५९१०३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
PRADEEP SAHEBRAO SHIVTARE
(प्रदीप सा. शिवतरे) कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

    नमुना १

कुटुंबाचा तपशील
शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे नाव :
पदनाम :
जन्म तारीख :
नियुक्तीचा दिनांक :
रोजी माझ्या कुटुंबात असलेल्या सदस्यांचा तपशील

अनुक्रमाक कुंटुंबातील सदस्याचे नाव जन्मतारीख कर्मचा-यांशी असलेले नाते कार्यालय प्रमुखाची सही शेरा

वरील तपशिलात कोणतीही भर पडल्यास किंवा फेरबदल झाल्यास त्यासंबंधीची माहिती कार्यालय प्रमुखास /लेखापरीक्षा अधिकाऱ्यास कळवून हा तपशील अद्यावत ठेवण्याची मी याद्वारे हमी घेतो.
ठिकाणः
दिनांक:

कर्मचाऱ्याची सही

DCPS/PRAN NO:-
*या प्रयोजनासाठी कुटुंब याचा अर्थ, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ यातील नियम ११६ (१६) (बी) यात व्याख्या केल्याप्रमाणे असलेले “कुटुंब” असा होतो.
टीप – पत्नी व पती यामध्ये अनुक्रमे न्यायिक फारकत घेतलेल्या पत्नीचा व पतीचा समावेश होतो.

    नमुना २

सेवेत असताना व्यवसाय शिक्षणाच्या अशासकीय अनुदानित संस्थेतील अनुदानित पदावरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी विकलांगतेमुळे शाळेतील सेवेकरिता असमर्थ ठरल्यास / मृत्यु पावल्यास त्याला अनुज्ञेय लाभमिळण्याबाबत

    विकल्प "अ"

मी. याद्वारे विकल्प देत आहे की, व्यवसाय शिक्षणाच्या अशासकीय अनुदानित संस्थेतील अनुदानित पदावर सेवेत असताना विकलांगतेमुळे शाळेतील सेवेकरिता असमर्थ ठरल्यास / मृत्यू पावल्यास मला / माझ्या कुटुंबास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ अनुसार लाभ देण्यात यावेत.

    अथवा
    विकल्प "ब"

मी.. ..याद्वारे विकल्प देत आहे की, व्यवसाय शिक्षणाच्या अशासकीय अनुदानित संस्थेतील अनुदानित पदावर सेवेत असताना विकलांगतेमुळे शाळेतील सेवेकरिता असमर्थ ठरल्यास / मृत्यू पावल्यास मला / माझ्या कुटुंबास राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अनुसार लाभदेण्यात यावेत.
कर्मचाऱ्याची स्वाक्षरी
नाव
पदनाम
कार्यालयाचे नाव व पत्ता
ठिकाण :
DCPS/PRAN NO:-
ठिकाण:
दिनांक:
हा विकल्प दिल्यामुळे यापूर्वी दिलेला विकल्प रद्द समजण्यात यावा.
*आवश्यक नसेल ते खोडावे,

कार्यालय प्रमुख यांनी भरावे.
विकल्प प्राप्त झाल्याचा दिनांक कर्मचारी श्री/श्रीम… ….. पदनाम… हे व्यवसाय शिक्षणाच्या अशासकीय अनुदानित संस्थेतील /शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी असून त्यांचा DCPS/PRAN NO………. “अ” अथवा “ब” पैकी.. …अत्ता आहे. त्यांनी विकल्प हा विकल्प स्विकारला आहे. याबाबतचा नोंद सेवापुस्तकामधील पृ.क्र. / प. वि. वर घेण्यात आली आहे.

कार्यालय प्रमुखाची सही व शिक्का

विकल्प स्विकारल्याची प्रत संबंधित कर्मचाऱ्यास देण्यात यावी.

    नमुना ३

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-यांना दि. १.११.२००५ ते आजपर्यंतच्या कालावधीत रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी / मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी द्यावयाचा विकल्प
मी. याद्वारे विकल्प देत आहे की, मला राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतर्गत लाभ देण्यात यावे.

    अथवा

मी, याद्वारे विकल्प देत आहे की, मला महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ अंतर्गत लाभ देण्यात यावे. सदर लाभ अनुज्ञेय करताना परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत देण्यात आलेले लाम सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज / लाभांशासह रक्कम समायोजित करण्यात यावे.

रुग्णता निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची स्वाक्षरी/कुटुंब निवृत्तिवेतनधारकाची स्वाक्षरी

——————————– ALSO READ ——————————–

Amendment In Sanction Of Family Pension And Gratuity
Amendment In Sanction Of Family Pension And Gratuity

Amendment In Sanction Of Family Pension And Gratuity

Amendment In Sanction Of Family Pension And Gratuity

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत….

दिनांक :- २४ फेब्रुवारी, २०२५

वाचा:-
१) शासन निर्णय वित्त विभाग क्र. रानियों २०२२/प्र.क्र.३४/सेवा-४, दि.३१.०३.२०२३
२) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. अंनियो २०२४/प्र.क्र.२८/टिएनटी-६. दि. १४.०६.२०२३
३) शासन निर्णय वित्त विभाग क्र. अंनियो २०१८/प्र.क्र.२९/सेवा-४ दि. २९.०९.२०१८

प्रस्तावना:-
वित्त विभागाच्या दि. ३१ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारांसह लागू करण्यात आले आहेत. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करण्याच्या सूचना सदर शासन निर्णयान्वये देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरुन या विभागाने शासन निर्णय, दिनांक १४ जून, २०२३ निर्गमित केला आहे.

तसेच वित्त विभागाच्या दिनांक ३१.०३.२०२३ च्या शासन निर्णया मधील परि. २ मधील तरतूदीनुसार वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा-४, दि.२९.०९.२०१८ अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना दि.३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात आलेली आहे.

यापूर्वी वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक २९.०९.२०१८ मध्ये पुढील प्रमाणे विहीत करण्यात आले आहे:-

” दि. ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेला कर्मचारी जर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य होण्यास पात्र असेल परंतु त्याचे खाते उघडण्याची जबाबदारी ज्या कार्यालयाची आहे, त्या कार्यालयांनी ती पार पाडली नसेल किंवा सदर कर्मचाऱ्यांचा दोष नसतांना काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचे खाते

शासन शुध्दीपत्रक क्रमांका अंनियो-२०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६

उघडले गेले नसेल अशा कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीस, नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास देखील रु १० लक्ष इतके सानुग्रह अनुदान अनुज्ञेय राहील. मात्र अशा प्रकरणांना मान्यता देण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती घेणे आवश्यक असेल”

वरील प्रमाणे वित्त विभागाच्या शासन निर्णय दि.२९.०९.२०१८ मधील तरतूदी विचारात घेता, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली DCPS/NPS योजनेचा सदस्य नसलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दि.३१.०३.२०२३ रोजीच्या तरतुदी लागू आहेत किंवा कसे याबाबत वित्त विभागाचे अभिप्राय घेण्यात आले. वित्त विभागाच्या दि.३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयास अनुसरुन शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या दि.१४.०६.२०२३ च्या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करणे आवश्यक राहील, असे अभिप्राय दिले आहेत. वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार शासन निर्णय क्र. अंनियो २०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६, दि. १४.०६.२०२३ मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

  शासन शुध्दीपत्रक :-

शासन निर्णय दि. १४.६.२०२३ परिच्छेद क्र.१ मधील बाब :

दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा-

याऐवजी पुढीलप्प्रमाणे वाचण्यात यावे:-

“दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या तरतूदी लागू असलेल्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना – राहतील

२. या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०२२४१३१५१११८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

PDF COPY

शासनाचे उप सचिव

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुध्दीपत्रक :- अंनियो २०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६, मंत्रालय, मुंबई

Regarding the sanction of family pension and death gratuity to the families of employees under the Defined Contribution Pension Scheme/National Pension System in case of death during the service period and sickness pension and retirement gratuity to the employees who have retired from the service as well as retirement gratuity to the employees who are retiring from the service….

Leave a Comment

error: Content is protected !!