MAHA TAIT 2025 UPDATE
MAHA TAIT 2025 UPDATE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन दि. २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत करण्यात आलेले आहे. तथापि, ११०७ उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी उमेदवारांची डी.एल.एड परीक्षा व TAIT परीक्षा एकाच दिवशी येत आहे. तेव्हा डी.एल.एड द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेस प्रविष्ठ होणारे जे विद्यार्थी TAIT-२०२५ या परीक्षेसाठी सुध्दा प्रविष्ट झाले असतील अशा विद्याथ्यांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०३ जून २०२५ ऐवजी दिनांक ३० मे २०२५ रोजी नियोजित आहे. तरी विद्यार्थी/उमेदवारांनी उपरोक्त बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे. त्यानुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेऊन परीक्षेस उपस्थित व्हावे याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवारावर राहिल याची नोंद घ्यावी.
ठिकाणः पुणे
दिनांकः २९/०५/२०२५
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४
Also Read 👇
MAHA TAIT 2025 UPDATE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५
प्रसिद्धी निवेदन
संदर्भ:- १. शासन पत्र क्रमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र. ९२/टिएनटी-१, दि. २८/०२/२०२५.
२. मा. आयुक्त (शिक्षण), यांचे पत्र जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/टेट-३/वेप/२०२५/११९१, दि. १९/०३/२०२५
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मरापप/बापवि/TAIT/२०२५/२०८७, दि. २५/०४/२०२५
४. या कार्यालयाची अधिसूचना जा.क्र. मरापप/बापवि/TAIT/२०२५/२०८८, दि. २५/०४/२०२५
महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र.९२/टिएनटी-१, दि.२८/०२/२०२५ व मा. आयुक्त (शिक्षण), यांचे जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/टेट-३/वेप/२०२५/११९१, दि. १९/०३/२०२५ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
www.mscepune.in या
संकेतस्थळावर दिनांक २५/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दि. १०/०५/२०२५ होती परंतु B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असलेल्या विध्यार्थी/उमेदवारांच्या मागणीनुसार संधी देण्याविषयी शासनाकडून निर्देश प्राप्त होते. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी त्यांना दि. १४/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सदर परीक्षेस एकूण २२८८०८ परीक्षार्थी/उमेदवार प्रविष्ठ झाले आहेत.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ परीक्षा घेण्याचे आयोजन दि. २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये प्रस्तावित होते. त्याअनुषंगाने B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी / उमेदवारांचा परीक्षा कालावधी, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या
https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025Info.aspx
या लिंकद्वारे भरणेबाबत सूचित केले होते. सदर लिंकवरील माहिती भरण्याची मुदत १४/०५/२०२५ होती तथापि सदर मुदत दि. १४/०५/२०२५ ऐवजी दि. २१/०५/२०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती व तसे प्रसिद्धी निवेदन देण्यात आले होते. सदर भरलेली माहिती खालील तक्त्यामध्ये नमूद केलेली आहे.
अ.क्र. परीक्षेचे नाव
D.El.Ed.
B.Ed.
M.Ed.
MPSC
OTHER
Total
परीक्षेची माहिती भरलेल्या उमेदवारांची संख्या
452
1317
105
1626
2391
5891
अशा एकूण ५८९१ उमेदवारांची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थेस दि. २१/०५/२०२५ रोजी सायंकाळी ०६:५० वा. ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली आहे.. त्यानंतर परीक्षा परिषदेच्या
msce.tait2025@gmail.com
ईमेल वर दि. २२/०५/२०२५ रोजी सकाळी ११:१५ पर्यंत प्राप्त झालेल्या एकूण १८ परीक्षार्थी उमेदवारांची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थेस दि. २२/०५/२०२५ रोजी सकाळी ११: ३० वा. ई-मेलद्वारे देण्यात आली. या माहितीपैकी ज्या उमेदवारांनी परिपूर्ण व अचूक माहिती दिलेली आहे त्यांची माहिती विचारात घेऊन शक्य तेवढे बदल संबंधित संस्थेकडून करण्यात आलेले आहेत.
तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल असेही कळविण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ परीक्षा घेण्याचे नियोजन दि. २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक २४/०५/२०२५ रोजी उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
www.mscepune.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
(अनुराधा ओक)
आयुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे
ठिकाण : पुणे
दिनांक : २५/०५/२०२५
Also Read 👇
TAIT 2025 Hall Ticket
TAIT Admit card link
MAHA TAIT 2025 UPDATE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०१ शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने नियोजन दि. २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत करण्यात आलेले आहे. त्यासाठी ऑनलाईन आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ठिकाण: पुणे
दिनांक: २३/०५/२०२५
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
Also Read 👇
MAHA TAIT 2025 UPDATE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेचे आयोजन २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ प्रविष्ठ उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल असे दि. २५/०४/२०२५ च्या अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले होते.
त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ परीक्षा घेण्याचे नियोजन दि. २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उमेदवारांना देण्यात येतील. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत वेळोवेळी दिलेल्या, प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तसेच परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेतील सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे.
ठिकाण: पुणे
दिनांक: २३/०५/२०२५
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
Also Read 👇
MAHA TAIT 2025 UPDATE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४ शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे, परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक २५/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दि. १०/०५/२०२५ ऐवजी दि. १४/०५/२०२५ करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन आवेदनशुल्क भरण्याची मुदत दि. १४/०५/२०२५ रोजी २३.५९ मि. पर्यंत आहे. याबाबतचे प्रसिद्धी निवेदन देण्यात आले होते.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ परीक्षा घेण्याचे आयोजन दि. २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये प्रस्तावित आहे. B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी/उमेदवारांचा परीक्षा कालावधी, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या
या लिंकद्वारे भरणेबाबत सूचित केले होते. सदर लिकवरील माहिती भरण्याची मुदत १४/०५/२०२५ होती तथापि सदर मुदत दिनांक १४/०५/२०२५ ऐवजी दिनांक 21/05/2025 रोजी सायंकाळी 06:00 वा. पर्यंत करण्यात येत आहे.
तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल,
ठिकाणः पुणे
दिनांक: १३/०५/२०२५
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४
Also Read 👇

MAHA TAIT 2025 UPDATE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५ प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक २५/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दि. १०/०५/२०२५ ऐवजी दि. १४/०५/२०२५ करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन आवेदनशुल्क भरण्याची मुदत दि. १४/०५/२०२५ रोजी २३.५९ मि. पर्यंत आहे.
तथापि शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ पुढे ढकलण्याबाबत व इतर अडचणीबाबत युट्युब चॅनेल्स, सोशल मिडीया प्लॅटफॉर्मद्वारे व अन्य माध्यमाद्वारे अनाधिकृत बाबी प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
तरी या कार्यालयाचे दिनांक २१/०३/२०२५ च्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन माहे मे व जून २०२५ मध्ये करत असलेबाबत अवगत करण्यात आले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात आले होते. सदर परीक्षा नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी युट्युब चॅनेल्स व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या/अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट व्यतीरिक्त अन्य माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे उमेदवारांचे नुकसान झाल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे कार्यालय जबाबदार असणार नाही. तरी विद्यार्थ्यांनी/उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार कार्यवाही करावी.
ठिकाण: पुणे
दिनांक: १३/०५/२०२५
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
Also Read 👇
MAHA TAIT 2025 UPDATE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४ शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
www.mscepune.in
या संकेतस्थळावर दिनांक २५/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दि. १०/०५/२०२५ ऐवजी दि. १४/०५/२०२५ करण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन आवेदनशुल्क भरण्याची मुदत दि. १४/०५/२०२५ रोजी २३.५९ मि. पर्यंत राहिल.
दि. ०२/०५/२०२५ शासन शुद्धिपत्रकानुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार यांना देखील शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील, मात्र दि. ०५/०५/२०२५ पूर्वी आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना सदर सुधारित तरतूदीचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांनी पुनःश्च ऑनलाईन आवेदनपत्र भरावे. पुनःश्च भरलेले ऑनलाईन आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदनपत्र रद्द करण्यात येईल.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ परीक्षा घेण्याचे आयोजन दि. २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये करण्यात आले असून B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांचा परीक्षा कालावधी दि. २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये नियोजित असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या
https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025Info.aspx
🖕या लिंकद्वारे दि. १४/०५/२०२५ पर्यंत सादर करावी. जेणेकरुन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) २०२५ परीक्षेला प्रविष्ठ असलेल्या उमेदवारांचे परीक्षेच्या बँचेसचे नियोजन करणे सुलभ होईल.
उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल.
ठिकाण: पुणे
दिनांक: ०६/०५/२०२५
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
जा.क्र. मरापप/बापवि/TAIT/२०२५/२२७७.
दिनांक:- ०६/०५/२०२५
विषय:- शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ निवेदनाबाबत,
संदर्भ:- १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.मरापप/बापवि/TAIT/२०२५/२०८७.
२. या कार्यालयाची अधिसूचना जा.क्र. मरापप/बापवि/TAIT/२०२५/२०८८.
३. शासन शुद्धोपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दिनांक ०२/०५/२०२५
४. शासन पत्र क्रमांक संकोर्ण २०२२/प्र.क्र.१०६/टिएनटी-१, दि.०२/०५/२०२५
५. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मरापप/बापवि/TAIT/२०२५/२१६७, दिनांक ०३/०५/२०२५
महोदय,
महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र.१२/टिएनटी-१, दि. २८/०२/२०२५ व मा. आयुक्त (शिक्षण), यांचे जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/टेट-३/वेप/२०२५/११९१, दि. १९/०३/२०२५ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले आहे.
त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्र. (३) अन्वये व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवारही शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) -२०२५ चे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील, तरी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दि. १०/०५/२०२५ ऐवजी दि. १४/०५/२०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तसेच B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी/उमेदवारांची माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या
https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025info.aspx
या लिंकद्वारे विहित मुदतीत सादर करावी, याबाबतचे प्रसिद्धी निवेदन यासोबत जोडलेले आहे.
सदर निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळो विनामूल्य प्रसिद्धी देण्यात यावी ही विनंती.
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे
प्रत माहितीसाठी सविनय सादरः-
१) मा. खाजगी सचिव, मा. मंत्री, शालेय शिक्षण व कोड़ा विभाग, मंत्रालय, मुंबई
२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
३) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.
४) मा. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे-३०.
५) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१
६) मा. शिक्षण संचालक (माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत माहिती व उचित कार्यवाहीसाठी:
१) विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
Also Read 👇

MAHA TAIT 2025 UPDATE
MAHA TAIT 3 2025 UPDATE
Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test
MAHA TAIT 2025 Update Information Notification Application Dates Eligibility Criteria
MAHA TAIT 2025 selection process
जा.क्र. मरापप/बापवि/२०२५/२०८८
दिनांक : २५/०४/२०२५
१. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
तपशील
विहित कालावधी
ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी
२६/०४/२०२५ ते १०/०५/२०२५
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक
१०/०५/२०२५ रोजी २३:५९ वाजे पर्यंत
प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी
परीक्षेच्या ७ दिवस आधीपासून
ऑनलाईन परीक्षा दिनांक
२४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ (प्रविष्ठ उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिक
सन २०१८ व २०१९ च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscepune.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ व २०१९ गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व शास्ती करणेबाबतची यादी’ या सदरात (Tab) वर प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही ? याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रा मध्ये भरावी, आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील तसेच २०१८ व २०१९ च्या गैरप्रकाराच्या यादी मध्ये आपले नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
२. उपलब्ध पदसंख्या: राज्यातील शिक्षण सेवकांच्या/शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व
व बिंदुनामावली नुसार ‘पवित्र’ (PAVITRA-Portal For Visible To All Teacher Recruitment)
या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल.
३. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः
३.१ परीक्षेचे माध्यम : परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) या वरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी- उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे. प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील.
हे ही वाचाल
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र.१०६/टीएनटी-१, दि. १०/११/२०२२ मधील मुद्दा क्र. ३.३ अन्वये ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ करिता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील.
३.२ अभ्यासक्रमः
सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. परिक्षेसाठी निवडलेल्या पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.
अ.क्र. | घटक | शेकडा प्रमाण | एकूण गुण | एकूण प्रश्न |
अ | अभियोग्यता | ६०% | १२० | १२० |
ब | बुद्धिमता | ४०% | ८० | ८० |
एकूण | १००% | २०० | २०० |
अ) अभियोग्यता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्त्व इत्यादी उपघटक राहतील.
ब) बुद्धिमत्ता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील. सदर परीक्षाही विषयज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तरमर्यादा असणार नाही.
क) परीक्षा कालावधी: परीक्षेसाठी दोन तासांचा (१२० मिनिटे) कालावधी राहील.
४. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :
४.१ नियुक्त करावयाच्या रिक्त पदांचा सामाजिक समांतर आरक्षण, अध्यापनाच्या विषयाच्या रिक्त पदांबाबतचा तपशील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी व्यवस्थापन यांच्या ‘पवित्र प्रणाली’वरील जाहिरातीनुसार राहील.
४.२ विविध मागास प्रवर्ग, महिला, माजीसैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादींसाठीचे सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.
४.३ दिव्यांग अधिनियम २०१६ नुसार शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी ४ टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२१/प्र.क्र.१२०/टिएनटी-१. दि. २०/१०/२०२२ व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय तसेच महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील तरतुदी लागू राहतील.
४.४ महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे.
४.५ ऑनलाईन अर्ज करताना एखादी जात/जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केले असल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारांकडे उपलब्ध असेल तर संबंधित जातीचे/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
४.६ समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-१०१२/प्र.क्र.१६/१२/१६ अ. दि. २३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुद्धिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकिर्ण-१११८/प्र.क्र.३९/१६-अ, दिनांक १९ डिसेंबर, २०१८, शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. राआधो ४०२४/प्र.क्र. १४/१६-अ दि. २५ जानेवारी, २०२४ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
४.७आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्लूएस) उमेदवारांकरिता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः राआधो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ व दिनांक ३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले (केवळ महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेले) प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र (केंद्रीय सेवांसाठी लागू असलेले) शिक्षक पदभरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
४.८ सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता (एसईबीसी) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६-क, दि. २७/०२/२०२४ नुसार कार्यवाही करण्यात यावी.
४.९ आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला वगळून) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्रधिकाऱ्याने वितरित केलेले व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
४.१० आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.
४.११ आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयीसवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
४.१२ खेळाडूसाठीचे आरक्षण शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्रीधो-२००२/प्र.क्र.६७/क्रियुसे-२. दिनांक १ जुलै २०१६ तसचे शासन शुद्धिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र.६७/क्रियुसे-२, दि. १८ ऑगस्ट २०१६, शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक: संकिर्ण- १७१६/प्र.क्र.१८/क्रीयुसो-२, दि. ३० जून २०२२ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार ‘प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादा सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. ‘प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.
४.१३ दिव्यांग आरक्षणः दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६ अ. दि. २९ मे २०१९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र. अप्रकि- २०१८/प्र.क्र. ४६/आरोग्य-६, दि. १४ सप्टेंबर २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व UDID कार्ड नंबर सादर करणे अनिवार्य आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रवि२०१७/प्र.क्र.१९६/आरोग्य-६, दि. १३/१०/२०१७ अन्वये दिव्यांग उमेदवारांसंबंधी मार्गदर्शक सूचनेनुसार विहित नमुन्यातील प्रपत्रे परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक किंवा परीक्षा निरीक्षक यांचेकडे देण्यात यावी.
दिव्यांग उमेदवारांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन पत्र दिनांक १३/१०/२०१७ मधील तरतुदीनुसार लेखनिक घेणेसाठी त्यांनी ज्या जिह्यातून परीक्षेस प्रविष्ठ झाले त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडून पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. लेखनिक हा इ. १२ वी अथवा १२ वी पेक्षा कमी शिक्षण झालेला असावा.
४.१४ अनाथ आरक्षणः अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्र.: अनाथ २०१८/प्र.क्र. १८२/का-०३, दि. २३ ऑगस्ट २०२१, शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्र..द अनाथ-२०२२/प्र.क्र. १२२/का-०३, दि. ६ एप्रिल २०२३, शासन पूरक पत्र क्र. अनाथ-२०२२/प्र.क्र.१२२/का-०३, दि. १० मे २०२३ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.
अनाथांच्या आरक्षणाच्या लाभ घेण्याकरिता उमेदवार महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाकडून ज्या अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत, अशी बालके आरक्षणासाठी पात्र राहतील., तथापि, ज्या बालकांच्या आई-वडिलांचे निधन त्या बालकांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी झाले असेल अशाच अनाथ उमेदवारांना अनाथ आरक्षण अनुज्ञेय राहील.
४.१५ माजी सैनिक आरक्षणः शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांकः बैठक-२०२१/प्र.क्र.१५३ /टीएनटी-१, दि. ३० जून २०२२ अन्वये उमेदवार राज्यातील माजी सैनिक (स्वतः), शहीद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय असल्यास त्यांनी त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यास अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत. माजी सैनिकांकरिता आरक्षणा संदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहतील.
४.१६ प्रकल्पग्रस्त आरक्षणः शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. एईएम-१०८०/३५/१६-अ, दि. २०/०१/१९८० तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तासाठीचे आरक्षण राहील.
४.१७ भूकंपग्रस्त आरक्षणः शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. भूकंप-१००९/प्र.क्र.२०७/२००९/१६-अ, दि. २७/०८/२००९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार भूकंपग्रस्ताचे आरक्षण राहील.
४.१८ पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणः शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. पअंक-१००९/प्र.क्र.२००/२००९/१६-अ, दि. २७/१०/२००९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षण राहील. सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसाहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षांपर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर अंशकालीन उमेदवारांनाच या आरक्षणाचे लाभअनुज्ञेय आहेत.
५. उमेदवारांची पात्रता –
५.१ उमेदवार भारतीय नागरिक असावा.
५.२ वयोमर्यादेबाबत किमान वयोमर्यादा १८ वर्षे व शासन वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करील, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना/शिक्षकांना लागू होईल.
५.३ शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हताः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१८ /प्र.क्र.३९७/टीएनटी-१, दि. ०७ फेब्रुवारी २०१९, शासन शुद्धिपत्रक क्र. संकिर्ण-२०१८/प्र.क्र.३९७/टिएनटी- १, दि. २५ फेब्रुवारी २०१९, शासन शुद्धिपत्रक क्र. संकिर्ण-२०१८/प्र.क्र. ३९७/टीएनटी-१, दि. १६ मे २०१९, शासन शुद्धिपत्रक क्र. संकिर्ण-२०१८/प्र.क्र.३९७/टिएनटी-१, दि. १२ जून २०१९ तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. एसएसएन २०१५/(प्र.क्र.१६/१५)/टिएनटी-२, दि. १५ मार्च २०२४ अन्वये संच मान्यतेच्या सुधारित निकषान्वये विशेष शिक्षक माध्यमिक शाळा या पदांचा देखील पदभरतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टीएनटी-१, दि १० नोव्हेंबर २०२२ मधील मुद्दा क्र. ३ (२) अन्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायीक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.
तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.५०९/टिएनटी-१, दि १३ ऑक्टोंबर २०२३ मधील मुद्दा क्र. ३ अनुसार उच्च माध्यमिक (इ. ११ वी ते १२ वी) या विभागाकडील दोन विषयांचा मान्य कार्यभार विचारत घेऊन पूर्णवेळ मान्य रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयांत पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता संबंधित माध्यमातून धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. तसेच मुद्दा क्र. ४ अन्वये उच्च माध्यमिक (इ. ११ वी ते १२ वी) या गटातील संचमान्यतेत मूळ मंजूर पदांपैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदांची (तासिका तत्त्वावरील वगळून) भरती करण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टीएनटी-०१, दि.१०/११/२०२२ अनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
५.४ अराखीव (खुला) उमेदवारांकरिता विहित केलेली वयोमर्यादा तसेच शैक्षणिक व्यावसायिक व इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीं करिता विचार होईल.
५.५ चारित्र्य-पूर्वचारित्र्य पडताळणीअंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी /सेवेसाठी पात्र राहणार नाहीत. तसेच असे उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील.
६.निवड प्रक्रिया : परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील (प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय/रात्र शाळा) पद भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. शिक्षण सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. सी.ई.टी.२०१५/प्र.क्र. १४९/टीएनटी-१, दि.०७/०२/२०१९, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टीएनटी-१, दि. १०/११/२०२२, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन अधिसूचना दि.१२/०२/२०२५ तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राहील.
७. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :
७.१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/या लिंकव्दारे विहित पद्धतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादरकरणे आवश्यक आहे.
७.२ ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराच्या नावाची नोंद करताना ती आधार कार्डामधील नोंदीप्रमाणे असणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी/निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून सदर आधारकार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्जामधील नावात व आधारकार्डा मधील नावाच्या नोंदीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास आपली उमेदवारी रद्द होईल.
७.३ उमेदवाराने अर्जामध्ये त्याचा मोबाईल क्रमांक व पर्यायी मोबाईल क्रमांक तसेच ईमेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे. याच मोबाईल क्रमांकावर व ईमेल आयडीवर वा कार्यालयाकडून वेळोवेळी आपल्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्यामुळे सदर मोबईल क्रमांक व ईमेल आयडी नियुक्तीची प्रक्रिया होईपर्यंत कार्यरत राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
७.४ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे आवश्यक आहे.
७.५ ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
(अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा नवीनतम स्कॅन केलेला पासपोर्ट साईज (४.५ सेमी X ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 200 X 300 pixels
फाईल साईज 20 kb – 50 kb
(ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी
अपलोडकरणे आवश्यक आहे.
आकारमान 140 X 60 pixels
फाईल साईज 10kb – 20 kb
(क) डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी
(३ सेमी X ३ सेमीपांढऱ्या कागदावर काळ्या/निळ्या शाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणेआवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी वापरावी.
आकारमान 240 X 240 pixels in 200 DPI
फाईल साईज 20 kb – 50 kb
(ड)स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळ्या/निळ्या शाई मध्ये लिहिलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 800 X 400 pixels in 200 DPI
फाईल साईज 50 kb – 100 kb
स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमुना
“I. (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोडकरणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले, आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. (लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्पदृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)
७.६ परीक्षेचे शुल्क :
१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-
२. मागासवर्गीय/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग/अनाथ/ दिव्यांग उमेदवारः रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या अथवा अपूर्ण शुल्क भरलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.
७.७ जिल्हा/परीक्षाकेंद्र निवड :
अर्ज सादर करताना ३ (तीन) जिल्हा परीक्षाकेंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. जिल्हा / परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा/ परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली असेल तर ते जिल्हा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा/ परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.
८. प्रवेशपत्र :
८.१ परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्रावरील सूचनांचे पालन उमेदवाराने करणे बंधनकारक आहे.
८.२ परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही मधील नावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये. आपण नमुद केलेला आधार नंबर आणि आपल्या आधार नंबर मध्ये तफावत असु नये.
९. परीक्षेस प्रवेश :
९.१ फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल.
९.२ स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सीमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणत्याही वस्तू, कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वह्या, नोट्स, पुस्तके, बॅग्ज, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने / साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षाकक्षात आणण्यास, स्वतः जवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य उमेदवारांनी आणल्यास ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अथवा परीक्षाकेंद्र व्यवस्थापन अथवा परीक्षा आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
९.३ अर्जामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यामध्ये अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतीत अर्हता धारण करीत नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही गैरवर्तवणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि/किंवा फौजदारी कारवाईसह इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठरेल.
९.४ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती/जाहिरात अधिकृत समजण्यात येईल. त्यामुळे उमेदवाराने वेळोवेळी परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ पहावे.
९.५ सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
९.६ सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास msce.tait2025@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल.
९.७कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराने विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज अचूक भरावे. जाहिरातीत दिलेल्या मुदतीनंतर याविषयी कोणतीही सबब मान्य केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
दिनांक: २५/०४/२०२५
ठिकाण : पुणे
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४,
Also Read 👇
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन माहे में व जून २०२५ मध्ये करण्याचे नियोजित अहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी कराची असे आवाहन करण्यात येत आहे. परीक्षेचाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल, तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी.
ठिकाण : पुणे
दिनांक: २७/०३/२०२५
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०१
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT ) परीक्षा – २०२५ चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे
उपरोक्त विषयानुसार माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आपण मागविलेल्या माहितीबाबत आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ चे निकालाचे कामकाज चालू असल्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) चे आयोजन डिसेंबर २०२४ मध्ये करता आले नाही. तथापि, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) २०२५ चे आयोजन येत्या मार्च/एप्रिल २०२५ मध्ये करणेबाबत प्रस्तावित आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फक्त परिषदेचे आयोजन करुन गुणयाद्या तयार केल्या जातात. प्रत्यक्ष भरती बाबतची कार्यवाही या कार्यालयामार्फत केली जात नाही.
वरील प्रमाणे कळविण्यात येऊन आपला संदर्भीय अर्ज निकाली काढण्यात येत आहे. या उत्तराच्या संदर्भात अपील दाखल करावयाचे असल्यास हे पत्र प्राप्त झालेल्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत आपण सहाय्यक आयुक्त तथा प्रथम अपिलीय अधिकारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, ०४ यांच्याकडे दाखल करु शकता.