Employee Death Family Pension To Family
Employee Death Family Pension To Family
Family pension is given to the family of an employee in case of death during the service period
Family pension is provided to the family of an employee under the Defined Contribution Pension Scheme/National Pension System in case of death during the service period.
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती.
दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२५
वाचा :
१. शासन निर्णय वित्त विभाग क्र. रानियो-२०२२/प्र.क्र.३४/सेवा ४, दि. ३१ मार्च, २०२३
२. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. अआशा-२०२४/प्र.क्र. २५३/का.११, दि.२५ मार्च, २०२५
३. शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. रानिप्र-२०२३/प्र.क्र.५७/सेवा ४, दि. २४ ऑगस्ट, २०२३
प्रस्तावना :
वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ३१ मार्च, २०२३ यास अनुसरुन संदर्भ क्रमांक २ अन्वये, दिनांक ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना /राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा (अ) शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान, (ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास व रुग्णता निवृत्तिवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन / रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल. (क) तसेच १००% अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना सदर निर्णय योग्य त्या फेरबदलासह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबत सूचना सदर शासन निर्णयान्वये वित्त विभागाकडून करण्यात आली आहे. या सूचनेस अनुलक्षून आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा कर्मचारी सेवेत सत्तांना मृत्यु पावल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता न्वानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच शासन स्वेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबतचा शासन निर्णय दिनांक २५ र्च २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
वित्त विभागाच्या संदर्भाधिन क्रमांक ३ येथील परिपत्रकामध्ये उक्त लाभ अनुज्ञेय रण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली केली आहे. ती कार्यपद्धत्ती याद्वारे दिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित श्रमशाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्याची बाब शासनाच्या चाराधीन होती.
परिपत्रक
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने सविस्तर कार्यपध्दती वित्त विभागाच्या संदर्भाधिन क्रमांक ३ येथील परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली केली आहे.
२. सदर कार्यपद्धती याद्वारे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे. याअनुषंगाने वित्त विभागाकडून देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील. सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उचित कार्यवाही करावी.
३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५१११२१५१३३४१०२४ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन परिपत्रक क्र. अआशा.२०२४/प्र.क्र.२५३/का. मंत्रालय, मुंबई