केंद्र शासनाच्या माय भारत पोर्टलवर राज्यातील युवकांची नोंदणी विकसित व्हायब्रेट व्हिलेज प्रोग्राम आणि विविध युवा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत Yuvak Nondni Viksit Vibrant Village Program MY Bharat Portal Link

Yuvak Nondni Viksit Vibrant Village Program MY Bharat Portal Link

Yuvak Nondni Viksit Vibrant Village Program MY Bharat Portal Link

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

Yuvak Nondani For Viksit Vibrant Village Programme On MY Bharat Portal

kendra shasanachya ‘maya bharat’ (MY Bharat) portalvar rajyatil yuvakanchi nondani, ‘vikasit vibret ville program’ (VVVP) aani vividh yuva upkramanchya prabhavi anmalbajavanibabat

Regarding the registration of the state’s youth on the Central Government’s ‘MY Bharat’ portal, the ‘Vibrant Villages Programme’ (VVVP), and the effective implementation of various youth initiatives

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र,पुणे

क्र. आशिका/२०२६/संकीर्ण/ (आस्था-क १४४)/2069343

प्रति,

दि. स्वाक्षरीखाली नमूद आहे

१. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

२. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

विषय : "केंद्र शासनाच्या 'माय भारत' (MY Bharat) पोर्टलवर राज्यातील युवकांची नोंदणी, 'विकसित व्हायब्रेट व्हिलेज प्रोग्राम' (VVVP) आणि विविध युवा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत...

संदर्भ: शासन पत्र क्र. युकयो-२०२६/प्र.क्र.१२०/ई-१७६६६७८/क्रीयुसे-३, दिनांक : २९/०७/२०२६

महोदय,

उक्त संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)

उपरोक्त विषयांकित प्रकरणी, संदर्भीय पत्रात नमूद केलेनुसार केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी ‘माय भारत’ (Mera Yuva Bharat) हे व्यासपीठ विकसित केले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राज्यातील १५ ते २९ वयोगटातील तरुणांना विविध शासकीय संधींचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे सविस्तर निर्देश देण्यात येत आहेत.

१. सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांना अधिकृत परिपत्रकाद्वारे १५ ते १८ वर्षे वयोगटातील पात्र विद्यार्थ्यांची MY Bharat पोर्टलवर नोंदणी, तसेच संस्थास्तरावर MY Bharat नोडल शिक्षक आणि युवा राजदूत) Youth Ambassadors) यांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी.

२. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील NSS, NCC, भारत स्काउट्स अँड गाईड्स तसेच क्रीडा शिक्षकांचा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या समन्वयाने उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा.

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी व MY Bharat चे जिल्हा युवा अधिकारी (DYO) यांच्याशी नियमित समन्वय ठेवून युवक नोंदणी, जनजागृती, नियोजन व उपक्रमांच्या अंमलबजावणीचा कालबद्ध आढावा घ्यावा.

४. जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा युवा अधिकारी (DYO) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नियोजन, समन्वय व आढावा बैठकींना शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे.

५. MY Bharat पोर्टलवर १५ ते १८ वयोगटातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक जनजागृती, पाठपुरावा, प्रगतीचे नियमित परीक्षण व संबंधित संस्थांशी समन्वयाची कार्यवाही करावी.

सर्व शैक्षणिक संस्थांनी (शाळा, महाविद्यालये) आपल्या स्तरावरील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना mybharat.gov.in या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, कोणत्याही विद्यार्थ्याकडून यासाठी शुल्क आकारले जाणार नाही. उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत वेगाने पोहोचवण्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी किमान दोन विद्यार्थ्यांची ‘माय भारत युवा राजदूत’ (Youth Ambassadors)

म्हणून तातडीने नियुक्ती करावी. संस्थांनी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या महत्त्वपूर्ण संधींबाबत विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी.

महाराष्ट्र युवा धोरण, युवा विकास निधी आणि क्रीडा विभागाच्या विविध योजनांची सांगड ‘माय भारत’ उपक्रमाशी

घालून, राज्यातील युवा उपक्रमांना ‘विकसित भारत २०४७ या संकल्पनेशी जोडावे.

‘माय भारत’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नोंदणी, ‘नोडल अधिकारी’ आणि ‘युवा राजदूत यांची नियुक्ती या बाबींची प्रभावी अंमलबजावणी विद्यापीठ स्तरावर होणे अत्यंत आवश्यक आहे.

सदर निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अधिकाधिक युवकांना या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी करून घेण्याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात, ही विनंती.

Digitally signed by Harun Ismail Atar Date: 10-08-2026 13:28:30

(मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या मान्यतेने)

(हारुन आतार) शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन)

प्रत पुढील आवश्यक कार्यवाहीस्तव-

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व)

केंद्र शासनाच्या माय भारत पोर्टलवर राज्यातील युवकांची नोंदणी विकसित व्हायब्रेट व्हिलेज प्रोग्राम आणि विविध युवा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत Yuvak Nondni Viksit Vibrant Village Program MY Bharat Portal Link
केंद्र शासनाच्या माय भारत पोर्टलवर राज्यातील युवकांची नोंदणी विकसित व्हायब्रेट व्हिलेज प्रोग्राम आणि विविध युवा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत Yuvak Nondni Viksit Vibrant Village Program MY Bharat Portal Link

Details of MY Bharat Nodal Officer and Campus Ambassadors

Leave a Comment

error: Content is protected !!