वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८, भाग-पहिला, उप विभाग एक ते पाच अन्वये प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांमध्ये सुधारणा करण्याबाबत Vittiy Adhikar Sudharna

Vittiy Adhikar Sudharna

Vittiy Adhikar Sudharna

Improvement of financial rights

Financial Rights Amendment

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

vittiy adhikar niyam pustika-1978, bhag-pahila, up vibhag ek te pach anvaye pradan karnyat aalelya vittiy adhikaranmadhye sudharna karanyababat

Regarding amendments to the financial powers conferred under the Financial Powers Manual-1978, Part-I, Sub-sections One to Five.

वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८, भाग-पहिला, उप विभाग एक ते पाच अन्वये प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांमध्ये सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांकः विअप्र-२०२६/प्र.क्र.२२/विनियम
मंत्रालय, मुंबई

दिनांक: ११ ऑगस्ट, २०२६

पहावे.-

१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-डीसीएन-१०७५/ओ अॅण्ड एम, दिनांक ९ एप्रिल, १९७५ (प्रत सोबत जोडली आहे.)

२) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक-डीएफपी-१०७६/१३९२/८९६/जीईएन-५, दिनांक १४ फेब्रुवारी, १९७७ (प्रत सोबत जोडली आहे.)

३) शासन निर्णय क्र. विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दि.१५ मे, २००९.

४) शासन निर्णय क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२ दि.१७ एप्रिल, २०१५.

शासन निर्णय-

शासनाने संदर्भीय क्र.४ च्या शासन निर्णयान्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग पहिला, उपविभाग १ ते ५ मध्ये शासनाच्या मंत्रालयीन प्रशासनिक विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख या प्रधिकाऱ्यांना वित्तीय शक्तींचे विहित मर्यादेच्या, अटींच्या व शर्तीच्या अधीन राहून मुंबई वित्तीय नियम १९५९, महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५, महाराष्ट्र अर्थसंकल्पिय नियमपुस्तिका, खर्चाच्या संकीर्ण बाबी तसेच महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली यामधील तरतूदींनुसार अधिकार प्रदान केलेले आहेत. तथापि, प्रदान करण्यात आलेल्या काही वित्तीय अधिकारांच्या मर्यादेत व त्या अनुषंगाने अटी इत्यादी मध्ये सुधारणा करुन जास्तीत जास्त प्रकरणे विविध स्तरावर लवकरात लवकर निकाली निघतील या उद्देशाने संबंधित प्राधिकाऱ्यांना व्यापक अधिकार प्रदान करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार सोबत जोडलेल्या परिशिष्टांमध्ये दर्शविलेल्या काही वित्तीय शक्तींच्या वित्तीय मर्यादेत आणि त्या अनुषंगाने अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तरोच, काही कालबाह्य वित्तीय शक्ती वगळण्यात आल्या आहेत व काही वित्तीय शक्ती नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या निर्णयाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय शक्तींचा वापर हा विविध वित्तीय प्रकाशनामध्ये अंतभूर्त असलेल्या नियम व विनियम यामधील अटींच्या आणि शर्तीच्या अधीन तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या या विषयींच्या कार्यकारी आदेशांच्या अनुपालनांच्या अधीन, त्याचप्रमाणे पुढील अटींच्या अधीन राहून करण्यात यावा.

२. या वित्तीय अधिकारांचा वापर करुन मंजूरी प्रदान करताना ज्या प्रकरणी विशिष्ट मानके (स्टॅण्डर्ड) विहित केलेली असतील अशा प्रकरणी विहित मानकांचे अनुसरण करण्यात यावे. तसेच कोणत्याही बाबीकरिता वित्त विभागाची विशेष बाब म्हणून मंजूरी घेण्यात आली असेल अशा बाबीच्या संदर्भात दुरुस्ती, सेवासंविदा करार किंवा अन्य प्रश्न उद्भवल्यास वित्त विभागाचा सल्ला घेण्यात यावा.

संपूर्ण शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

Leave a Comment

error: Content is protected !!