Vetan Deyak
Vetan Deyak
Regarding the difficulties faced by aided schools regarding salaries for the months of March and April 2026
anudanit shalechya mahe march april donhajarsavis chyaa vetan sambadhit yenarya adchani Babat
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य,पुणे
क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६.बी
दिनांक : २३/०४/२०२६
प्रति,
१) विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, माध्यमिक उच्च माध्यमिक, विभागीय मंडळ, सर्व
२) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
३) शिक्षणाधिकारी मनपा, सर्व
४) प्रशासन अधिकारी मनपा, सर्व
५) शिक्षण निरीक्षक (मंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम)
६) शिक्षणाधिकारी (माध्यमिक प्राथमिक) सर्व
विषयः अनुदानित शाळेच्या माहे मार्च एप्रिल २०२६ च्या वेतन संबंधित येणाऱ्या अडचणी बाबत
संदर्भः- १) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसेमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.१६.०७.२०२५/१३२८५३२
२) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.२२.०१.२०२६०/१६८५२९६
३) संचालनालयाचे पत्र.क्र. शिर्समा/दि.२५-२६/टि-६बी. दि.०४.०३.२०२६./१७५७८५७
४) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६वी.दि.०५.०३.२०२६./१६८५२९६
५) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६वी. दि. २७.०३.२०२६०/१८१३४८०.
उपरोका संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने माहे मार्च एप्रिल २०२६ च्या अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१) शाळेमधील प्रत्यक्ष संचमान्यते नुसार मान्य पदे व कार्यरत पदे यामध्ये कार्यरत पदे मंजूर संचमान्यता पदापेक्षा जास्त असल्यास अशा प्राथमिक/माध्यमिक शाळांच्या चाबतीत एकस्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी तपासणी करून त्यांचे login मधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाचत कार्यवाही करावी. तसेच उच्च माध्यमिक शाळांबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या login मधून उपरोक्त प्रक्रिया पार पाडावी, माहे मार्च एप्रिल २०२६ च्या वेतना करीता शालार्थ प्रणालीवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे हयापुढे सदर सुविधा उपलब्ध असणार नाही.
२) ज्या शाळांच्या बाबत एक युडायस क्रमांक दोन शाळांना देण्यात आलेला आहे, अशा परिस्थितीत आवश्यक ती दुरुस्ती मुख्याध्यापक तथा DDO-1 व अधिक्षक (वेतन पथक) तया D.D.O-2 यांच्या login मधून संबंधित U-Dise क्रमांकाचे अद्यावतीकरण करण्यात यावे. तसेच एका U-Dise क्रमांकावर दोन शाळांचे D.D.O-फोड़ तयार झाले असल्यास एक D.D.O-कोड अधिक्षक वेतन पथक यांच्या login मधून अकार्यान्वित करण्यात यावा.
३) शालार्थ प्रणालीमध्ये जन्म दिनांक व प्रथम नियक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडसर येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
उपसंचालक यांनी प्रथम नियक्ती दिनांक व जन्म दिनांक याचाबतची पडताळणी करुन कागदपत्रांच्या आधारे प्रथम नियुक्ती दिनांक । जन्म दिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित कराया.. अशा सर्व प्रकरणांचा एकत्रित अहवाल संचालनालयास सादर करावा, तसेच संबंधितांना आदेशासह कळवावे.
उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करुन माहे मार्च/एप्रिल २०२६ मधील नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्यात यावी.
Digitally signed by
Mahesh Madhukar Palkar Date: महेश पालकर) 21:06:00 (शक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
प्रत माहितीस्तव सविनय सादर.
१) मा. आयक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पणे-१
प्रत आवश्यक कार्यवाहीस्तव
२)श्री.पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट, (शालार्थ सिस्टीम) महाआयटी, मुंबई, यांना देऊन कळविण्यात येते की
उपरोक्त सूचनांच्या अनुषंगाने शालार्थ प्रणालीवर आवश्यक तो तांत्रिक बदल करण्यात यावा.
————————- ALSO READ 👇 —————————–
Regarding submission of salary payment as per set approval and addition of higher secondary school posts
संच मान्यता व उच्च माध्यमिक शालार्थ पदांची जोडणी केल्यानुसार वेतन देयक सादर करणे बाबत
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र.शिसंमा/ /२०२५-२६/ शालार्थ/टि-७ 15256
दिनांक :- १२/११/२०२५
परिपत्रक शालार्थ संचमान्यता
विषय: संच मान्यता व उच्च माध्यमिक शालार्थ पदांची जोडणी केल्यानुसार वेतन देयक सादर करणे बाबत
संदर्भ : श्री पचन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालाथा सिस्टी म यांच्याकडील संदेश दि १२.११.२०२५
शालार्थ व उच्च माध्यमिक संच मान्यता या दोन्ही प्रणालीची जोडणी इंटीग्रशन केलेल असून शालार्थमध्ये पे बील जनरेट करत असताना संच मान्यतेमधील मान्य पदांपेक्षा जास्त पदांचे देयक अदा करावयाचे असल्यास एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांनी सदर देयकास मंजुरी दिल्यानंतर सदर देयक यंतन पथक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. पगार देयका मधील पदे मान्य पदांपेक्षा जास्त असल्यास अशा पर्दाचे वेतन करताना एक स्तर बरिष्ठ अधिकारी यांनी अशा देयकांना मान्यता घेणे ऑनवार्य असेल,
या यावतच्या कार्यप्रणाली विषयची सविस्तर युजर मॅन्युअल शालार्थ प्रणालीवर उपलब्ध केले आहे. शालार्थ व उच्च माध्यमिक संच मान्यता या दोन्ही प्रणालीचे जोडणी बाबतच्या कार्य प्रणाली संदर्भात सुचना
खलीलप्रमाणे आहे. १. शालार्थ मध्ये संच मान्यता पोस्ट मॅपिंग व यू डायस कोड मॅपिंगची प्रोसेस पुर्ण असणे अनिवार्य आहे.
२. डी. डी. ओ. लेवल १ कॉलेज देराबर वेतन देयक तयार करता येणार आहे.
३. सदर येतन देयक फॉरवर्ड करताना व संच मान्यता प्रणालीमधून सदयस्थितीमध्ये मान्य पर्दाचा तपशी तपासून जर संच मान्यतंपेक्षा जास्त पदांचे चंतन देयक तयार झालेले असेल तर शालार्थ प्रणाली तसा संदेश येईल व तसेच शाळा स्तरावर त्याचाबतचा सर्व तपशील कॉलेज प्रमुखंच्या लॉगिन मध्ये Error Screen या बटनावर क्लीक केल्यावर उपलब्ध होईल.
४. या नंतर सदर देयक हे एक स्तर बरिष्ठ अधिकारी यांना मान्यतेसाठी Forward To DYD या बटनावर क्लीक केल्या नंतर सदर वेतन देयक हे एक स्तर बरिष्ठ अधिकारी यांच्या लांगीनला उपलब्ध होईल
५. एक स्तर यरिष्ठ अधिकारी Dy Director यांच्या स्तरावर सदर देयकाचा सविस्तर तपशील उपलब्ध होईल. या स्तराबर मंजूरी मिळाल्या नंतर सदर देयक कॉलेज प्रमुखाकडे कार्यवाही साठी उपलब्ध होईल
६. सद्यस्थितीमध्ये खाजगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांप्रमाणेच उच्च माध्यमिक शाळा करीता सदर सुविधा कार्यन्वीत झालेली आहे.
७. ज्या उच्च माध्यमिक शाळांची संच मान्यता प्रलंयीत आहे त्या शाळांच्या संच मान्यता करण्याची कार्यवाही संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शाळा प्रमुखा मार्फत त्वरीत नियमाप्रमाणे करावी, शैक्षणिक वर्ष २०२४-२५/२०२५-२६ (या पेको लागू असेल तो) संच मान्यते अभावी संबंधित कॉलेजच्या वेतन देयका संबंधित अडचणी निर्माण झाल्यास याची संपूर्ण जवावदारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील. या पुढे विहीत कालमर्यादित संच मान्यता करीता आवश्यक असलेली माहिती यु डायस व सरल प्रणालीवर अद्ययावत करणे कॉलेज प्रमुखंना अनिवार्य असेल. माहिती योग्य नोंदवली नसल्यास त्या वर्षाची संच मान्यता होणार नाही.
करीता उपरोक्त प्रमाणे कार्य कार्यवाही करण्यात याची
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

