वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्याबाबत Establishment Of VANARTI

Establishment Of VANARTI

Establishment Of VANARTI

Regarding the establishment of an autonomous institution, Vasantrao Naik Research and Training Institute (VANARTI)

Free training for exam preparation from Vanarti

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), महाराष्ट्र राज्य, नागपूर

जा.क्र. वनार्टी /नागपूर/आस्था/508/२०२६-२७
दिनांक :-19/06/2026

   परिपत्रक

विषय :- वनार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर मार्फत सन 2026-27 या वर्षासाठी खालील स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज वनार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दिनांक 25/06/2026 पर्यंत मागविण्यात आले होते.

१) IBPS-PO/Banking/LIC/AAO

२) मिलिटरी / पोलीस भरती

३) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)

४) कर्मचारी निवड आयोग (SSC)

५) MBA-CAT/CMAT/CET

६) रेल्वे भरती (RRB)

तथापि, सदर प्रशिक्षणाकरीता विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज मागविण्याकरीता दिनांक 10/07/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सर्व संबधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

स्वा (प्रशांत वावगे) व्यवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था, (वनार्टी) नागपुर

Website:

www.vanarti.in

जा.क्र. वनार्टी /नागपूर/आस्था/४४३/२०२६-२७

दिनांक :-०८/०६/२०२६

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (गट-ब व गट-क) परीक्षा पूर्व ऑफलाईन प्रशिक्षण 2026-27 करीता

योजनेचा तपशील

महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन-क्रिमिलेअर गटातील विद्यार्थ्यांना वनार्टी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) गट-ब व गट-क परीक्षा पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणाचा कालावधी – 6 महिने

विद्यावेतन – 10,000/- प्रतिमाह (75% उपस्थिती असल्यास)

आकस्मिक निधी 12,000/- (एकवेळ)

योजनेच्या लाभासाठी पात्रता :

  1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
  2. विद्यार्थी विमुक्त जाती / भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील असावा/असावी.
  3. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा अथवा अंतिम वर्षात शिक्षण घेत असावा/असावी.
  4. उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-ब व गट-क पदांसाठी पात्र असावा/असावी.
  5. विद्यार्थ्यांची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  6. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे वनार्टीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.

प्रशिक्षणाचे स्वरूप :

  1. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-ब व गट-क परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.
  2. प्रशिक्षणामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच मुलाखत मार्गदर्शनाचा समावेश असेल.
  3. सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येईल.

4. सदर प्रशिक्षणाचा कालावधी 12 महिन्यांचा असेल.

5. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल.

6. प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल

आरक्षण :

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :

अ.क्र.

सामाजिक प्रवर्ग

टक्केवारी

1

विमुक्त जाती (VJ-A)

40%

2

भटक्या जमाती – ब (NT-B)

22.50%

3

भटक्या जमाती – क (NT-C)

22.50%

4

भटक्या जमाती – ड (NT-D)

15%

एकूण

100%

समांतर आरक्षण :

1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत.

2. दिव्यांगांसाठी 5% जागा आरक्षित आहेत.

3. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसह)

2. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)

4. पदवीची गुणपत्रिका / पदवी प्रमाणपत्र

5. अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)

6. दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

अर्ज कसा करावा :

1. वनार्टीच्या संकेतस्थळावरील Notice Board मधील “Application for MPSC Group-B & Group-C Examination Training 2026-27” या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

2. अर्ज भरताना लाल रंगाच्या (*) चिन्हाने दर्शविलेली माहिती भरणे बंधनकारक राहील.

3. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात स्कॅन करून अपलोड करावीत.

अटी व शर्ती :

1. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25/06/2026 राहील.

2. पोस्टाने अथवा ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज स्वीकारणे अथवा नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक, वनार्टी यांचे राहतील.

4. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) व प्रतीक्षा यादी (Waiting List) वनार्टीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

5. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणास रुजू झाल्याच्या दिनांकापासून वनार्टीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि, प्रत्यक्ष प्रशिक्षणास किमान 75% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्यावेतन देय राहील.

6. उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची, अपूर्ण अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल व आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

7. या पूर्वी वनार्टीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असल्यास अथवा शासनाच्या इतर समकक्ष संस्थांकडून याच स्वरूपाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला असल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

8. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.

9. अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत वनार्टीच्या कॉल सेंटरशी संपर्क साधावा.

स्वा (प्रशांत वावगे)

व्यवस्थापकीय संचालक (प्र) वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था, (वनार्टी), नागपूर

ALSO READ


वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्याबाबत…

दिनांक :- १४.११.२०२५


संदर्भ :
१) शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्र. महाज्यो-२०२३/प्र.क्र.३८/ संस्था, दिनांक ८/१०/२०२४.
शुध्दीपत्रक
संदर्भ क्र. १ येथे नमूद दि. ०८.१०.२०२४ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. १ व परिच्छेद क्र. २(१) मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

            शुध्दीपत्रक

संदर्भ क्र. १ येथे नमूद दि. ०८.१०.२०२४ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. १ व परिच्छेद क्र.२(१) मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.


परिच्छेद क्र. १) गोर बंजारा जमातीसह अन्य विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क व
भटक्या जमाती-ड या मागासलेल्या जमातीच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने प्रामुख्याने या जमातींचे संशोधन व अभ्यास करण्यासाठी तसेच, त्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकडे प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी व या घटकांतील विद्यार्थी, युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध कार्यक्रम / उपक्रम राबविण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत नियम ८ अन्वये, “वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी)” ही स्वायत्त संस्था मुंबई येथे स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


परिच्छेद क्र.२) १. प्रामुख्याने गोर बंजारा जमातीसह अन्य विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क व भटक्या जमाती-ड या प्रवर्गातील इतर वंचित आणि उपेक्षित वर्गातील सदस्य / कुटुंबांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास करणे आणि समजून घेणे, सदर घटकांसाठी सरकारला विविध उपाययोजना सुचवणे.


सदर शासन शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक क्र. २०२५१११४१२५३३४५७३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शुध्दीपत्रक पीडीएफ प्रत लिंक 

सह सचिव, महाराष्ट्र शासन

Establishment Of VANARTI
Establishment Of VANARTI

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांक: महाज्यो२०२३/प्र.क्र.३८/ संस्था मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

Leave a Comment

error: Content is protected !!