Sanch Manyata
Sanch Manyata
Sanch Manyata update
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पहिला मजला, पुणे
२५/८/222 जा.क्र. शिसंमा/ संचमान्यता/कंप- २०२४-२५/
दिनांक 15 JAN 2025
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व,
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व,
विषय : संचमान्यता सन २०२३-२४ मधील प्रलंबित शाळा व सन २०२४-२५ संचमान्यता बाबत.
संदर्भ : १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक तक्रार २०१९/प्र.क्र.७५/ टीएनटी-४. दिनांक २९/८/२०१९
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. तक्रार २०१९/प्र.क्र.७५ टीएनटी-४. दिनांक १/१०/२०१९.
वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२३-२४ च्या संच मान्यता तसेच, प्रलंबित संचमान्यता बाबत यापूर्वी माहे ऑक्टोबर, २०२४ मध्ये कॅप घेऊन आपणास सूचना देण्यात आल्या होत्या.
तसेच मागील २ महीन्यापासून वारंवार V.C घेऊन सूचना केल्या आहेत. तरीही अद्याप साधारण ३६०० शाळा वकींग पोस्ट (कार्यरत पदे) प्रलंबित असल्याने सन २०२४-२५ संचमान्यता उपलब्ध करून देणेस अडचणी निर्माण होत आहेत. प्रलंबित संच मान्यता कामकाज तत्परतेने निकाली निघण्याची कार्यवाही होत नसल्याने दिनांक २०.०१.२०२५ पासून पुनश्चः विभागनिहाय शिबीर ई-बालभारती पुणे येथे आयोजित केला असून सदर शिबोरासाठो संचमान्यता कामकाज हाताळणारे विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद स्तरावरील प्रत्येकी १ तज्ञ व्यक्ती (OTP) कामकाज करणारे खालील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून संबंधितास निर्देश देण्यात यावे.
अ.क्र.
विभागीय शिक्षण उपसंचालक
दिनांक
वेळ
मुंबई व लातूर.
२०.०१.२०२५
सकाळी १०.०० वा.
नाशिक व कोल्हापूर.
२१.०१.२०२५
सकाळी १०.०० वा.
नागपूर व अमरावती.
२२.०१.२०२५
सकाळी १०.०० वा.
छत्रपती संभाजी नगर व पुणे.
२३.०१.२०२५
सकाळा १०.०० वा.
तसेच सदर कामकाजासाठी आपल्या कार्यालयातील एकच कर्मचारी उपस्थित राहील याचो दक्षता घ्यावी तसेच शिबीरामध्ये आपल्या जिल्ह्यातील संबंधित शाळेतील अथवा अन्य कोणतीही व्यक्ती कर्मचारी येणार नाहो याची दक्षता घ्यावी.
परिपत्रक या ओळीला स्पर्श करून डाऊनलोड करा
(डॉ. श्रीराम पानझाडे)
शिक्षण सहसंचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे
Also Read 👇
संचमान्यता 2024-25
शाळांची संचमान्यता उपलब्ध
आपल्या शाळांची संचमान्यता डाउनलोड करा.
ज्या शाळांनी संच मान्यता पोर्टल वरून सन 2024-25 करिता Working Teaching/Non Teaching ची माहिती भरून finalize केलेली आहे.
Student portal मधून संचमान्यता 2024-25 करिता विद्यार्थी Forward केलेले आहे.
अशाच शाळांची संच मान्यता Generate करण्यात येत आहे.
संचमान्येसाठी 01.10.2024 रोजी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतरांची माहिती भरावी.
वाचा
संचमान्यता सुधारित निकष 2024 या ओळीला स्पर्श करा
आधार नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरणेबाबत
Sanch Manyata सन २०२४-२५ ची संचमान्यता दुरुस्त करणेबाबत
Sanch Manyata
Sanch Manyata 2024 -2025 Durusti
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
क्रांक: प्राशिर्स/सं.मा.दु./२४/२-५००/7626
दिनांक 9 DEC 2024
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, (सर्व)
विषय: सन २०२४-२५ ची संचमान्यता दुरुस्त करणेबाबत.
संदर्भ: शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१५ (प्र.क्र १६/१५)/ टीएनटी-२, दिनांक १५.०३.२०२४
उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भाधिन शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक, शाळांतील विद्यार्थ्याच्या पटसंख्येच्या अधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजुर करणे इ.संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
वाचा – शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१५ (प्र.क्र १६/१५)/ टीएनटी-२, दिनांक १५.०३.२०२४ या ओळीला स्पर्श करा
२/- तरी, आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, इ. सर्व) सन २०२४-२५ व्या संचमान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेलीआहे. सबब, आपल्या अधिनस्त सर्व (स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन इ. सर्व) यांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावे.
१. शिक्षक/शिक्षकेतर पदांची संच मान्यतेकरीता वर्किंग पोस्ट (मान्यता प्राप्त कार्यरत पदे) भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.
२. चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन (चेंज मेंनजेमेंट) आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करुन पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
३. शिफ्टीग ऑफ पोस्ट. (आवश्यकता असल्यास कार्यवाही करण्यात यावी.)
४. उच्च माध्यमिक अँड पोस्ट करणे.
५. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वर्ग खोल्याची अचुक माहिती भरणे.
६. मुख्याध्यापक यांनी ३० सप्टेंबर २०२४ चे विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी करुन संचमान्यतेकरीता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करुन संचमान्यतेकरीता फॉरवर्ड करावे.
तरी, प्रणालीवर उक्त कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. व तसे या कार्यालयास अवगत करण्यात यावे.
शिक्षण संचालक मार्थ्यांमक व उच्च माध्यमिक म.रा.पुणे
शिक्षण संचालक
प्राथमिक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे