TET CTET MCQs Quiz
आजची सराव चाचणी 10
Free Test Number
TET Practice Test 2025 -26
Bilingual (Marathi & English)
Sub: ]Math
Marks: 20
TET 2026 Special
TET/CTET Notes, Mock Tests & Solutions
TET CTET MCQs Quiz Child Psychology and Pedagogy
- बाल मानसशास्त्राचा मुख्य अभ्यासविषय कोणता आहे?
A) प्रौढांचे वर्तन
B) बालकाचा विकास व वर्तन
C) समाजाचा इतिहास
D) शालेय इमारती
- “बालक स्वतः ज्ञानाची निर्मिती करते” हा विचार कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे?
A) वर्तनवाद
B) रचनावाद
C) परिपक्वतावाद
D) मनोविश्लेषण
- पियाजे यांचा सिद्धांत कोणत्या विकासाशी संबंधित आहे?
A) सामाजिक विकास
B) संज्ञानात्मक विकास
C) नैतिक विकास
D) शारीरिक विकास
- पियाजे यांच्या मते 0 ते 2 वर्षे ही अवस्था कोणती?
A) पूर्व-संक्रियात्मक
B) मूर्त संक्रियात्मक
C) संवेदन-चालना
D) औपचारिक संक्रियात्मक
- “वस्तू स्थायित्व” ही संकल्पना कोणत्या अवस्थेत विकसित होते?
A) संवेदन-चालना
B) पूर्व-संक्रियात्मक
C) मूर्त संक्रियात्मक
D) औपचारिक संक्रियात्मक
- 2 ते 7 वर्षे वयोगट पियाजे यांच्या कोणत्या अवस्थेत येतो?
A) संवेदन-चालना
B) पूर्व-संक्रियात्मक
C) मूर्त संक्रियात्मक
D) औपचारिक संक्रियात्मक
- पूर्व-संक्रियात्मक अवस्थेतील बालकाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते?
A) अमूर्त विचार
B) अहंकेद्रित विचार
C) तार्किक विचार
D) वैज्ञानिक विचार
- पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्षे ही अवस्था कोणती?
A) मूर्त संक्रियात्मक
B) संवेदन-चालना
C) पूर्व-संक्रियात्मक
D) औपचारिक संक्रियात्मक
- औपचारिक संक्रियात्मक अवस्था साधारणपणे कोणत्या वयानंतर सुरू होते?
A) 2 वर्षे
B) 7 वर्षे
C) 11 वर्षे
D) 5 वर्षे
- “समायोजन” म्हणजे काय?
A) जुनी योजना वापरून नवे अनुभव समजणे
B) नवीन अनुभवांनुसार मानसिक योजना बदलणे
C) पाठांतर करणे
D) शिक्षा देणे
- “आत्मसातीकरण” म्हणजे काय?
A) नवीन परिस्थितीनुसार योजना बदलणे
B) जुन्या ज्ञानाच्या आधारे नवीन अनुभव समजणे
C) विसरणे
D) अनुकरण करणे
- वायगोत्स्की यांचा सिद्धांत कोणता आहे?
A) सामाजिक-सांस्कृतिक सिद्धांत
B) मनोविश्लेषण सिद्धांत
C) नैतिक विकास सिद्धांत
D) अभिजात अनुबंधन
- ZPD ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे?
A) पियाजे
B) वायगोत्स्की
C) स्किनर
D) पावलॉव्ह
- ZPD चा अर्थ काय?
A) बालक जे स्वतः करू शकते ते
B) मदतीने शिकू शकण्याचे क्षेत्र
C) शिक्षेचे क्षेत्र
D) परीक्षेचे क्षेत्र
- Scaffolding म्हणजे काय?
A) कायमस्वरूपी मदत
B) तात्पुरती शैक्षणिक मदत
C) शिक्षा
D) पाठांतर
- वायगोत्स्की यांच्या मते शिकण्यात कोणाला महत्त्व आहे?
A) फक्त आनुवंशिकता
B) समाज, भाषा व संवाद
C) फक्त पाठ्यपुस्तक
D) फक्त परीक्षा
- “भाषा ही विचार विकासाचे साधन आहे” हा विचार कोणाशी संबंधित आहे?
A) वायगोत्स्की
B) थॉर्नडाइक
C) कोहलर
D) स्किनर
- स्किनर यांचा सिद्धांत कोणता?
A) क्रियाप्रसूत अनुबंधन
B) अभिजात अनुबंधन
C) अंतर्दृष्टी अध्ययन
D) सामाजिक अध्ययन
- Reinforcement म्हणजे काय?
A) वर्तन कमी करणारी प्रक्रिया
B) वर्तन वाढवणारी प्रक्रिया
C) विस्मरण
D) अनुकरण
- विद्यार्थ्याला योग्य उत्तर दिल्यावर कौतुक करणे हे कोणते उदाहरण आहे?
A) शिक्षा
B) सकारात्मक प्रबलन
C) नकारात्मक प्रबलन
D) विस्मरण
या अगोदरच्या प्रश्न मंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून Solve the previous Quizzes