TET 2026 NOTIFICATION OUT
TET 2026 NOTIFICATION OUT
MH TET 2026 NOTIFICATION OUT
MH TET Exam 2026 Online Apply Link
Maharashtra TET Exam 2026 Time Table
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, (दुसरा व चौथा मजला) सर्व्हे नं. ८३२-ए, फायनल प्लॉट क्रमांक १७८ व १७९ बालचित्रवाणी जवळ, आधारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे – ४११००४.
परीक्षा प्राधान्य
जा.क्र. मरापप/यापवि/२०२६/२८०३
दिनांक: ०२/०७/२०२६
प्रति,
मा. व्यवस्थापक, IBPS, गोपनीय संस्था,
मुंबई.
विषयः- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करणेबाबत.
संदर्भ
:- १. या कार्यालयाचे प्रसिध्द निवेदन दिनांक १५/०५/२०२६
२. या कार्यालयाचे जाहिर प्रकटन दिनांक २७/०६/२०२६
३. या कार्यालयाचा दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजीचा मेल.
महोदय,
उपरोक्त संदभर्भीय क. १ अन्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२६ चे आयोजन दिनांक २८ जून २०२६ रोजी करण्यात आले होते. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये पेपर क्र. १ एकूण २५८०६१ व पेपर क्र. २ एकूण ३४२०६४ असे एकूण ६००१२५ परीक्षाथीनी परीक्षेकरीता ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र (फॉर्म) भरले होते. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये पेपर क्र. १७०१ व पेपर क्र. २१०२८ असे एकूण १७२९ परीक्षा केंद्र निश्चित केलेले होते. परीक्षा केंद्रांवर सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
तथापि उपरोक्त या कार्यालये संदर्भ क्र. (२) जाहिर प्रकटनाद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -२०२६ चे आयोजन दि. २८/०६/२०२६ रोजी न घेता सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
यापूर्वी सदर परीक्षा घेणेकरीता उपरोक्त संदर्भिय मेल (३) अन्वये परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने घेणेबाबत आपणास अवगत करण्यात आले होते.
दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्र. १३८५/२०२५ तसेच अन्य संबंधित याचिकांवर दोन न्यायाधिशांच्या खंडपीठाने सेवेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार सेवेतील शिक्षकांना व सेवेत येणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता सन २०२८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सबब सदर परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान दोनदा घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाईन कार्यपद्धची अवलंब करुन घ्यावयाच्या असल्याने शासन निर्देशानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२६ चे आयोजन आपल्या संस्थेमार्फत शक्य तितक्या लवकर सुरक्षितरित्या व पारदर्शकपणे घेणेकरीता विनंती करण्यात येत आहे. सोवत :
१. माध्यम निहाय व पेपर निहाय प्रविष्ठ परीक्षार्थी संख्या.
२. जिल्हा निहाय परीक्षार्थी व निश्चित केलेल्या केंद्रांची संख्या,
३. जिल्हा निहाय सेवेत कार्यरत परीक्षार्थी शिक्षकांची संख्या.
४. जिल्हा निहाय दिव्यांग उमेदवार (परीक्षाथीची) संख्या (लेखनिकासह व लेखनिकाशिवाय).
५. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) बाबतचे शासन निर्णय
(महेश चोथे)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४
प्रत माहितीस्तव सविनय सादरः-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे -१
________ ALSO READ _______
जा.क्र./मरापप/स्वि. सहा/२०२६/२२२
दिनांक : २७/०६/२०२६
जाहीर प्रकटन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ चे आयोजन केले होते. या कार्यालयाचे जा.क्र./मरापप/स्वि.सहा/२०२६/२२१, दि. २७ जून २०२६ रोजी जाहीर केलेल्या जाहीर प्रकटनानुसार दि. २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
तथापि, शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्यावत परीक्षेची दिनांक परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेले नाही. तरी कोणत्याही सोशल मिडीयाच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये. सदर परीक्षा दिनांक यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
(महेश चोथे)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४.
________ ALSO READ _______
Teacher Eligibility Test Dated 28th June, 2026 Instructions for Candidates
जा.क्र. मरापप/स्वी. सहा/218/2026
दि. 22/06/2026
शिक्षक पात्रता परीक्षा दि. 28 जून, 2026 उमेदवारांसाठी सूचना :-
- परीक्षा केंद्रावरील उपस्थिती करिता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश पत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल.
- उमेदवारांची तपासणी / झडती (Frisking), ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदविणे, सूचना देणे, इत्यादी स्वरूपाच्या कार्यवाहीसाठी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, वाहतूक समस्या, आंदोलने, मोर्चा, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात परीक्षा परिषदेची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
- परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनाधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.
- परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंग करिता केंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
- परीक्षेवेळी मद्य किंवा/आणि मादक अमली पदार्थांचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच अशा उमेदवारांवर परीक्षा परिषदेच्या स्वेच्छाधिकारनुसार परिषदेमार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतीरोधित करण्यात येईल.
- पडताळणी / तपासणी संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे.
- परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स.
- परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र णपत्र आणि वर नमूद पाच वैध ओळखपत्रांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.
- मूळ ओळखपत्राच्या पुराव्या ऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व उमेदवारास प्रवेश नाकारण्यात येईल.
- उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर स्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत पेपरच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
- भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDIA) च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीला सह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhar Generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाऊनलोड केलेले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.
15). नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
16). परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी राहील :-
अ). परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले सुस्पष्ट स्वरूपातील प्रवेश पत्र,
ब). काळ्या /निळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन,
क). मूळ वैध ओळखपत्र,
ड). मूळ वैध ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत,
ई). पाण्याची पारदर्शक बॉटल,
17). परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य (पाऊच, बॅग, पर्स, नोट्स, पुस्तक, लेखन पॅड इत्यादी) परीक्षा कक्षामध्ये नेण्यास सक्त मनाई आहे.
18). कोणत्याही प्रकारचे बुटांना (Shoes & Socks) वर्ग खोलीमध्ये परवानगी असणार नाही. उघडे पादत्राणे जसे की चप्पल, स्लीपर, सँडल व इतर हलके फुटवेअर घालावेत.
19). दिव्यांग उमेदवारांनी आवश्यक प्रपत्रे भरून https://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवाराने स्वतःच्या लॉगिनमधून अपलोड करणे अनिवार्य आहे. संकेतस्थळावर फक्त ‘प्रपत्र तीन’ अपलोड करावे व प्रपत्र तीन अपलोड करण्याची सुविधा त्याच उमेदवारांना आहे, ज्या उमेदवारांनी लेखनिक / मदतनीस ची मागणी आवेदन पत्र भरताना केलेली आहे. तसेच सदरील प्रपत्रे उमेदवाराने परीक्षेच्या दिवशी समवेक्षक /केंद्र संचालक यांच्याकडे जमा करावीत. तथापि आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त इतर कोणतेही कागदपत्र परीक्षा कक्षामध्ये घेऊन गेल्यास परीक्षा परिषदेच्या सूचनांचे उल्लंघन समजून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
20). उमेदवारांनी पेपर। व ।। साठी नोंदणी केलेली आहे, त्या उमेदवारांना दोन प्रवेश पत्र देण्यात आलेली आहेत आणि दोन्ही पेपरचे बैठक क्रमांक देखील वेगवेगळे असणार आहेत.
21). परीक्षार्थीने आपला बैठक क्रमांक नमूद असलेली उत्तरपत्रिका (OMR) प्राप्त झाल्याची खात्री करावी. उत्तर पत्रिकेवरील माहिती व उत्तरे नोंदविण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचाच वापर करावा.
22). उत्तरपत्रिकेवर परीक्षा दालनात प्राप्त प्रश्नपत्रिकाचा संच कोड (A/B/C/D) अचूक नोंदवावा व त्या समोरील संबंधित गोल अचूक गिरवावा.
23). उत्तरपत्रिकेवर दिलेल्या योग्य पद्धतीनुसार अचूक उत्तर नोंदवावे. अयोग्य पद्धतीने नोंदविलेले उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. अर्धवट गिरविले गोल, खाडाखोड किंवा एकाच प्रश्नासाठी दोन गोल गिरविलेले असतील, तर अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
24). प्रत्येक प्रश्नाचे पर्यायांपैकी कोणतेतरी एक उत्तर बरोबर आहे. एकदा गिरवलेला पर्याय बदलता येणार नाही. आधी नोंदविलेले उत्तर पुसण्यासाठी खोड रबर, ब्लेड किंवा व्हाइटनर चा उपयोग करू नये. अशा उत्तरास गुण दिले जाणार नाहीत.
25). परीक्षेची वेळ संपताच सोडविलेल्या आणि न सोडविलेल्या प्रश्नांची संख्या अंकात उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत अचूक नोंदविणे बंधनकारक आहे.
26). उमेदवाराने परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तर पत्रिका समवेक्षकांकडे देऊन कार्बन प्रत (तिसरी प्रत) स्वतःकडे घ्यावी व तशी स्वाक्षरी स्वाक्षरीपटावर करावी. तसेच परीक्षा संपल्यानंतर समवेक्षकांच्या सूचने शिवाय परीक्षा दालन सोडू नये.
27). प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नांच्या उत्तराची नोंद करू नये. प्रश्नपत्रिकेचे कोणतेही पृष्ठभाग मूळ प्रश्नपत्रिकेपासून वेगळे करू नये.
28). महिला उमेदवारांना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. तथापि Live CCTV मध्ये सर्व उमेदवारांचे चेहरे स्पष्ट दिसावेत, यासाठी परीक्षा कालावधीत वर्गखोलीत मानेच्या वर म्हणजेच कानावर, डोक्यावर किंवा चेहरा तोंडावर कोणत्याही प्रकारचा कपडा आवरण असता कामा नये.
डॉ. नंदकुमार बेडसे (भा.प्र.से), अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
Regarding clarification regarding the use of dupatta, burqa and hijab by female candidates in the Teacher Eligibility Test
जा.क्र.मरापप/स्वी. सहा/217/2026
दि. 22/06/2026
विषय शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महिला उमेदवारांना दुपट्टा, बुरखा व हिजाब वापरासंबंधी खुलासा करणेबाबत…
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 28 जून, 2026 रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परीक्षा केंद्रावर सर्व वर्ग खोल्यांमध्ये Live सीसीटीव्हीचा वापर करण्यात येणार असल्याने संपूर्ण चेहरा स्पष्टपणे दिसावा यासाठी दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि महिला उमेदवारांना बुरखा, हिजाब व दुपट्टा वापरण्यास परवानगी द्यावी असे मेल प्राप्त झाले आहेत. सदर मुद्द्द्यावर पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात येत आहे:-
मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रीट याचिका WPL क्र. 17737 / 24, Zainab Abdul Qayyum Choudhary Vs Chembur Trombay Edu. Societys, Chembur Trombay Education Society’s, N.G. Acharya and D.K. Marathe College of Art, Science and Commerce, Chembur, Mumbai, आदेश दि.26/06/2024 मध्ये ९ महिला विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या ड्रेस कोड सूचनांना आव्हान दिले, ज्यामध्ये हिजाब, बुरखा, नकाब आणि इतर धार्मिक ओळख दर्शवणारे पोशाख कॅम्पसमध्ये प्रतिबंधित करण्यात आले होते. सदर न्याय निर्णयामध्ये मा. उच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविलेले आहे :-
In the writ petition, it has been pleaded that the petitioners have been donning a Hijab and/or Nakab for last few years. The pleadings in the writ petition to support the plea that donning of a Hijab or Nakab is an essential religious practice however are insufficient. Except for stating that the same constitutes an essential religious practice on the basis of the English translation of Kanz-ul-Iman and Suman Abu Dawud, there is no material placed to uphold the petitioners’ contention that donning of Hijab and Nakab is an essential religious practice. The contention in that regard therefore fails.
For the aforesaid reasons, we are satisfied that the Instructions issued by the College under which a dress code has been prescribed for its students does
not suffer from any infirmity so as to violate provisions of Article 19(1)(a) and Article 25 of the Constitution of India.
भारतामधील जवळजवळ सर्व मोठ्या स्पर्धा परीक्षा UPSC, SSC, IBPS, SBI, RRB, GATE, CLAT, CA, CS, CMA इ. सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा, MPSC, GPSC, BPSC, – UPPSC सारख्या राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षेमध्ये चेहरा झाकणारे कपडे दुपट्टा, बुरखा, स्कार्फ, टोपी, गॉगल्स यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. कारण ओळख पडताळणी, बायोमेट्रिक तपासणी आणि संपूर्ण परीक्षा कालावधीत सीसीटीव्ही पडताळणी प्रक्रियेमध्ये चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असते. परीक्षांमध्ये चेहऱ्यावरील हिजाब, बुरखा किंवा दुपट्टा यावर बंदी घालण्यामागे मुख्य उद्देश Live CCTV च्या माध्यमातून संपूर्ण परीक्षा कालावधीत सर्व उमेदवारांवर बारकाईने लक्ष ठेवून गैरप्रकार रोखणे, ओळख पडताळणी सुलभ करणे व पर्यायाने परीक्षेमधील पारदर्शकता व विश्वासहर्ता कायम ठेवणे हा आहे.
परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार उदा. मोबाईल बाळगणे, मोबाईल द्वारे प्रश्नपत्रिका व्हाट्सअप टेलिग्राम द्वारे बाहेर पाठवणे, मोबाईल द्वारे उत्तरे प्राप्त करून घेणे, कानामध्ये अतिशय लहान आकाराचे वायफाय ब्लूटूथ ठेवणे, या व अशा अनेक प्रकारच्या युक्त्या आजकाल परीक्षेमध्ये गैरप्रकारासाठी वापरण्यात येत असतात. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच उमेदवारांचा संपूर्ण चेहरा, मानेच्या वरील संपूर्ण भाग म्हणजेच तोंड, कान हे अवयव स्पष्ट दिसणे आवश्यक आहेत, जेणेकरून गैरप्रकाराबाबत संशय घेण्यास वाव राहणार नाही. तोंड झाकून ठेवल्यास, कोण एकमेकांशी बोलत आहे? हे देखील कळणार नाही. तसेच परीक्षा केंद्रामध्ये संशयावरून पडताळणीसाठी एखाद्या महिला उमेदवारास चेहरा दाखविण्यास सांगितले, तर कदाचित त्यामधून वेगळाच प्रश्न उद्भवू शकतो.
नुकत्याच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या डीएलएड व संगणक लघुलेखन परीक्षेमध्ये उमेदवारांनी दुपट्टा / बुरख्यामध्ये मोबाईल लपवून परीक्षा केंद्रामध्ये आणल्याचे व वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा ही अतिशय संवेदनशील परीक्षा असून AI, ब्लूटूथ डिवाइस, शर्टच्या बटना एवढे इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर, इत्यादी बाबी लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ न देणे हे अतिशय आव्हानात्मक झालेले आहे. परीक्षा पारदर्शक व्हावी व सर्व प्रकारच्या फेरप्रकारांना आळा घालता यावा, यासाठी सर्वच 6 लक्ष उमेदवारांचे चेहरे Live CCTV मध्ये स्पष्ट दिसणे गरजेचे आहे.
एकंदरीत वरील सर्व मुद्दे लक्षात घेता शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महिला उमेदवारांना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील, तथापि परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर वर्ग खोलीमध्ये चेहरा मात्र पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये स्पष्ट दिसला पाहिजे, यासाठी मानेच्या वर, म्हणजेच कानावर, डोक्यावर किंवा तोंडावर/चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा कपडा / आवरण असता कामा नये हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात येत आहे.
डॉ. नंदकुमार बेडसे (भा.प्र.से), अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.

Maharashtra TET Exam 2026 Time Table
Maharashtra TET Exam 2026 Hall Ticket Download Link
Maharashtra TET Exam 2026 Admit Card Link
Shikshak Patrata Parkisha Pravesh Ptr Link
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2026
प्रसिद्धी निवेदन
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) – २०२६ परीक्षेचे रविवार दिनांक २१.०६.२०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते. तथापि दिनांक २१.०६.२०२६ रोजी NEET या परीक्षेचे आयोजन National Testing Agency (NTA) मार्फत संपूर्ण देशभरात विविध केंद्रावर करण्यात आलेले असून दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र एकच येत असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) – २०२६ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षार्थी हित लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) – २०२६ परीक्षेचे आयोजन दि. २९.०६.२०२६ ऐवजी रविवार दिनांक २८.०६.२०२६ रोजी करण्यात येत आहे.
अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा सुधारित कालावधी
१ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे – दि. १६.०६.२०२६ ते दि. २८.०६.२०२६
२ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर। दिनांक व वेळ – रविवार दि. २८.०६.२०२६ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
३ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ – रविवार दि. २८.०६.२०२६ वेळ १४.३० PM ते १७.०० PM
काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थीसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या
MAHA TET EXAM 2026 HALL TICKET/ADMIT CARD DOWNLOAD LINK
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ प्रवेशपत्र ऑनलाईन लिंक
या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे – ०४
स्थळ : पुणे
दिनांक : १५/०५/२०२६

—————– ALSO READ ——————
हेही वाचाल –
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 (MAHATET) जाहीर प्रकटन
प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) प्रविष्ठ होणेकरिता शैक्षणिक / व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थीकडून अर्ज मागविणेबाबत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ वेळापत्रक
अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा
१ ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी – दि. २७.०३.२०२६ ते दि. १६.०४.२०२६
२ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे – दि. ०९.०६.२०२६ ते दि. २१.०६.२०२६
३ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर । दिनांक व वेळ – रविवार दि. २१.०६.२०२६ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
४ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 11 दिनांक व वेळ कालावधी – रविवार दि. २१.०६.२०२६ वेळ १४.३० PM ते १७.०० PM
काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षाध्यर्थ्यांनी नोंद घ्यावी.
टिप :
१. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासननिर्णय परिषदेच्या वेबसाईट https://mahatet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा.
२. अर्ज भरताना परीक्षार्थीनी इ.१० वी, इ.१२ वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इ. बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरुनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावी.
३. सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क Email, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करुन ठेवावा. पेपर । (प्राथमिक स्तर) व पेपर II (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर) असा विकल्प निवडावा, जेणेकरुन परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
४. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ Online अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन, बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही.) परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
५. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
६. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच, आवेदनपत्र / कागदपत्र (प्रमाणपत्रे) गटशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.
७. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करु न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
८. एका पेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही.
९. शिक्षक पात्रता परीक्षा सन २०१९ व २०१८ या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे गु.र.नं. ५६/२०२१ व ५८/२०२१ अन्वये सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर, पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्हयाचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित अशी शास्ती निश्चित करून, या कार्यालयाचे आदेश क्र. मरापप/बापवि/२०२२/३८४४ दि. ०३.०८.२०२२ व आदेश क्र. मरापप/बापवि/२०२२/४८३९ दि. १४.१०.२०२२ अन्वये गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी/उमेदवार यांचे विरूध्द शास्ती निश्चित केलेली आहे. सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सबब सन २०१९ व २०१८ गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही. तथापि सन २०१९ व २०१८ गैरप्रकाराच्या यादी मध्ये नाव समाविष्ठ असुन सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची परीक्षार्थी/उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.
१०. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in संकेतस्थळ तपासावे.
११. परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे.
माहिती स्त्रोत
हेल्पलाईन नंबर ९०२८४७२६८१/८२/८३
दुरध्वनीद्वारे सहाय्य उपलब्धता वेळ सकाळी १०.०० ते सायं ६.००
सविस्तर माहिती करिता संकेतस्थळ https://mahatet.in
(महेश चौथे)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४
स्थळ : पुणे
दिनांक : /०३/२०२६
हेही वाचाल –
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2026 साठी उपयोगी सराव प्रश्न मंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - जून २०२६
Maharashtra Teacher Eligibility Test - June 2026
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना वाचून अचूकपणे माहिती भरावी.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून २०२६ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचनाः-
खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.
१. पोर्टल, नवीन नोंदणी करा (नवीन यूजर तयार करणे)
२. ऑनलाईन नोंदणी.
३. आवेदनपत्र भरणे.
४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.
५. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे.
६. आवेदन पत्राची प्रिंट घेणे.
TET 2026 परीक्षेची नोंदणी व अर्ज कसा भरावा पायऱ्या नुसार मार्गदर्शन पीडीएफ Step By Step Guidance pdf


