MAHA TET 2025
MAHA TET 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५
Bप्रसिद्धी निवेदन
उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन दिनांक २३.११.२०२५ रोजी करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेसाठी राज्यभरातील ३७ जिल्हास्तरावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण १४२३ केंद्र निश्चित केले आहेत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२५ परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती व सूचना देण्यात येत आहेत.
परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची/उमेदवारांची सांखिकिय माहिती पुढील प्रमाणे,
पेपर प्रविष्ठ परिक्षार्थीची संख्या
पेपर १ २०३३३४
पेपर २ २७२३३५
एकूण ४७५६६९
सदर परीक्षा पेपर १ साठी ५७१ केंद्र तर पेपर २ साठी ८५२ केंद्रावरील प्रत्येक वर्गखोली व परिसरात CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सुरक्षा तपासणीसाठी अनुषंगीक सुविधा दिलेल्या आहेत. सदर सुविधांचा तपशिल खालीलप्रमाणे :-
१. Frisking (HHMD):
परीक्षा केंद्रात प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थी (दिव्यांग उमेदवारांचे लेखनिकासह) यांचे मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने Frisking केले जाणार आहे. परीक्षार्थीनी इलेक्ट्रॉनिक साहित्य उदा. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर इत्यादी उपकरणे परीक्षा केंद्रात जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
२. परीक्षार्थी यांचे बायोमेट्रीक, Face Recognition व तपासणी :-
परीक्षा केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येक परीक्षार्थीची हॅन्ड होल्ड मेटल डिटेक्टरच्या (HHMD) सहाय्याने तपासणी केली जाणार आहे, तसेच त्यांची (Biometric) बायोमेट्रीक घेतले जाणार आहे. प्रत्येक परीक्षार्थ्यांचे Face Recognition केले जाणार आहे. आवेदनपत्राच्या मूळ डाटाबेसशी साधम्यं असणाऱ्या विद्यार्थ्यांसच प्रवेश दिला जाणार आहे. काही वेळा मूळ डाटाबेसशी विद्यार्थ्यांचे Face Recognition माहिती न जुळल्यास केंद्रसचांलकांनी प्रत्यक्ष व्यक्ती, त्यांचे आयकार्ड, प्रवेशपत्रावरील फोटो यांची खातरजमा करून ओळख पटल्यानंतर त्या परीक्षार्थीच्या प्रवेशाबाबत देण्यात येणार आहे. मूळ विद्यार्थ्यांऐवजी अन्य उमेदवार प्रवेश करत असल्याचे आढळल्यास त्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे,
३. CCTV कॅमेरे :-
सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्रसंचालकाच्या कक्षात CCTV कैमेरे बसविण्यात येणार आहेत. सदर कॅमेऱ्यांचा Live Access शिक्षणाधिकारी कार्यालय व परीक्षा परिषदेत घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्व परीक्षा दालनांवर जिल्हा व राज्यस्तरांवरून सनियंत्रण ठेवले जाणार आहे. सदर Access हा Artificial Intelligence Based असल्याने अत्यंत काटेकोरपणे हे सनियंत्रण होणार आहे. यामध्ये CCTV बाबत गैरकृत्य केल्यास, पर्यवेक्षकांनी वेळोवेळी परीक्षा कक्षात फेऱ्या न मारल्यास, विद्यार्थ्यांनी त्यांची बैठक व्यवस्था हलवल्यास अथवा परीक्षेच्या अनुषंगाने अनावश्यक हालचाली इत्यादी बाबी झाल्यास लगेचच सूचना जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षास व परीक्षा परिषदेस प्राप्त होणार आहे.
४. PHOTO VIEW :-
Photo View या सुविधेतील पहिली सुविधा म्हणजे Photo View मध्ये मागील केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मागील वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या सर्व महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ परीक्षांमधील उमेदवारांचे (Proxy Exam Prevention) फोटो व नावे आपल्या या परीक्षेमधील उमेदवारांसोबत पडताळणी करण्यात येणार (Historical Analysis) असून, एक उमेदवार व दोन वेगवेगळे फोटो (Morphed Photo Detection) किंवा एकच फोटो मात्र दोन वेगवेगळी नावे (Impersonation Prevention) असलेल्या उमेदवारांची यादी, तसेच एकाच उमेदवाराने वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर अनेक आवेदनपत्र भरलेले असल्यास (Duplicate Application Prevention) अशा उमेदवारांची यादी आपल्याला परीक्षेपूर्वीच पडताळणीसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे परीक्षेपूर्वी तसेच परीक्षेच्या वेळी देखील बोगस डमी विद्यार्थ्यांची ओळख तात्काळ करता येणार आहे.
- CONNECT VIEW:-
Connect View मध्ये प्रत्येक परीक्षा केंद्रसंचालक, परीक्षा संनियंत्रण कक्ष व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कक्ष यांचेकडे हॉटलाईनचे फोन उपलब्ध असतील सदर सुविधेमार्फत आवश्यकतेनुसार संबंधितांशी संपर्क साधला जाईल व या फोनच्या माध्यमातून दिवसभर नियमीतपणे केंद्रसंचालकासाठी विविध सूचना एकाचवेळी निर्गमित करता येतील, दिलेल्या सुचनांचे (Broadcast) संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध असणार आहे. जेणेकरून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमधील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राहून परीक्षा शिस्तबध्द पद्धतीने घेण्यात येईल.
परक्षेसंबंधी युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या/अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in
व
http://mahatet.in
अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचना व माहितीचे अवलोकन करावे.
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे – ०४
स्थळः पुणे
दिनांक: १९/११/२०२५
ALSO READ 👇
महत्वाचे परीक्षा प्राधान्य
जा.क्र. मरापप/बापवि/२०२५/५७७५
दिनांक: २१/११/२०२५
विषय:- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२५ साठी दि. २२ व २३ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांकरिता निवडणूक प्रशिक्षण तसेच पर्यवेक्षक बी.एल.ओ. (BLO) व तद्अनुषंगिक कामकाजातून वगळणेबाबत
ALSO READ 👇
Maharashtra Teacher Eligibility Test – 2025 online apply link
Maharashtra TET 2025 Registration link
Maharashtra TET 2025 notification GUIDELINES
Maharashtra TET 2025 exam date schedule
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५
प्रसिद्धी निवेदन
दिनांक : ०३/११/२०२५
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी घेण्याचे नियोजित आहे.
ALSO READ –
प्रसिद्धी निवेदन
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी घेण्याचे नियोजित आहे.
सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी दि. १५/०९/२०२५ ते दि. ०३/१०/२०२५ पर्यंत होता. परंतु महाराष्ट्रात काही जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षाथी/उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थी/उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दि. ०४/१०/२०२५ ते दि. ०९/१०/२०२५ रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
तसेच विद्यार्थी/उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षाथी उमेदवारांना नेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड द्वारे दि. ०९/१०/२०२५ रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सबब यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.
(अनुराधा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४
स्थळ : पुणे
दिनांक : ०३/१०/२०२५
Also Read 👇
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2025
प्रसिद्धी निवेदन
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (TET) – २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी घेण्याचे नियोजित आहे.
इ. १ ली ते ५ वी (पेपर १) व इ. ६ वी ते इ. ८ वी (पेपर २) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दि. १५/०९/२०२५ पासून सुरु होत असून दि. ०३/१०/२०२५ पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील. संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.
अ.क्र.
कार्यवाहीचा टप्पा
कालावधी
१ ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी
दि. १५/०९/२०२५ ते दि. ०३/१०/२०२५
२ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे
दि. १०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५
३ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ
रविवार दि. २३/११/२०२५ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
४ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ
रविवार दि. २३/११/२०२५ वेळ १४.३० PM ते १७,०० PM
काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या
या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे – ०४
स्थळ : पुणे
दिनांक : ११/०९/२०२५
*** काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या
या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.
टिप :
१. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासननिर्णय परिषदेच्या वेबसाईट
वर उपलब्ध
आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा. २. अर्ज भरताना परीक्षार्थीनी इ.१० वी, इ.१२ वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादि बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरुनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणा
पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावी.
३. सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क Email, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करुन ठेवावा, पेपर 1 (प्राथमिक स्तर) व पेपर II (उच्च प्रायमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर) असा विकल्प निवडावा, जेणेकरुन परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
४. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ Online अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन, बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही.) परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
५. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
६. ऑनलाईन आवेदनपत्रासोयत फोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच, आयेदनपत्र / कागदपत्रे (प्रमाणपत्रे) गर्दाशक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.
७. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोपित फेला जाईल, परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या घेळी करण्यात येईल, प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथया उमेदवार प्रमाणपत्रे सादर करु न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल, ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
८. एका पेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही.
९. शिक्षक पात्रता परीक्षा सन २०१९ व २०१८ या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे गु.र.नं. ५६/२०२१ व ५८/२०२१ अन्वये सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर, पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्हयाचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित अशी शास्ती निश्चित करून, या कार्यालयाचे आदेश क्र. मरापप/वापछि/२०२२/३८४४ दि. ०३/०८/२०२२ व आदेश क्र. मरापप/बापवि/२०२२/४८३९ दि. १४/१०/२०२२ अन्वये गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी/उमेदवार यांचे विरूध्द शास्ती निश्चित केलेली आहे. सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
www.mscepune.in
व http://mahatet.in
या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सबब सन २०१९ व २०१८ गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही. तथापि सन २०१९ व २०१८ गैरप्रकाराच्या यादी मध्ये नाव समाविष्ठ असुन सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची परीक्षार्थी उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.
१०. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदेच्या
www.mscepune.in
व
http://mahatet.in
संकेतस्थळ तपासावे,
११. परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे.
हेल्पलाईन नंबर
९०२८४७२६८१/८२/८३
माहिती स्त्रोत
दुरध्वनीद्वारे सहाय्य उपलब्धता वेळ
सकाळी १०.०० ते सायं ६,००
सविस्तर माहिती करिता संकेतस्थळ
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे – ०४
स्थळ : पुणे
दिनांक: ११/०९/२०२५


