Maharashtra TET Syllabus And Exam Pattern

Maharashtra TET Syllabus And Exam Pattern

Maharashtra TET Syllabus And Exam Pattern

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

    पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी प्राथमिक स्तर) Maha TET Paper 1 Syllabus

            महाराष्ट्र टेट अभ्यासक्रम PDF

भाषा-१मराठीइंग्रजीउर्दूबंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२इंग्रजीमराठीमराठी किंवा इंग्रजीमराठी किंवा इंग्रजी

इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील

    ३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.

Also Read – Tet Mandatory For Teachers And Calculation Of Exam Attempts

            ४) गणित :-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

        ५) परिसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :-

वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

    संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके

        पेपर (२) (इ. ६ वी ते ८ वी उच्च प्राथमिक स्तर) - Maharashtra TET Exam Paper 2 Syllabus

    १) भाषा-१ व २) भाषा-२ पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१मराठीइंग्रजीउर्दूबंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२इंग्रजीमराठीमराठी किंवा इंग्रजीमराठी किंवा इंग्रजी

इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.

    ३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

    ४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

    ४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.
संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम
प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके
प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

    पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी प्राथमिक स्तर) - TET Exam Pattern For Paper 1

        MAHA TET Syllabus in Marathi

एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र.विषय (सर्व विषय अनिवार्य)गुणप्रश्न संख्याप्रश्न स्वरुप
०१ बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र३०३० बहुपर्यायी
०२ भाषा-१३० ३० बहुपर्यायी
०३ भाषा-२३० ३० बहुपर्यायी
०४ गणित३०३०बहुपर्यायी
०५ परिसर अभ्यास३०३०बहुपर्यायी
एकूण१५०१५०बहुपर्यायी
    पेपर (१) (इ.१ ली ते  इ. ५ वी)

अ. क्र.माध्यमपेपर सांकेतांकविभाग १विभाग २विभाग ३विभाग ४विभाग ५
भाषा (३० गुण)भाषा (३० गुण)बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण)गणित व विज्ञान ६० गुण सामाजिकशास्त्र ६० गुण
प्रश्न क्र.१ ते ३०प्रश्न क्र.३१ ते ६०प्रश्न क्र.६१ ते ९०प्रश्न क्र.९१ ते १२०प्रश्न क्र.१२१ ते १५०
०१मराठी१०१ इंग्रजी मराठीमराठी व इंग्रजीमराठी व इंग्रजीमराठी व इंग्रजी

    पेपर (१) ( इ. ६ ते ८ वी  वी उच्चप्राथमिक स्तर) - TET Exam Pattern For Paper 2

        MAHA TET Syllabus in Marathi

एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र.विषय (सर्व विषय अनिवार्य)गुणप्रश्न संख्याप्रश्न स्वरुप
०१ बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र३०३० बहुपर्यायी
०२ भाषा-१३० ३० बहुपर्यायी
०३ भाषा-२३० ३० बहुपर्यायी
०४ अ) गणित व विज्ञान किंवा सामाजिकशास्त्रे६०६०बहुपर्यायी
एकूण१५०१५०

    पेपर (१) (इ.६  वी ते  इ. ८ वी)

अ. क्र.माध्यमपेपर सांकेतांकविभाग १विभाग २विभाग ३विभाग ४विभाग ५
भाषा (३० गुण)भाषा (३० गुण)बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण)गणित व विज्ञान ६० गुण सामाजिकशास्त्र ६० गुण
प्रश्न क्र.१ ते ३०प्रश्न क्र.३१ ते ६०प्रश्न क्र.६१ ते ९०प्रश्न क्र.९१ ते १२०प्रश्न क्र.१२१ ते १५०
०१मराठी१०२ इंग्रजी मराठीमराठी व इंग्रजीमराठी व इंग्रजीमराठी व इंग्रजी

पीडीएफमध्ये उपलब्ध

Leave a Comment

error: Content is protected !!