जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत साजरा करणेबाबत Jal Vyavasthapan Pandharwada

Jal Vyavasthapan Pandharwada

Jal Vyavasthapan Pandharwada

Water Management Action Fortnight to be observed from 15th April to 30th April

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत साजरा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक- संकीर्ण-२०२६/(प्र.क्र.९५) / लाक्षेवि (आस्था)

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक :-१३ एप्रिल, २०२६

वाचा :

१. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.०७/१६/लाक्षेवि (आस्था), दि.११/०२/२०१६.

२. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.०७/१६/भाग-१/लाक्षेवि (आस्था), दि.१७/०२/२०१६

प्रस्तावनाः-

२२ मार्च या जागतिक जलदिनानिमित्त जलजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत दरवर्षी १६ ते २२ मार्च या कालावधीमध्ये जलजागृती सप्ताह साजरा करण्याचे संदर्भीय शासन निर्णयान्वये आदेशित करण्यात आले होते. राज्यातील एकात्मिक पाणी नियोजन, सिंचन प्रकल्पाची उभारणी व सिंचन व्यवस्थापन ही महत्वाची जबाबदारी जलसंपदा विभागावर असल्यामुळे जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत होता. मात्र सदर कालावधीत राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत असल्यामुळे जलजागृती सप्ताह संबंधित कार्यक्रम राबविण्यात मर्यादा येतात ही वस्तुस्थिती विचारात घेता, आता जलजागृती सप्ताह ऐवजी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने खालीप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

१. संदर्भीय शासन क्र.१ अन्वये दिनांक २२ मार्च हा दिवस “जागतिक जल दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून प्रतिवर्षी दि. १६ मार्च ते २२ मार्च हा सप्ताह संपूर्ण राज्यात जलजागृती सप्ताह म्हणून साजरा करणेबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या.

२. दि.१६ मार्च ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह ऐवजी दिनांक १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा म्हणून साजरा करण्यात यावा.

३. संदर्भीय क्र.२ अन्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार अन्य विभागांनी त्यांच्या संबंधित विविध कार्यक्रमांच्या उपक्रमांचे नियोजन करून सदर कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात यावा.
४. जलसंपदा विभागाने सोबत जोडलेल्या प्रपत्रातील दिवस निहाय नियोजित कार्यक्रमानुसार उपक्रम राबविण्यात यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

MAHENDRAKUMAR
GULABRAO
WANKHEDE

(महेंद्रकुमार वानखेडे) शासनाचे उप सचिव

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत साजरा करणेबाबत Jal Vyavasthapan Pandharwada
जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत साजरा करणेबाबत Jal Vyavasthapan Pandharwada

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत साजरा करणेबाबत Jal Vyavasthapan Pandharwada
जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत साजरा करणेबाबत Jal Vyavasthapan Pandharwada

Leave a Comment

error: Content is protected !!