Submission of Digital Life Certificate through Beneficiary Satyapan App
Submission of Digital Life Certificate through Beneficiary Satyapan App
Regarding submission of Digital Life Certificate through Beneficiary Satyapan App to beneficiaries of Special Assistance Scheme under the Department of Social Justice and Special Assistance.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan App द्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सादर करणेबाबत.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांकः केंपुयो-२०२६/प्रक्र.४२/विसयो,मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ०७ मे, २०२६.
वाचा :-
१. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. विसयो २०१८/प्र.क्र.६२/विसयो, दिनांक २०.०८.२०१९.
२. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. विसयो २०२२/प्र.क्र.१२०/विसयो, दिनांक ०५.०७.२०२३.
३. आर्थिक सल्लागार, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्रः D.O.No.J-११०१८/१/२०२४-NSAP, दिनांक १५.०४.२०२५.
प्रस्तावना :-
राज्यात विशेष सहाय्य योजनांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येतात. सदरहू योजनांमध्ये वृध्द, विधवा, निराधार पुरुष-महिला, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, १८ वर्षाखालील अनाथ मुले-मुली इ. प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश होतो. सदरहू योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा रु.१५००/- इतके अर्थसहाय्य डी.बी.टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
२. उपरोक्त संदर्भ क्र. १ व २ येथील शासन निर्णयात “विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात-प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्याचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे” अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
३. केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल अॅपद्वारे सादर करता यावे, याकरिता संदर्भ क्र. ३ अन्वये Beneficiary Satyapan App ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. त्यानुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे. यामुळे वेळेची बचत होऊन लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्रासाठी होणारी हेलपाटे वाचतात.
४. तथापि, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थी बँक/पोस्ट ऑफिस/तहसिल कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑफलाईनरित्या सादर करतात. सदरहू योजनेतील वृद्ध, विधवा, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती इ. लाभार्थ्यांना प्रत्यक्षपणे बँक/पोस्ट ऑफिस/तहसिल कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र विहीत कालावधीत सादर करणे शक्य होत नाही. परिणामी, सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यापासून वंचित राहावे लागते.
५. सबब, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीचा वापर करुन हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल अँपद्वारे सादर करता यावे, याकरिता BSA (Beneficiary Satyapan App) ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. त्यानुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभघेणे शक्य होत आहे. त्यानुषंगाने, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील पात्र लाभार्थ्यांकरिता BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीचा वापर करुन हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतः (मोबाईल उपलब्ध असल्यास) / इतर कोणत्याही नातेवाईकामार्फत अथवा गावपातळीवरील ग्राम महसूल अधिकारी/ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक/कर्मचारी यांचे मार्फत अथवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र इ. मार्फत BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल. सदर सेवा ही लाभार्थ्यांना वापरण्यास निशुक्ल आहे. तथापि, लाभार्थ्यांनी सदर सेवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र या माध्यमातून घेतल्यास, त्याबाबतचे किमान रु. ५० इतके सेवा शुल्क लाभार्थ्यांस देय राहील.
३. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरीता कार्यपद्धती तयार केली असून याबाबत खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.१) लाभार्थ्यांने स्वतः करावयाची कार्यपद्धती :-
- प्रथमताः लाभार्थ्यांने/वापरकर्त्यांने मोबाईल द्वारे गुगल प्लेस्टोअर /ios वरुन BSA (Beneficiary Satyapan App) तसेच आधार फेस आरडी (Aadhar Face RD) हे अॅप डाऊनलोड करावे.
- त्यानंतर BSA (बेनेफिशअरी सत्यापन अॅप) मध्ये लाभार्थ्यांने/वापरकर्त्याने भाषा निवडून Proceed For Device Registration येथे क्लिक करुन आधार क्रमांक व मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करावी.
लाभार्थ्यांने/वापरकर्त्यांने नोंदणी केल्यानंतर (Device Registration) प्रत्यक्ष लाभार्थ्याचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर याद्वारे नोंदणी करावी.
IV. तद्नंतर लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहे त्या योजनेची (केंद्र/राज्य पुरस्कृत) निवड करुन, Beneficiary Verification हा पर्याय निवडावा.
V. आधार क्रमांक व उपलब्ध मोबाईल नमूद करुन सबमिट बटनावर क्लिक करावे.
VI. नंतर ओटीपी सादर करुन, चेहरा ओळख (Face Capture) किंवा बोटांच्या ठसेद्वारे (Finger/Iris) पडताळणीचा पर्याय निवडावा.
VII. त्यानंतर निवडलेल्या पर्यायाच्या आधारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) मिळणेकामी वरील पर्याय निवडल्यानुसार बोटाचे ठसे किंवा चेहरा पडताळणी करावी.
VIII. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) डाऊनलोड करावे.
१.१. मास्टर ट्रेनरची नियुक्ती :
सदर प्रणालीच्या अंमलबजाणीकरिता राज्य/जिल्हा/तालुका स्तरावर एका मास्टर ट्रेनरची निवड करण्यात यावीत. याकरिता विशेष सहाय्य योजनेची अंमलबजावणीसाठी पुरविण्यात आलेल्या तांत्रिक मनुष्यबळामधून राज्य/जिल्हा/तालुका स्तरावर एका मास्टर ट्रेनरची निवड करावी.
१.२. मुख्य जबाबदाऱ्याः
१. राज्य स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी करणे.
२. प्रशिक्षणाचे वेळापत्रक, विषय व पद्धती ठरवणे.
३. NSAP-NIC मार्फत जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्ससाठी ऑनलाईन (Virtual) प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात यावे. तसेच, प्रशिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शक पुस्तिका/मॅन्युअल उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
४. जिल्हा तसेच तालुकास्तरावर तांत्रिक मनुष्यबळ कार्यरत आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे व त्यामधूनच एका व्यक्तीची मास्टर ट्रेनर म्हणून निवड करणे. तसेच निवड करण्यात आलेल्या मास्टर ट्रेनरची यादी (ई-मेल आयडी, मोबाईल नंबर) शासनास पाठविण्यात यावी.
५. जिल्हा तसेच तालुकास्तर/गावपातळीवरील सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र उपलब्ध आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे व सदर सेवा केंद्रामध्ये बायोमॅट्रिक प्रणाली कार्यान्वित असल्याची खातरजमा करावी.
६. जिल्हास्तरावरती तसेच तालुकास्तरावर/गावस्तरावर BSA (Beneficiary Satyapan App) या अॅप/प्रणालीची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित तहसिलदार/नायब तहसिलदार यांची राहिल.१.३. प्रशिक्षण :
१. राज्यस्तरीय प्रशिक्षण यंत्रणेने त्वरीत NIC मार्फत BSA (Beneficiary Satyapan App) या अॅप/प्रणालीचे प्रशिक्षण घेऊन जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्स यांना प्रशिक्षण देण्याची आखणी करुन सर्व तालुका स्तर/गावपातळीवर व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात यावे.
२. जिल्हास्तरीय यंत्रणेने प्रशिक्षण अवगत केल्यानंतर तालुकास्तरावरील संजय गांधी शाखा (संगायो) शाखेतील कार्यरत असलेले अधिकारी/कर्मचारी, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र इ. साठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करुन संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
३. तालुका स्तरावरील यंत्रणेने ग्रामपातळीवर कार्यरत तलाठी/ग्रामसेवक/व्हीएलई/कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन निश्चित कालमर्यादा व देखरेख यंत्रणा तयार करण्यात यावी.
१.४. क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेचा वापर :
ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक इत्यादी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोबाईलचा वापर करुन घरपोच पडताळणी करण्याकरिता (Doorstep) BSA (Beneficiary Satyapan App) ही प्रणाली राबविण्यात यावी, जेणेकरुन सदर प्रणाली जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत कमी वेळेत पोहोचणे शक्य होईल.
तसेच तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी तालुका स्तरावरील यंत्रणेमार्फत BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) हे सामान्य नागरिकांमार्फत कशा पद्धतीने काढता येऊ शकतात, यासाठी त्याबाबतचे प्रशिक्षण गावपातळीवर देण्यात यावे.
१.५. जनजागृती :
लाभार्थ्यांना सत्यापन अर्जाच्या प्रचार-प्रसारासाठी विविध माहिती, शिक्षण व संप्रेषण उपक्रम राबविण्यात यावेत. लाभार्थ्यांना स्वयं-सत्यापन (Self-verification) करण्यासाठी किंवा कुटुंबीयांच्या मदतीने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे.
२) अंमलबजावणी बळकटीकरणासाठी उपाययोजना :
२.१. राज्यस्तरीय डॅशबोर्ड :
BSA (Beneficiary Satyapan App) या प्रक्रियेची रिअल टाइम प्रगती पाहण्यासाठी डी.बी.टी पोर्टलवर मॉनिटरिंग डॅशबोर्ड विकसित करण्याची जबाबदारी मे. महा-आयटी, मुंबई यांची राहिल.
२.२. हेल्पडेस्क स्थापना :
राज्य स्तरावर तांत्रिक सहाय्यासाठी स्वतंत्र हेल्पडेस्क/मदत कक्षाची स्थापन करण्यात यावी, जेणेकरुन क्षेत्रीय स्तरावरील अडचणी तात्काळ सोडवता येतील.
२.३. आढावा बैठक :
सदर प्रणालीची अंमलबजावणी शासन निर्णयाच्या दिनांकापासून करण्यात यावी. तसेच दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी तालुकास्तरावरील (तहसिलदार/नायब तहसिलदार) यंत्रणेची आढावा बैठक घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहिल. तद्नंतर सदर बैठकीचा अहवाल संबधित जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने शासनास सादर करने बंधनकारक राहील.
