जून-जुलै २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत SSC Exam Hall Ticket Admit Card Link

SSC Exam Hall Ticket Admit Card Link

SSC Exam Hall Ticket Admit Card Link

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

STD 10th EXAM Hall Ticket Link

Class 10th EXAM Online Admit Cards Link

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.

दिनांक : ०५/०६/२०२६

    !! प्रकटन !!
विषय :- जून-जुलै २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा जून-जुलै २०२६ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना जून-जुलै २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या

👇👇👇👇👇

Class 10th Exam 2026 Hall Ticket ADMIT CARD LINK

या संकेतस्थळावर सोमवार दिनांक ०८/०६/२०२६ पासून Admit Card या link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,
१. जून-जुलै २०२६ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.१२ वी व इ.१० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे Hall Ticket प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
२. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.
३. ज्या आवेदनपत्रांना “Paid” असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे “Paid Status Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
४. अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे “Extra Seat No Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
५. Download केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव/आईचे नाव / जन्मतारीख व इतर दुरूस्त्या असल्यास सदर दुरूस्त्या असल्यास विषय/माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात.
६. ज्या आवेदनपत्रांना “Paid” असे Status प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status Update होवून “Late Paid Status Admit Card” या Option व्दारे त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध होतील.
७. प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
८. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
तरी जून-जुलै २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.

   परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक 

सचिव
राज्य मंडळ, पुणे ४.

दिनांक : ०५/०६/२०२६
सचिव राज्य मंडळ, पुणे.

ALSO READ 👇

HSC EXAM 2026 Hall Ticket Admit Card LINK

SSC HSC EXAM 2026 TIME TABLE LINK

CIRCULAR PDF COPY LINK

जून-जुलै २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत SSC Exam Hall Ticket Admit Card Link
जून-जुलै २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत SSC Exam Hall Ticket Admit Card Link

Leave a Comment

error: Content is protected !!