Class 12th EXAM Online Admit Cards Link

Class 12th EXAM Online Admit Cards Link

IMG 20250109 201932
Class 12th EXAM Online Admit Cards Link

Class 12th EXAM Online Admit Cards Link

Online Hall Ticket Admit Cards of Higher Secondary Certificate Std 12th Examination

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education , Pune

Class 12th HSC Class10th SSC State Board Exams Feb Mar 2025 Hall tickets Admit Card Cancelled
12 वी HSC व 10 वी SSC बोर्ड परीक्षांचे हॉलतिकीट्स रद्द

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४
विषय:- फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
(इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत…

!! प्रकटन !!


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उन्न माध्यमिक शाळाने प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पद्धतीने मंडळाच्या

या संकेत स्थळावर शुकवार दिनांक १०/०१/२०२५ रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
या संदर्भात कळविण्यात येते की,


१) मंडळाने उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्रांवर (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) या कॉलमची छपाई करण्यात आलेली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवेशपत्रांवरील (Hall Ticket) सदरचा जातीचा प्रवर्ग (Caste Category) कॉलम रद्द करण्यात येत असून विद्यार्थ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहील याची नोंद घ्यावी. सदरची नव्याने तयार केलेली प्रवेशपत्रे (Hall Ticket) गुरुवार दिनांक २३/०१/२०२५ पासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहेत.


२) तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळानील विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) हा कॉलम रद्द करण्यात येत असून सदरची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पध्दतीने मंडळाच्या

या संकेन स्थळावर सोमवार दिनांक २०/०१/२०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजलेपासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहेत.


तसेच download संदर्भातील उर्वरित इतर सूचना व विद्याथ्यांची परीक्षाविषयक माहिती आहे तशीच कायम राहील, यात कोणताही बदल होणार नाही याची सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी उपरोक्त बाबींची नोद घ्यावी.

परिपत्रक पीडीएफ मध्ये उपलब्ध या ओळीला स्पर्श करा

स्थळ- पुणे.
दिनांक-१८/०१/२०२५
(देविदास कुलाळ)
सचिव राज्य मंडळ, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे

तातडीचे/महत्वाचे परीक्षा प्राधान्य

क्र.रा.मं./परीक्षा-७/121पुणे

दिनांक – ०९/०१/२०२५

प्रति,

विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे.

विषय :- फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत…

उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

त्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की, आपल्या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या

संकेतस्थळावर शुकवार दि. १० जानेवारी, २०२५ पासून Admit Card या link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील.

१ फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.१२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

२ प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक/प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. ३ ज्या आवेदनपत्रांना “Paid” असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे “Paid Status Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.

HSC SSC EXAM 2025 TIME TABLE LINK

४ अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे “Extra Seat No Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
५ Download केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव/आईचे नाव / जन्मतारीख अशा दुरूस्त्या असल्यास सदर दुरूस्त्या Online पध्दतीने करावयाच्या असून त्याकरीता Application Correction ही Link उपलब्ध करून देण्यात आलेली असून विहित दुरूस्ती शुल्क भरून दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर “Correction Admit Card ” या Link व्दारे सुधारीत Admit Card उपलब्ध होतील. विषय/माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात.

६ ज्या आवेदनपत्रांना “Paid ” असे Status प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status Update होवून “Late Paid Status Admit Card” या Option व्दारे त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध होतील.

७ फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.

८ प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.

उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशपत्र download करण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधणेकरीता सूचित करावे व विभागीय मंडळांनी व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्यमंडळ यांचेशी पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा. No Candidate केलेल्या परीक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे संबंधित विद्यार्थ्यांना वितरीत करू नयेत अशी स्पष्ट सूचना संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी.

उपरोक्तनुसार आपल्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य तसेच विद्यार्थी यांना सदर बाब अवगत करून देण्याबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

परिपत्रक पीडीएफ साठी या ओळीला स्पर्श करा

(देविदास कुलाळ) सचिव, राज्य मंडळ, पुणे-४.

Leave a Comment

error: Content is protected !!