Std 10th 12th Exam Copy Mukt Abhiyan
Std 10th 12th Exam Copy Mukt Abhiyan
Std 10th 12th Exam Copy Mukt Abhiyan
जा.क्र. जिपनं/शिक्षण/माध्य./परीक्षा/२०२५/२.८६
दि.०१/०२/२०२५
प्रति,
केंद्र संचालक, (लोणखेडा केंद्र क्रमांक- ६२५) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-२०२५
जिल्हा नंदुरबार
विषय – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२५ मधील गैरप्रकाराबाबत.
संदर्भ – परीक्षा केंद्रावरील झुम मिटींग अॅप द्वारे करण्यात आलेल्या रेकॉर्डीग अन्वये.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास सुचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी- २०२५ दि.११/०२/२०२५ रोजी इंग्रजी या विषयाच्या परीक्षेसाठी आपल्या लोणखेडा केंद्र क्रमांक- ६२५ मधील वर्ग क्रमांक- ०४ मध्ये श्री. भटु कुवर हे पर्यवेक्षक म्हणुन कार्यरत असुन त्यांनी सुमारे १२:१० या वेळेत प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे सदर वर्गातील झुम मिटींग अॅप मधील चित्रीकरणात निदर्शनास आले आहे.
तथापि, विधि व न्याय विभाग सन १९८२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१ महाराष्ट्र विद्यासपीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गै*रप्रकारास प्रति*बंध करण्याबाबत अधिनियम, १९८२ नुसार सदर कर्मचाऱ्या विरुध्य नजीकच्या पो*लीस ठा*णे येथे गु*न्हा दाखल करुन सदर पर्यवेक्षका विरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यासाठी संबंधित संस्था/ मुख्याध्यापक यांना अपल्या स्तरावरुन अवगत करण्यात यावे. केलेल्या कार्यवाही बाबतचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास दोन दिवसांच्या आत सादर करावा,
(प्रवीण वसंत अहिरे) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परीषद, नंदुरबार
जिल्हा परिषद, नंदुरबारशिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत,नंदुरबार (महाराष्ट्र)
प्रत माहितीस्तव सविनय सादर-
- मा. विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभाग, नाशिक
- मा.शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक
Also Read 👇
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा; कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दहावी बारावी परीक्षेच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा; यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत संवाद
इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून १८ मार्चपर्यंत ३,३७३ परीक्षा केंद्रावर तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रावर होणार
परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ ची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश; परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्याचे आदेश
■ परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी; भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना
सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्याचे निर्देश
बैठ्या पथकाने परिक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परिक्षा केंद्रावर पोहोचावे व परिक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिका-यांची बैठ्या पथकात नेमणूक करण्याचे आदेश संवेदनशील परिक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेराव्दारे आणि व्हिडीओ कॅमेराव्दारे पूर्णवेळ निगराणी करण्याच्या सूचना
■ सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिका-यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या सूचना
■ परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी
■ इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतः भेटी देण्याच्या सूचना
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
Also Read 👇
Std 10th 12th Exam Copy Mukt Abhiyan
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
विषयः उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ कॉपीमुक्त अभियान राबविणेबाचत…
!! प्रकटन !!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११/०२/२०२५ ते दि. १८/०३/२०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २९/०२/२०२५ ते दि. १७/०३/२०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय महामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणान्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचा-यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/ उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यामधून करण्याची कार्यवाही करणेबाबत दि. १७/०१/२०२५ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.वाचाल या ओळीला स्पर्श करून
तथापि उपरोक्त निर्णयाच्या संदर्भात मा. लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत. त्यामुळे या निर्णयात अंशतः बदल करण्यात येत असून फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (५. १० वी) परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.
१) कोरोना काळातील सन २०२१ व सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाथी प्रकरणे आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचान्यांमधून करण्यात येणार आहे
२) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीधांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्यायाबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
३) मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्हयात इ. १० वी व इ. १२ वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहील
४) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकायनि परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील अशी कार्यवाही करणेयावत सर्व विभागीय मंडळे व सर्व संबंधितांना कळविण्यात आलेले आहे.
स्थळ- पुणे.
दिनांक-२९/०१/२०२५
सचिव
राज्य मंडळ, पुणे
परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
Std 10th 12th Exam Copy Mukt Abhiyan
Std 10th 12th Exam Awareness Week Copy Mukt Abhiyan
Std 12th 10th Conducting awareness week Copy Mukt Abhiyan Oath Compaign
Vopy mukt Abhiyan Janjagruti saptah Shapath
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education Pune
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
क्र.रा.मं./परीक्षा-५/२०१ पुणे
दि.-१७/०१/२०२५
प्रती,
विभागीय अध्यक्ष, सर्व विभागीय मंडळे.
विषय-उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करणेबाबत…
उपरोक्त विषयाबाबत आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११/०२/२०२५ ते दि. १८/०३/२०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २१/०२/२०२५ ते दि. १७/०३/२०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर दोन्ही परीक्षांना राज्यातून सुमारे ३१ लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार असून सदर परीक्षेत विविध मार्गानी निष्पन्न होणा-या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो त्यादृष्टीने राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबवित असतात, त्याअनुषंगाने
१) मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत, मा. शिक्षणमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेचे वेळी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक २० जानेवारी ते दिनांक २६ जानेवारी २०२५ या कालावधीत कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे.
याबाबत करावयाच्या कार्यवाहीचा तपशील सोबत पाठविण्यात येत आहे. सदर सप्ताह आयोजित करणेसंदर्भात आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करणेबाबत सूचित करावे.
२) परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
उपरोक्त प्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
अध्यक्ष, राज्यमंडळ, पुणे
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५
!! कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह !!
(कालावधी-सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ ते रविवार २६ जानेवारी २०२५)
दिनांक
करावयाच्या कार्यवाहीचा तपशील
सोमवार दि. २०/०१/२०२५
स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य, शिक्षक यांना संयुक्त सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर अंमलबजावणी करणेबाबत प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी माहिती देणे.
मंगळवार दि. २१/०१/२०२५
कॉपीमुक्त अभियानाची शपथ सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परिपाठाचे वेळी घेणे. (सोबत शपथेचा नमूना जोडला आहे.)
बुधवार दि. २२/०१/२०२५
शाळा स्तरावर मंडळ शिक्षासूचीचे वाचन करणे, मंडळाच्या उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचना, व प्रवेश पत्रावरील (Hall Ticket) सूचनांचे वाचन करणे. गैरमार्ग केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे.
गुरूवार दि. २३/०१/२०२५
परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी याबाबत तज्ज्ञांमार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयमध्ये पालक व विद्यार्थ्यांना उद्बोधन करणे.
शुकवार दि. २४/०१/२०२५
परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची तयारी, परीक्षा तणावमुक्त वातावरणात कशी देता येईल, उत्तरपत्रिका कशा प्रकारे लिहाव्यात याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे. तसेच राज्य मंडळामार्फत तयार केलेली चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविणे
शनिवार दि. २५/०१/२०२५
कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी कॉपीमुक्ती घोषवाक्यासह शाळा परिसरात जनजागृती फेरी काढणे.
रविवार दि. २६/०१/२०२५
ग्रामसभा बैठकीमध्ये मुख्याध्यापक/शिक्षक यांनी कॉपीमुक्त अभियानासंदर्भात वरील विषयांबाबत माहिती देणे व याबाबत जनजागृती करणे व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करणे.
!! शपथ !!
मी शपथ घेतो की, मी फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही.
जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन. तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने, निर्भिडपणे, तणावविरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे, आई वडीलांचे व गुरूजनांचे नाव उज्ज्वल करेन.
जय हिंद जय महाराष्ट्र
कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी आदर्श कार्यपध्दती
परीक्षापूर्व कालावधीत करावयाची कार्यवाही
१ परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होणार नाहीत याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे उद्बोधन, जनजागृती व वातावरणनिर्मिती विविध माध्यमांतून करावी.
२ परीक्षेदरम्यान परीक्षार्थ्याने गैरमार्गाचा अवलंब केल्यास मंडळाकडून होणा-या शास्तीची पूर्वकल्पना सर्व विद्यार्थी व पालक यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत दिली जाईल, याबाबत खातरजमा करण्यात यावी.
३ परीक्षा केंद्रावर परीक्षा निर्धारित कालावधीत सुरू होईल तसेच निर्धारित वेळेत संपेल याबाबत दक्षता घेण्यात यावी.
४ परीक्षा सनियंत्रणासाठी शिक्षण विभागासह महसूल व जिल्हा परिषदेशी संलग्न असलेल्या इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यात यावे.
५ प्रत्येक केंद्रावर उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकारी (तहसिलदार/गट विकास अधिकारी) यांच्या भेटीसंबधी सुव्यवस्थित नियोजन करणे.
६ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आपल्या जिल्हयातील सर्वसाधारण, संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रे निश्चित करून सदर यादी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.
७ प्रत्येक तालुक्यासाठी किमान एका भरारी पथकाची नेमणूक करावी. जर एखाद्या तालुक्यात परीक्षा केंद्रांची संख्या जास्त असेल तर आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक भरारी पथकांची नियुक्ती करावी.
८ भरारी पथकात किमान चार सदस्य असावेत. त्यामध्ये वर्ग १ / २ चे अधिकारी असावेत. शिवाय वर्ग ३ चे कर्मचारी असावेत. प्रत्येक भरारी पथकात किमान एक महिला प्रतिनिधीचा समावेश असावा.
९ परीक्षा केद्रांना भेटी देताना दक्षता पथकातील अधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुख, उपकेंद्र प्रमुख यांच्यासोबत परीक्षा दालनास भेटी देणे.
१० परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चा वापर करण्याबाबत पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविण्यात यावे. परीक्षा केंद्रावर पोलीस अधिनियम ३७ (१) (३) लावूनही बाहय उपद्रव कमी होत नसेल तर अशा केंद्रावर १४४ कलम लागू करावे.
११ सर्व परिरक्षण केंद्रावर हत्यारी पोलीस बंदोबस्त देण्यात यावे.
१२ संवेदनशील व अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावर सर्वसाधारण परीक्षा केंद्रापेक्षा अधिकचा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा.
१३ परिरक्षण केंद्रातून प्रश्नपत्रिकांची पाकिटे मुख्य परीक्षा केंद्रावर पोहोचविण्याची जबाबदारी सहाय्यक परिरक्षकाकडे (रनर) असते. प्रश्नपत्रिका वाहतूक करताना सहाय्यक परिरक्षकासोबत (रनर) सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचारी अथवा होमगार्ड शिपाई देण्यात यावा.
१४ परीक्षेचे संचालन सुरळीत होण्यासाठी तसेच परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचण्यासाठी परिवहन विभागास योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. परीक्षेच्या कालावधीमध्ये अखंडीत विद्युत पुरवठा करण्याकरीता महावितरण विभागास कळविण्यात यावे.
१५ परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
परीक्षा सुरू असताना करावयाची कार्यवाही
१ सदर भरारी पथकांचे परीक्षा केंद्र भेटीचे नियोजन करताना प्रत्येक भरारी पथक दर दिवशी वेगवेगळ्या तालुक्यात भेटी देतील असे नियोजन करावे.
२ परीक्षा केंद्रावर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उपलब्ध असेल तर ती यंत्रणा कार्यरत असून चित्रीकरणाची साठवणूक (Data Storage) होत असल्याबाबतची खातरजमा करण्यात यावी.
३ महत्वाच्या विषयांच्या विशेषतः इ. १० वी साठी इंग्रजी, गणित व विज्ञान, इ. १२ वी साठी इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, चिटणीसाची कार्यपध्दती, पुस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन, अर्थशास्त्र इ. विषयांच्या परीक्षेच्या दिवशी सर्व केंद्रांवर भरारी पथके जातील असे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ शिक्षणेतर विभागातून उपलब्ध करून घ्यावे.
४ संवेदनशील व अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावर आवश्यकता भासल्यास बैठे पथकाची नियुक्ती करावी. बैठे पथक परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर तसेच परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका परिरक्षण केंद्रावर पाठविणेपर्यंत थांबणे आवश्यक आहे.
५ सहाय्यक परिरक्षकाकडून (रनर) केंद्रसंचालकाकडे प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे हस्तांतरीत करताना व सीलबंद प्रश्नपत्रिका पाकिटे परीक्षार्थ्यांचे समक्ष परीक्षा दालनात उघडताना व्हिडीओ चित्रीकरण होत असल्याची खातरजमा करण्यात यावी.
६ परीक्षेशी संबंधित घटकांनी नियमबाहय पध्दतीने मोबाईल अथवा तत्सम इलेक्ट्रॉनिक्स् उपकरणांचा वापर परीक्षा केंद्रावर होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
७ ज्या परीक्षा केंद्रावर दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट होत असतील त्यांना शासन निर्णयानुसार अनुज्ञेय सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबतची खात्री करावी.
८ ज्या विषयाची परीक्षा आहे त्या दिवशी त्या विषयाचे अध्यापन करणा-या शिक्षकांना दालन पर्यवेक्षकाचे काम देवू नये अशी सूचना देण्यात आलेली आहे. याबाबत खातरजमा करण्यात यावी.
९ जिल्हयातील उच्चपदस्थ अधिका-यांनी (जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, प्रांत इ.) परीक्षा केंद्रांना तसेच परिरक्षण केंद्रांना पूर्वसूचना न देता आकस्मिकपणे भेट द्यावी.
१० परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याबाबत कृपया आदेश देण्यात यावेत.
११ परीक्षा संचालनात कोणत्याही स्तरावर गैरप्रकार आढळून आल्यास राज्य मंडळाने विहीत केलेल्या नमुन्यात नमूद करून संबंधित केंद्रसंचालकामार्फत विभागीय मंडळास पुढील कार्यवाहीसाठी अवगत करावे.
१२ विद्यार्थ्यांजवळ कॉपीचे साहित्य सापडल्यास त्याची उत्तरपत्रिका, कॉपीचे साहित्य हस्तगत करणे. कॉपी प्रकरणाबरोबर पाठवावयाच्या परिशिष्ट ब मध्ये कॉपी पकडणारे अधिकारी/सदस्य यांनी त्यांचे नाव, स्वाक्षरी व हुद्दा इत्यादी बाबी सुस्पष्ट अभिप्रायासह नमूद करणे.
१३ गैरमार्ग प्रकरण पकडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पृष्ठावर ‘कॉपिंग केस’ (Copying Case) असे लिहिणे. त्यावर परीक्षार्थीचे निवेदन घेणे व आपली स्वाक्षरी करणे. गैरमार्ग प्रकरण पकडल्यानंतर कॉपी साहित्य, उत्तरपत्रिका व प्रपत्र इत्यादी माहिती अचूकपणे केंद्रभेट अभिप्राय पुस्तिकेत नमूद करणे.
९४ परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराच्या संदर्भात वृत्तपत्र अथवा अन्य माध्यमांना परस्पर कोणतीही माहिती न देणे.
परीक्षेची वेळ संपल्यानंतर करावयाची कार्यवाही
१. सदर भरारी पथकाने परीक्षा संपल्यानंतर तालुक्याचे ठिकाणी असलेल्या परिरक्षण केंद्राचेही निरीक्षण करावे.
२. सर्व परीक्षा केंद्रावरून प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिकांची यादृच्छिकपणे सरमिसळ (Random Mixing) करून पुढील कार्यवाही होत असल्याबाबत खात्री करण्यात यावी.
३. परिरक्षण केंद्रातून (Custody) प्रश्नपत्रिकांची पाकिटे मुख्य परीक्षा केंद्रावर पोहचविण्याची जबाबदारी असलेल्या सहाय्यक परिरक्षकाचे (Runner) लाईव्ह लोकेशन परिरक्षकाकडून तपासले जात असल्याबाबतची खातरजमा करण्यात यावी.
४. परिरक्षण केंद्र (Custody) ते मुख्य परीक्षा केंद्र या दरम्यानच्या प्रवासाचे व्हिडीओ चित्रीकरण करून परिरक्षकाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत परिरक्षण केंद्राची तपासणी करत असताना पडताळणी करण्यात यावी.
५. परीक्षा केंद्रावर अनुपस्थित परीक्षार्थ्याच्या प्रश्नपत्रिका तसेच जादा असलेल्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राकडून परिरक्षकाकडे जमा केल्याबाबतची खातरजमा करण्यात यावी.
६. परीक्षा केंद्राचा दैनंदिन अहवाल (उपस्थिती, अनुपस्थिती, गैरमार्ग प्रकरणे इ.) मंडळाकडे सादर करण्याकरीता परिरक्षक व केंद्रसंचालक यांना सूचित करण्यात आलेले आहे. याबाबतची कार्यवाही होत असल्याची खातरजमा करण्यात यावी.
PDF COPY LINK
सचिव,
राज्यमंडळ, पुणे ०४.