मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण, 2026 – महत्वाच्या सूचना मुदतवाढ बीएलओ आणि बीएलओ सुपरवायझर यांना रुपये ६००० विशेष मानधन ऑनलाइन फॉर्म भरा Special Intensive Revision मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम

Special Intensive Revision

Special Intensive Revision

Special Intensive Revision Information

Map elector with previous SIR

Voters Mapping

Addition of Voters

WhatsApp Channel Follow Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय

क्रमांक: ईएलआर-2026/प्र.क्र.70/26/नि.6

सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई 400 032.

दिनांक: 19 जुलै, 2026

प्रति,

  1. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर.
  2. विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक, सर्व विभाग
  3. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता)
  4. सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (* जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे मार्फत)
  5. सर्व मतदार नोंदणी अधिकारी (* जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे मार्फत)

विषयः- मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण, 2026 – महत्वाच्या सूचना

महोदय/महोदया,

भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 14 में 2026 च्या पत्रानुसार राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (SIR) कार्यक्रम सुरू झालेला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दिनांक 30 जून 2026 पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेत आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार आता घरोघरी जाऊन गणनाप्रपत्र भरून घेण्याचा कार्यक्रम दिनांक 8 ऑगस्ट 2026 पर्यंत चालू राहणार आहे. या अनुषंगाने काही प्रसिद्धी माध्यमांवर/सामाजिक माध्यमावर प्रसारित होत असलेले वृत्ते/मजकूर तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला प्राप्त होऊन असणाऱ्या तक्रारी विचारात घेऊन खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत-

1) आयोगाचे निर्देश विचारात घेता मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याने (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी किमान एक तरी वेळा भेट देणे आवश्यक आहे. जे घर बंद असेल, त्या घरी किमान तीन वेळा भेट देणे अनिवार्य आहे व त्याच्या नोंदी ठेवणे सुद्धा बंधनकारक आहे.

2) असे निदर्शनास येते की शहरी भागामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी एकाच ठिकाणी बसून गणना अर्ज भरून घेत आहेत. मतदार यादी मध्ये अचूक पत्ता नसल्यास घरोघरी जाण्यास अडचण येऊ शकते. अशावेळी सर्वसाधारणतः संबंधित मतदान केंद्रामध्ये किंवा सोसायटी आवारात किंवा सार्वजनिक / शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी संबंधित बीएलओ यांनी बसून मतदारांकडून अचूक पत्ते घेणे अपेक्षित आहे व तदनंतर मतदाराच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घ्यावयाचे आहे. अन्यथा मतदार संबंधित ठिकाणी राहतात याची खात्री करता येणार नाही.

3) असे कॅम्प घेताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयात कॅम्पचे आयोजन करण्यात येऊ नये. निवडणूक आयोग निपक्षपातीपणे कार्यरत असल्याने अशाप्रकारे राजकीय पक्षाच्या कार्यालयात कॅम्प आयोजित केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. मतदारांचा पत्ता शोधणे व इतर माहितीसाठी राजकीय पक्षांनी अधिकृतरित्या नेमलेल्या बीएलए ची मदत घेता येईल.
3) राजकीय पक्षांनी विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत जनजागृती करणे अपेक्षित आहे. मात्र आपल्या कार्यालयामध्ये अशाप्रकारे बीएलओ या कॅम्प आयोजित केल्याचे होडिंग किंवा बॅनर लावणे चुकीचे आहे व तशी कल्पना त्यांना देऊन असे बॅनर किया होर्डिंग काढून टाकण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

4) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) अधिकारी यांच्यावर घरोघरी जाऊन गणनाप्रपत्र वाटप करणे व ते भरून घेणे तसेच त्यांचे डिजिटायझेशन करणे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे. मर्यादित कालावधीत ही जबाबदारी पूर्ण करताना BLO यांच्यावर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांनी त्यांना पुरेशा सहाय्यकांची मदत उपलब्ध करून द्यावयाची आहे. BLO सुपरवायझर तसेच मदतीसाठी नेमलेले सहाय्यक यांच्यामध्ये कामाचे योग्य वाटप करून देण्याची जबाबदारी संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांची राहील,

5) महसूल विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील तसेच स्थानिक प्राधिकारी संस्थांचे अधिकारी / कर्मचारी यांनी आता या टप्यावर पूर्ण सहभाग देऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांचे काम करण्यासाठी सहकार्य करावयाचे आहे. या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या तयारीतील स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी सुद्धा वापरण्यात येतात या गोष्टीची जाणीव सर्व स्थानिक प्राधिकारी संस्थांना करून देण्याची आवश्यकता आहे.

6) यापूर्वीच दिलेल्या निर्देशाप्रमाणे मतदार नोंदणी अधिकारी/सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी चांगल्या पद्धतीचे इंटरनेट कनेक्शन डिजिटायझेशन कामाकरता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. डिजिटायझेशन साठी अतिरिक्त मदतीसाठी स्वयंसेवकांची मदत घेता येईल. राजकीय पक्षाशी संबधित कोणत्याही व्यक्तीची मदत किंवा हस्तक्षेप या कामात होणार नाही याची दखल घेण्यात यावी.

7) प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा विभागाच्या शिक्षण संचालकांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकाकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. त्यानुसार BLO म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे शैक्षणिक तास कमी करण्यात यावे तसेच इतर शिक्षकांनी BLO म्हणून नियुक्त शिक्षकांना मदत करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या क्षेत्रीय शिक्षण अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन वरील निर्देशाचे काटेकोरपणे अनुपालन होत आहे याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

8) BLO ना काम करण्यास अडवळा येऊ नये म्हणून काही क्षेत्रांमध्ये शाळांच्या वेळा सुधारित केलेल्या आहेत, त्याप्रमाणे ही नियोजन करता येईल.

9) या कार्यालयाने एनआयसो महाराष्ट्र यांच्या मदतीने फोटो सिमिलर एन्ट्रीजच्या (PSE) आधारे दुबार नावांच्या याद्या तसेच मतदार यादीतील अस्पष्ट व अप्रमाणित (Blur & Non-standard) फोटो असलेल्या मतदारांच्या याद्या उपलब्ध करून दिले आहेत. विशेष सखोल पुनरिक्षण अंतर्गत तयार होणारी मतदार यादी दोष विरहित व अचूक असणे आवश्यक असल्याने या कार्यालयाने दिलेल्या सूचनानुसार या प्रकरणी गांभीर्यपूर्वक कार्यवाही करण्यात यावी. रानकीप पक्षांकडून वारंवार दुबार मतदारांबाबत आरोप करण्यात येतात. अशी कार्यवाही केल्याने दुबार मतदारांची नावे वगळण्यात येण्याबरोबर दुपार मतदारांचे गणना प्रपत्र भरण्याच्या अतिरिक्त कामाचा बोजा सुद्धा आपोआप कमी होईल. अशा मतदाराच्या दुबार असलेल्या गणनाप्रपत्रावर केवळ Already Enrolled at AC/Part/SI No.’ असे नमूद करता येईल. मात्र

दुबार मतदारांबाबत अशी कार्यवाही करताना संबंधित मतदार दुबार आहे व त्याच्या मूळ ठिकाणचा गणना प्रपत्र भरण्यात आलेला आहे, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांनी जिल्हा मतदार संघ तसेच मतदार यादी भाग निहाय याबाबतच्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेण्यात यावा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक बैठकीत यापूढे याबाबतही आढावा घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. संबंधित निवडणूक नायब तहसीलदार यांनी या कामकाजाचे योग्य रीतीने समन्वय करावे.

10) चालू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा आढावा घेण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते या कामासाठी कार्यरत / अधिसूचित असलेल्या कोणत्याही अधिका-याची बैठक आयोजित करू शकत नाहीत तसेच BLO यांना निर्देश देऊ शकत नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

11) गृहभेटीच्या टण्याचे आता काहीच दिवस शिल्लक असल्याने मतदार नोंदणी अधिकारी यांनी कमी काम झालेल्या BLO व BLO सुपरवायझर यांचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे.

12) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना योग्य रीतीने प्रशिक्षण न दिल्यामुळे चुकीच्या पद्धतीने कार्यवाही केल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सबच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, विशेषता मानधनावर नियुक्त (कंत्राटी) प्रवर्गातील असे अधिकारी यांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ही जवावदारी मतदार नोंदणी अधिकारी तसेच सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांची आहे.

13) राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीना सुद्धा योग्य प्रकारे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे ज्यायोगे ते केवळ पा कार्यक्रमाचे निरीक्षण न करता मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मदत करू शकतील. जे मतदार सापडत नसतील ते अशा मतदारांची यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना देण्या अपेक्षित आहे, ज्यायोगे त्यांची या कामी मदत होऊ शकेल.

14) वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमर्मा द्वारे तसेच सामाजिक माध्यमाद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या वृत्त किंवा संदेशाची दखल घेऊन चुकीच्या बातम्यांचे किंवा संदेशांचे त्वरित खंडन करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित वृत्त/संदेशाच्या अनुषंगाने प्रसिद्ध पत्रक किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन योग्य माहिती देण्यात यावी तसेच अधिकृत समाज माध्यमाच्या द्वारे सुद्धा याबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.

आपला,

(मनोहर पारकर)

उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी,
महाराष्ट्र राज्य

प्रत:-
सर्व उप जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी,

भारत निर्वाचन आयोग ELECTION COMMISSION OF INDIA
निर्वाचन सदन Nirvachan Sadan, अशोक रोड, नई दिल्ली-110001 Ashoka Road, New Delhi-110001

No.23/2026-ERS (Vol.-II)

Dated: 15th July, 2026.

To,
The Chief Electoral Officer,
NCT of Delhi,
New Delhi

Subject: Special Intensive Revision (SIR) of Electoral Roll w.r.t. 01.07.2026 as the qualifying date-Revised Schedule-regarding.

Sir,

I am directed to refer to the Commission’s order No. 23/2025-ERS (Vol.II) dated 14.05.2026, related to schedule of the Special Intensive Revision and your request vide letter no. F.2 (561)/CEO/ER/2025/PF1/1290 dated 14.07.2026, and to state that the Commission has decided to revise the said schedule for NCT of Delhi as below-

Sl. No.

Revision Activities

Revised Schedule

  1. House to house visits by BLOS

30.06.2026 to 08.08.2026

  1. Rationalization/Re-arrangement of Polling Stations

08.08.2026

  1. Draft Publication

17.08.2026 (Monday)

  1. Period for filling claim & objections

17.08.2026 to 16.09.2026

  1. Notice Phase/Disposal of claims & objections

17.08.2026 to 15.10.2026

  1. Final publication

19.10.2026 (Monday)

  1. All the officials/officers concerned shall be informed of the Commission’s above decision and wide publicity of the modified schedule shall be made through all available media. Political Parties shall also be informed of the modified schedule in writing.

Yours faithfully,

Circular pdf copy Link

(SANDEEP KUMAR) UNDER SECRETARY

Copy to: Chief Secretary, NCT of Delhi

Special Intensive Revision (SIR) of Electoral Roll w.r.t. 01.07.2026 as the qualifying date-Revised Schedule-regarding.
Special Intensive Revision (SIR) of Electoral Roll w.r.t. 01.07.2026 as the qualifying date-Revised Schedule-regarding.

________ ALSO READ _______

By e-mailSpeed Post

ELECTION COMMISSION OF INDIA

NIRVACHAN SADAN, ASHOKA ROAD, NEW DELHI-110001

No. 23/BLO/2026-ERS

Date: 14th July 2026

To
The Chief Electoral Officer,

Andhra Pradesh, Arunachal Pradesh, Chandigarh, Dadra and Nagar Haveli and Daman and Dia, Haryana, Jharkhand, Karnataka, Maharashtra, Manipur, Meghalaya, Minoram, Nagaland, NCT of Delhi, Odisha, Punjab, Sikkim, Telangana, Tripura and Uttarakhand

Sub-Special Intensive Revision (SIR) of electoral rell-grant of honorarium to BLOs & Supervisor-regarding.

Madam/Sir,

I am directed to convey that considering the volume and nature of the work involved in Special Intensive Revision (SIR) exercise, the Commission has approved the grant of a onetime honorarium of 26,000/- to each BLO and BI.O Supervisor engaged in the exercise, in addition to their annual remuneration.

2 The instruction shall be brought to the notice of all concerned for compliance.

Years faithfully.

(PAWAN DIWAN]
SECRETARY

Sub-Special Intensive Revision (SIR) of electoral rell-grant of honorarium to BLOs & Supervisor-regarding.
Sub-Special Intensive Revision (SIR) of electoral rell-grant of honorarium to BLOs & Supervisor-regarding.

________ ALSO READ ________

🗳️ SIR 2026 – घरबसल्या ऑनलाइन फॉर्म भरा

भारत निवडणूक आयोग (ECI) च्या Special Intensive Revision (SIR) 2026 अंतर्गत तुम्ही तुमचा फॉर्म घरबसल्या ऑनलाइन भरू शकता.

⚠️ महत्त्वाची सूचना:
जर तुम्ही BLO कडे आधीच ऑफलाइन फॉर्म जमा केला असेल, तर पुन्हा ऑनलाइन फॉर्म भरण्याची गरज नाही.

📌 ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया:

https://voters.eci.gov.in

1️⃣ लॉग इन करा

  • Google मध्ये “Voters ECI” सर्च करा.
  • Voter Service Portal उघडा.
  • नवीन असल्यास Sign Up करा.
  • अकाउंट असल्यास मोबाईल नंबर व OTP ने Log In करा.

2️⃣ 2002/03 मतदार यादी तपासा

  • Services → Special Intensive Revision (SIR) 2026
  • Search your name in Last SIR निवडा.
  • राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गाव निवडा.
  • 2002/03 ची मतदार यादी उघडा व आवश्यक माहिती नोंदवा.

3️⃣ Enumeration Form भरा

  • Fill Enumeration Form वर क्लिक करा.
  • राज्य निवडा.
  • सध्याचा Voter ID क्रमांक टाकून Search करा.
  • मोबाईल OTP पडताळणी पूर्ण करा.

⚠️ टीप:
Voter ID व Aadhaar वरील नाव एकसारखे असणे आवश्यक आहे. नाव जुळत नसेल तर BLO शी संपर्क साधा.

4️⃣ योग्य कॅटेगरी निवडा
✅ 2002/03 मध्ये स्वतःचे नाव
✅ आई-वडिलांचे / आजी-आजोबांचे नाव
✅ कोणाचेही नाव नसल्यास

  • संबंधित Polling Station निवडा.
  • 2002/03 मतदार यादीतील Serial Number टाका.
  • नाते (Relationship) निवडून माहिती Verify करा.

5️⃣ वैयक्तिक माहिती भरा

  • जन्मतारीख (DOB)
  • Aadhaar क्रमांक
  • आई-वडिलांचे नाव
  • (लागू असल्यास) पती/पत्नीचे नाव
  • Place of Submission
  • पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करा.

6️⃣ Review आणि e-Sign

  • सर्व माहिती तपासा.
  • Declaration वर ✔️ करा.
  • Submit करा.
  • Aadhaar OTP द्वारे e-Sign पूर्ण करा.

7️⃣ Acknowledgement Slip
✅ फॉर्म सबमिट झाल्यानंतर Acknowledgement Slip डाउनलोड किंवा स्क्रीनशॉट करून जतन करा.

📢 अधिकृत माहिती काळजीपूर्वक भरावी. शंका असल्यास आपल्या BLO शी संपर्क साधावा.

_____ ALSO READ ______

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय

क्रमांक :-

ईएलआर-२०२६/प्र.क्र.७०/२६/३३

सामान्य प्रशासन विभाग,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १७ जून, २०२६

अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व प्रशासकीय विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

     विषय : मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अधिका-यांच्या बदल्याबाबत.

संदर्भ:- १) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. २३/२०२५-ERS (Vol-३), दिनांक १४ मे, २०२६

२) या कार्यालयाचे समक्रमांकाचे दिनांक १५ मे, २०२६ रोजीचे पत्र.

महोदय,

प्रति,

भारत निवडणूक आयोगाने दिनांक १४ मे, २०२६ रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह १६ राज्य व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये घोषित केला आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरु झाली आहे.

२. भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक १४ मे, २०२६ च्या पत्रातील परिच्छेद ४ कडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. सदर परिच्छेद-४ मध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी / मतदार नोंदणी अधिकारी (ERO)/सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) म्हणून अधिसूचित केलेले कोणतेही पद रिक्त राहणार नाही आणि विशेष सखोल पुनरिक्षण कामाशी संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याची भारत निवडणूक आयोगाच्या पुर्व परवानगीशिवाय बदली केली जाणार नाही याबाबतची खातरजमा मुख्य सचिव यांनी करावी असे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने या कार्यालयाच्या दि. १५ मे, २०२६ च्या पत्रान्वये सर्व प्रशासकीय विभागाना कळविण्यात आले आहे.

3. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला महाराष्ट्रामध्ये दिनांक २०/०६/२०२६पासून प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबतची तयारी जिल्हा निवडणूक अधिकारी नियंत्रणाखाली संबधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) व सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्याकडून करण्यात येत आहे.

४. राज्यामध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून अधिसुचित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अतिरीक्त आयुक्त (शहर) / पश्चिम उपनगरे/पूर्व उपनगरे / प्रकल्प तसेच जिल्हाधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर यांना अतिरीक्त जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना मतदार यादी निरीक्षक म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही सर्व पदे भाप्रसे संवर्ग पदे (Cadre Post) असल्याने आयोगाच्या सूचना विचारात घेता विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम संपेपर्यंत या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येऊ नयेत, अशी विनंती सामान्य प्रशासन विभागास करण्यात येत आहे. अपवादात्मक परिस्थितीत एखादी बदली करणे अपरिहार्य असल्यास त्यासाठीचे योग्य ते कारण नमूद करुन प्रथमतः त्यास भारत निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात यावी.

५. त्याव्यतिरिक्त भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक १९.०५.२०२६ रोजीच्या पत्रान्वये काही महानगर पालिकांचे आयुक्त किंवा अतिरीक्त आयुक्त यांना त्यांच्या महानगरपालिका क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघाकरिता विशेष सखोल पुनरिक्षण कालावधीसाठी अतिरीक्त जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले पत्र

आहे. त्याबाबतचे या कार्यालयाचे

दिनांक १९.०५.२०२६
रोजीचे

https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/notificationER.aspx

येथे उपलब्ध आहे. सदर अधिकाऱ्यांच्या बदल्या सुध्दा विशेष सखोल पुनरिक्षण कालावधीत करण्यात येणार नाहीत याची दक्षता नगर विकास विभागाने घ्यावी.

६. त्याव्यतिरिक्त उपजिल्हाधिकारी संवर्गातील तसेच अन्य प्रशासकीय विभागातील समकक्ष अधिकाऱ्यांना मतदान नोंदणी अधिकारी (ERO) व तहसिलदार संवर्गातील तसेच अन्य प्रशासकीय विभागातील समकक्ष अधिकाऱ्यांना सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबतच्या अधिसुचना

https://cecelection.maharashtra.gov.in/ceo/notificationER.aspx

येथे उपलब्ध आहेत. सदर कार्यक्रमाची व्याप्ती तसेच भारत निवडणूक आयोगाच्या उपरोक्त सुचना विचारात घेता, विशेष सखोल पुनरिक्षणाशी संबधित पदावर सध्या कार्यरत असलेल्या उपरोक्त अधिका-यांच्या बदल्या हा कार्यक्रम पुर्ण होईपर्यत करण्यात येणार नाहीत तसेच वरीलपैकी पदे रिक्त असल्यास सदर पदे तात्काळ भरण्यात येतील, याची दक्षता सर्व प्रशासकीय विभागांनी घ्यावी.

६. त्याचप्रमाणे राज्यातील वर्ग-३ व त्यावरील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक / अधिकारी (BLO Supervisor/ Officer) म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडे संबंधित मतदान केंद्रातील सर्व मतदारांना गणना प्रपत्र वाटणे तसेच भरलेले प्रपत्र जमा करुन घेणे तसेच ते डिजीटाईज करणे इत्यादी कामे सोपविण्यात आलेली आहेत. ते सध्या मॅपिंग व इतर कामामध्ये व्यस्त आहेत व प्रत्यक्ष सखोल पुनरिक्षणाच्या कामामध्ये त्यांच्यावर अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. विशेषतः राज्यातील शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी कर्मचाऱ्यांना वरीलप्रमाणे नियुक्ती देण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे लॉगीन क्रेडेन्शियल तयार करण्यात आलेले असुन त्यांचे नाव व दुरध्वनी क्रमांक नमुद होऊन गणना प्रपत्र दिनांक २०.०६.२०२६ रोजी आयोगाकडुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सबब, BLO/BLO Supervisor म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या त्याच्या पदावरुन अन्यत्र बदली करण्यात येऊ नये याची दक्षता संबंधित सर्व प्रशासकीय विभागांनी घ्यावी. तसेच अशा प्रकारे बदल्या केल्या असल्यास सदर बदल्यांच्या अंमलबजावणीस विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम संपेपर्यंत स्थगिती देण्यात यावी. याबाबत सविस्तर सुचना सर्व प्रशासकीय विभागांनी आपल्या अधिनस्त कार्यालयांना देण्यात याव्यात, अशी विनंती आहे.

प्रत:-

आपला (मनोहर पारकर) सह मुख्य निवडणूक अधिकारी,

१) सहसचिव, मा. मुख्य सचिव यांचे कार्यालय

२) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर

महाराष्ट्र राज्य.

३) सर्व विभागीय आयुक्त

४) सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता)

५) सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी

परिपत्रक पीडीएफ लिंक

_____ ALSO READ _______


विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२४

मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कडील पत्र. ईएलआर२०२५/प्र.क्र.१२३/२५/नि.६ सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२,

दिनांकः-२४/१२/२०२५

विशेष सखोल पुननिरीक्षण (Special Intensive Revision) नुसार सन २००२ मधील मतदार याद्या सन २०२४ मधील मतदार याद्या यांची तुलना करून सन २०२४ मधील प्रत्येक मतदाराचा संबंध (Mapping) सन २००२ मधील मतदारांशी जोडणे अभिप्रेत आहे. यात खालील ३ प्रकारे मतदारांची जोडणी (Mapping) करण्यात येत आहे.

१. Map elector with previous SIR

वरील विषयात सन २००२ मध्ये झालेल्या SIR (मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण) (Special in-depth review of voter list) या यादीतील मतदारांचे सन २०२४ (२९/१०/२०२४) च्या मतदार यादीत आढळून आलेले मतदार यांची सन २००२ च्या मतदारांशी पडताळणी करणे व त्यावर BLO App मध्ये उपलब्ध असलेल्या टॅब मध्ये त्या मतदारांची माहिती साठवण्यात यावी.

       अ. २००२ ते २०२४ mapping मतदार (स्वतः मतदार)

४० ते १०० वय वर्ष असलेले मतदार.

ब. २०२४ ते २००२ प्रोजणी mapping मतदार. १८ ते ३९ वय वर्ष असलेले मतदार

(मुलगा, मुलगी, नात, नातु) हे मतदार वरील मतदारांशी (आई-

वडील, आजोबा-आजी) प्रोजणी (Progeny) जोडणे (रक्ताची नाते).

तसेच वरील विषयाच्या अनुशंगाने ज्या मतदारांचे नाव सन २००२ च्या मतदार यादीत आहे व २०२४ च्या मतदार यादीत सुद्धा आहे अशा मतदारांसाठी Mapping करणे बाबत वरील टेंटॅब मध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी काम करावयाचे आहे.

तसेच अ मुद्यात्तील मतदार हे व मुद्यात्तील घरातील मतदार असल्याने ते वरील १ नंबर टॅब मधील मतदार त्यांनाच Add Progeny म्हणून जोडणी करायची आहे.

SIR 2026 – Search your name in last SIR E-Roll

SIR २०२६ – शेवटच्या SIR ई-रोलमध्ये तुमचे नाव शोधा.

Special Intensive Revision
Special Intensive Revision

२. Mark elctor(for Self) as Progeny

अ: वरील विषयात सन २०२४ च्या मतदार यादीत असलेले मतदार पण ते २००२ च्या मतदार यादीत नाही. अशा मतदारांचे Self Progeny म्हणून Mapping करणे.

ब :- तसेच गावातील सुना किंवा पत्नी व बाहेर गावाहून स्थलांतरित होऊन आलेले मतदार १८ ते १०० वय वर्षे यांचे आपल्या मतदारसंघात सन २००२ च्या मतदार यादीत नाव नसल्यास अशा मतदारांचे Mapping त्यांचे नाव ज्या

मतदारसंघात सन २००२ च्या मतदार यादीत असेल त्या विधानसभा मतदारसंघाचे नाव…….. यादी भाग क्र…… व अनु क्र…… घेऊन त्यांचे Self Progeny म्हणून Mapping करावे. व तसेच त्यांचे नाव सन २००२ च्या मतदार यादीत नसल्यास त्यांचे आई वडील व आजोबा आजी यांच्या नावाशी Self Progeny म्हणून त्यांची Mapping करण्यात यावी.

३. ज्या मतदारांचे नाव सन २००२ च्या यादीत नाही तसेच त्यांचे आई वडील आजोबा आजी यांचेही नाव सन २००२ च्या मतदार यादीत नसेल परंतु सदर मतदार हा त्याच भागातील आहे अशा मतदारांच्या पडताळणीसाठी मा. भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले खालील १३ पुरावे आवशयक राहतील.

         आवशयक पुरावे खालील प्रमाणे

१. कोणत्याही केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने नियमित कर्मचारी/पेन्शनधारकाला दिलेला ओळखपत्र/पेन्शन पेमेंट ऑर्डर

२. भारतातील कोणत्याही सरकारी/स्थानिक संस्था/बैंक/पोस्ट ऑफिस/एलआयसी/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने 01.07.1997 पूर्वी जारी केलेले कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र/कागदपत्र.

३. सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जन्म प्रमाणपत्र

४. पासपोर्ट

५. मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठाने दिलेले मॅट्रिक्यूलेशनचे (बोर्डप्रमाणपत्र) शैक्षणिक प्रमाणपत्र

६. सक्षम राज्य प्राधिकरणाने जारी केलेले कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र

७. वन हक्क प्रमाणपत्र

८. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले ओबीसी/एससी/एसटी किंवा इतर जात प्रमाणपत्र.

९. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (जिथे उपलब्ध असेल)

१०. राज्य/स्थानिक संस्थेने तयार केलेले कुटुंब नोंदणीपत्र

११. सरकारने दिलेले जमीन घर वाटप प्रमाणपत्र

१२. आधारसाठी, आयोगाच्या पत्र क्रमांक 23/2025-ERS/खंड 11 दिनांक 09.09.2025 (परिशिष्ट 11) द्वारे जारी केलेले. सूचना लागू होतील.

१३. 01.07.2025 च्या संदर्भात बिहारच्या विशेष सखोल पुननिरीक्षण (SIR) मतदार यादीचा उतारा.

संदिग्ध/विनाधार/संदर्भ न लागणाऱ्या मतदारांच्या बाबतीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी/सहा. मतदार नोंदणी अधिकारी अशा मतदारांची आवश्यक पुराव्यासह समक्ष सुनावणी घेऊन त्यांच्या वैधते बाबत निर्णय घेतील.

विशेष सखोल पुनरिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राजकीय पक्षांची सहकार्य असणे महत्वाचे असल्याने, सर्व राजकीय पक्षानी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केंद्र स्तरिय प्रतिनिधी (Booth Level Agent) नेमणे आवश्यक आहे. त्याकरिता स्थानिक पातळीवर (जिल्हा स्तरावर) राजकीय पक्षांशी संपर्क करुन BLA नियुक्तीकरिता प्रोत्साहित करावे.

Special Intensive Revision
Special Intensive Revision मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम

Leave a Comment

error: Content is protected !!