Special Intensive Revision

Special Intensive Revision

Special Intensive Revision Information

Map elector with previous SIR

Voters Mapping

Addition of Voters

विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२४

मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कडील पत्र. ईएलआर२०२५/प्र.क्र.१२३/२५/नि.६ सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२,

दिनांकः-२४/१२/२०२५

विशेष सखोल पुननिरीक्षण (Special Intensive Revision) नुसार सन २००२ मधील मतदार याद्या सन २०२४ मधील मतदार याद्या यांची तुलना करून सन २०२४ मधील प्रत्येक मतदाराचा संबंध (Mapping) सन २००२ मधील मतदारांशी जोडणे अभिप्रेत आहे. यात खालील ३ प्रकारे मतदारांची जोडणी (Mapping) करण्यात येत आहे.

१. Map elector with previous SIR

वरील विषयात सन २००२ मध्ये झालेल्या SIR (मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण) (Special in-depth review of voter list) या यादीतील मतदारांचे सन २०२४ (२९/१०/२०२४) च्या मतदार यादीत आढळून आलेले मतदार यांची सन २००२ च्या मतदारांशी पडताळणी करणे व त्यावर BLO App मध्ये उपलब्ध असलेल्या टॅब मध्ये त्या मतदारांची माहिती साठवण्यात यावी.

       अ. २००२ ते २०२४ mapping मतदार (स्वतः मतदार)

४० ते १०० वय वर्ष असलेले मतदार.

ब. २०२४ ते २००२ प्रोजणी mapping मतदार. १८ ते ३९ वय वर्ष असलेले मतदार

(मुलगा, मुलगी, नात, नातु) हे मतदार वरील मतदारांशी (आई-

वडील, आजोबा-आजी) प्रोजणी (Progeny) जोडणे (रक्ताची नाते).

तसेच वरील विषयाच्या अनुशंगाने ज्या मतदारांचे नाव सन २००२ च्या मतदार यादीत आहे व २०२४ च्या मतदार यादीत सुद्धा आहे अशा मतदारांसाठी Mapping करणे बाबत वरील टेंटॅब मध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी काम करावयाचे आहे.

तसेच अ मुद्यात्तील मतदार हे व मुद्यात्तील घरातील मतदार असल्याने ते वरील १ नंबर टॅब मधील मतदार त्यांनाच Add Progeny म्हणून जोडणी करायची आहे.

२. Mark elctor(for Self) as Progeny

अ: वरील विषयात सन २०२४ च्या मतदार यादीत असलेले मतदार पण ते २००२ च्या मतदार यादीत नाही. अशा मतदारांचे Self Progeny म्हणून Mapping करणे.

ब :- तसेच गावातील सुना किंवा पत्नी व बाहेर गावाहून स्थलांतरित होऊन आलेले मतदार १८ ते १०० वय वर्षे यांचे आपल्या मतदारसंघात सन २००२ च्या मतदार यादीत नाव नसल्यास अशा मतदारांचे Mapping त्यांचे नाव ज्या

मतदारसंघात सन २००२ च्या मतदार यादीत असेल त्या विधानसभा मतदारसंघाचे नाव…….. यादी भाग क्र…… व अनु क्र…… घेऊन त्यांचे Self Progeny म्हणून Mapping करावे. व तसेच त्यांचे नाव सन २००२ च्या मतदार यादीत नसल्यास त्यांचे आई वडील व आजोबा आजी यांच्या नावाशी Self Progeny म्हणून त्यांची Mapping करण्यात यावी.

३. ज्या मतदारांचे नाव सन २००२ च्या यादीत नाही तसेच त्यांचे आई वडील आजोबा आजी यांचेही नाव सन २००२ च्या मतदार यादीत नसेल परंतु सदर मतदार हा त्याच भागातील आहे अशा मतदारांच्या पडताळणीसाठी मा. भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले खालील १३ पुरावे आवशयक राहतील.

         आवशयक पुरावे खालील प्रमाणे

१. कोणत्याही केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने नियमित कर्मचारी/पेन्शनधारकाला दिलेला ओळखपत्र/पेन्शन पेमेंट ऑर्डर

२. भारतातील कोणत्याही सरकारी/स्थानिक संस्था/बैंक/पोस्ट ऑफिस/एलआयसी/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने 01.07.1997 पूर्वी जारी केलेले कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र/कागदपत्र.

३. सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जन्म प्रमाणपत्र

४. पासपोर्ट

५. मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठाने दिलेले मॅट्रिक्यूलेशनचे (बोर्डप्रमाणपत्र) शैक्षणिक प्रमाणपत्र

६. सक्षम राज्य प्राधिकरणाने जारी केलेले कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र

७. वन हक्क प्रमाणपत्र

८. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले ओबीसी/एससी/एसटी किंवा इतर जात प्रमाणपत्र.

९. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (जिथे उपलब्ध असेल)

१०. राज्य/स्थानिक संस्थेने तयार केलेले कुटुंब नोंदणीपत्र

११. सरकारने दिलेले जमीन घर वाटप प्रमाणपत्र

१२. आधारसाठी, आयोगाच्या पत्र क्रमांक 23/2025-ERS/खंड 11 दिनांक 09.09.2025 (परिशिष्ट 11) द्वारे जारी केलेले. सूचना लागू होतील.

१३. 01.07.2025 च्या संदर्भात बिहारच्या विशेष सखोल पुननिरीक्षण (SIR) मतदार यादीचा उतारा.

संदिग्ध/विनाधार/संदर्भ न लागणाऱ्या मतदारांच्या बाबतीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी/सहा. मतदार नोंदणी अधिकारी अशा मतदारांची आवश्यक पुराव्यासह समक्ष सुनावणी घेऊन त्यांच्या वैधते बाबत निर्णय घेतील.

विशेष सखोल पुनरिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राजकीय पक्षांची सहकार्य असणे महत्वाचे असल्याने, सर्व राजकीय पक्षानी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केंद्र स्तरिय प्रतिनिधी (Booth Level Agent) नेमणे आवश्यक आहे. त्याकरिता स्थानिक पातळीवर (जिल्हा स्तरावर) राजकीय पक्षांशी संपर्क करुन BLA नियुक्तीकरिता प्रोत्साहित करावे.

Leave a Comment

error: Content is protected !!