राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील शासकीय व अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून राष्ट्रीय शालेय नेतृत्व परिषदेसाठी प्रस्ताव मागविणेबाबत Shaley Netrutva Vikas Karyakram

Shaley Netrutva Vikas Karyakram

Shaley Netrutva Vikas Karyakram

shaley netrutva vikas karyakramantargat modul vikasit karanebabat.
Regarding developing modules under the School Leadership Development Program

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

जा.क्र./मिपा/SLA/2026-27/856
दि.23/10/2026

विषय : राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील शासकीय व अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून राष्ट्रीय शालेय नेतृत्व परिषदेसाठी प्रस्ताव मागविणेबाबत.

संदर्भ : निपा, नवी दिल्ली यांचे पत्र NIEPA-NCSL/October/21/2026-2027 दि. 12/10/2026

उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार कळविण्यात येते की, राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) हे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था निपा येथे स्थापन करण्यात आले आहे. शालेय नेतृत्वासंदर्भातील साहित्य विकसन आणि क्षमता विकास कार्यक्रम राबविणे ही या केंद्राची प्रमुख जबाबदारी आहे.

शालेय शिक्षणात काम करणाऱ्या शालेय नेतृत्वाची दखल घेण्यासाठी NCSL निपा मार्फत शालेय नेतृत्वाचा उत्सव Celebrating School Leadership CSL हा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा आणि अनुदानित शाळा यांच्या मुख्याध्यापकांकडून त्यांच्या कार्यातून शाळांची प्रगती, यशोगाथा सादरीकरण मागविण्यात येत आहे. यात पूर्वप्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आपली सादरीकरणे पाठवू शकतात.

सादरीकरणाचे स्वरूप –
मुख्याध्यापक शाळेची यशोगाथा माहिती व छायाचित्रे / व्हिडिओ स्वरुपात पाठवू शकतात.
सदर माहितीची भाषा इंग्रजी/हिंदी/भारतीय भाषा निवडता येईल.
यशोगाथा पाठविण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ असून nesl.csl@niepa.ac.in या मेलवर पाठवावेत.

. अधिक माहितीसाठी सोबत जोडलेल्या निपा, नवी दिल्ली पत्राचे अवलोकन करावे.
(प्रकाश मुकुद)
संचालक महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर

NIEPA-NCSL/October/21/2026-2027

Subject: Entries for National Conference on School Leadership by Heads of Schools /School Principals of Government and Government Aided Schools of State/UT -reg

Dear Sir/Madam,
Greetings from NIEPA !
The National Centre for School Leadership (NCSL) is established at the National Institute of Educational Planning and Administration (NIEPA), New Delhi. The Centre is vested with the responsibility of developing practitioner-centric curriculum framework and materials on school leadership and transaction of long-term capacity development programmes of school leaders and educational administrators. The National Centre for School Leadership at NIEPA is funded by the Department of School Education & Literacy, Ministry of Education, Government of India.

I am happy to share with you that the National Centre for School Leadership began ‘Celebrating School Leadership'(CSL) as an initiative to recognise School Leadership at all levels of school education, across States/UTs. In continuation of this annual initiative, the Centre is inviting submissions from head teachers/heads of schools/principals (from foundational to secondary schools) of schools belonging to the State/UT Government and Government Aided sector. A poster on National Conference on School Leadership F.Y. 2026-2027 is being shared with you for wide dissemination and circulation by your office to reach the head teacher/head of school/principal of government and government aided schools of respective State/UT (Annexurel).

The School heads/principals can either submit a case study (with photographs) or a documentary in the form of Video, not both. The case studies OR video documentaries can be developed in English/Hindi/Indian Languages. The School heads/principals can send their case studies /video documentaries at the email ncsl.csl@niepa.ac.in latest by 31 October, 2026. For any queries you may kindly contact NCSL Faculty Dr Kajal, Assistant Professor, NCSL-NIEPA at kajalverma@niepa.ac.in, Mob No. 7042587940, Dr. Shivansh Tripathy, Assistant Professor, NCSL-NIEPA at shivanshtripathy@niepa.ac.in, Mob No. 9971914312, Shri Rahul, Assistant Professor, NCSL-NIEPA at rahulkundu@niepa.ac.in, Mob No. 9996891264. Looking forward to your support in this endeavor.

With kind regards,
Your sincerely,
Shashikala Wanjari

जा.क्र/मिपा/SLA/२०२६-२७/४०९
दिनांक -1०/०९/२०२६
प्रति,

  1. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई
  2. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
  3. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व
  4. शिक्षणाधिकारी, बृहमुंबई, महानगरपालिका
  5. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम/दक्षिण/उत्तर)
  6. प्रशासन अधिकारी (मनपा/नपा/नप), सर्व.

विषय – शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मोड्यूल विकसित करणेबाबत.

संदर्भ – NCSL, निपा, नवी दिल्ली यांचे पत्र दि.04 ऑगस्ट 2026.

उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत NCSL, निपा, नवी दिल्ली यांच्या सूचनांनुसार मिपा-SLA संस्थेमार्फत सन 2019-20 ते 2025-26 या कालावधीत शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कामकाज करणाऱ्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांच्या मार्फत एकूण 69 शैक्षणिक मॉड्यूल्स विकसित केलेले आहेत. सदर मोड्यूल्स NCSL, निपा, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टल

https://ncsl.niepa.ac.in

मधील School Leadership Academy महाराष्ट्राच्या खालील वेबपेज वर प्रकाशित करण्यात आले आहे.

https://ncsl.niepa.ac.in/schoolleadershipacademy/maharashtra/maharashtra repository module.php

सदर मोड्यूल्स निपा, नवी दिल्लीच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मुख्याध्यापकांसाठीच्या PSLM या कोर्ससाठी संदर्भ साहित्य तसेच नेतृत्व विकसन संदर्भ साहित्य म्हणून या मोड्यूल्सचा वापर केला जातो.
सदर मोड्यूल्स निपा, नवी दिल्लीच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मुख्याध्यापकांसाठीच्या PSLM या कोर्ससाठी संदर्भ साहित्य तसेच नेतृत्व विकसन संदर्भ साहित्य म्हणून या मोड्यूल्सचा वापर केला जातो.
संदर्भिय पत्रानुसार सन 2026-27 मध्ये शालेय शिक्षणाशी संबंधित मोड्यूल्स विकसित करावयाचे आहेत. तरी आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय यंत्रणेअंतर्गत केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, DIET अंतर्गत अधिव्याख्याता, ज्येष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य, महानगरपालिका अंतर्गत प्रशासन अधिकारी, शिक्षण उपनिरिक्षक, शिक्षण निरिक्षक तसेच राज्यस्तर शिक्षण विभागातील अधिकारी यांना सदर पत्र अवलोकनार्थ दाखवावे. ज्यांना मोड्यूल्स विकसन कामकाजात सहभागी व्हावयाचे आहे. त्यांना खालील ऑनलाईन लिंकवर दि.23/09/2026 पर्यंत नोंदणी करण्याबबाबत सूचित करावे व त्यातून त्यांचे साहित्य राष्ट्रीय पोर्टलवर प्रकाशित होण्यासाठी संधी उपलब्ध करुन द्यावी.

नोंदणी लिंक –

https://forms.gle/EnR5PvfmPJS8jjjF9

संचालक
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर

Leave a Comment

error: Content is protected !!